इंटरनेटवरील Fake वेबसाईट अशा प्रकारे ओळखा आणि स्वतःचा डेटा सुरक्षित करा | how to check for fake websites

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आजच्या डिजिटल युगात आपण दिवसभरातून अनेक वेबसाईट किंवा ब्लॉग वर जात असतो. अशा वेळेस आपण जी वेबसाईट ओपन केली आहे ती Real आहे कि Fake हे माहिती करुन घेणे देखील गरजेचे झाले आहे. 

इंटरनेट वर डेटा चोरीला जाणे, आपली गुप्त माहिती इतरांना दिसू लागणे हे सर्व प्रकारचे घोटाळे एखाद्या वेबसाईट वर आपण घेतलेल्या चुकीच्या Action मुळे होते.
इंटरनेटवर आपली गुप्त माहिती सगळ्यांसमोर येण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपल्याला ओळखताच येत नाही कि जी वेबसाईट आपण ओपन करत आहोत ती Real आहे कि Fake. कारण Fake website हि Real website प्रमाणेच दिसत असते. 
तुम्हाला Fake वेबसाईट ओळखता येते का ?
आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या Fake वेबसाईट लिंक येतात. 
Whatsapp वर आपण बऱ्याच ग्रुपमध्ये Join असतो. या ग्रुपमध्ये दिवसाला किती तरी लिंक येतात आणि आपण त्यावर विचार न करता Click करतो आणि जाळ्यात अडकतो. 
आज मी तुम्हाला इंटरनेटवरील Fake website कशी ओळखायची याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. 
जेणे करुन तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता. 

Fake वेबसाईट कशी ओळखायची।how to check for fake websites

Fake वेबसाईट शोधण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे मार्ग सांगणार आहे. ह्या मार्गांचा वापर करुन तुम्ही खोटी वेबसाईट ओळखू शकता. 

१. वेबसाईट URL चेक करा 

सर्वप्रथम तुम्ही जी पण लिंक browser मध्ये ओपन कराल ती ओपन झाल्यानंतर त्या वेबसाईट लिंकच्या सुरुवातीला https आहे का हे पाहायचे आहे. 
जर वेबसाईटच्या URL मध्ये अगोदर https असेल तर ह्याचा अर्थ ती वेबसाईट किंवा ब्लॉग Secure आहे असा होतो. 
जसे आपल्या ब्लॉगच्या URLच्या सुरुवातीला तुम्हाला लॉक दिसेल म्हणजे हा ब्लॉग सुरक्षित आहे. 
how to check for fake websites

पण जर वेबसाईटच्या URL मध्ये सुरुवातीला https नसेल म्हणजे फक्त http असेल तर ह्याचा अर्थ ती वेबसाईट सुरक्षित नाही. 
अशा वेबसाईट वर तुम्ही कधी सुद्धा स्वतःची वैयक्तिक माहिती (Personal information) किंवा बँकेची माहिती टाकू नका. 
खूप सारे browser आपल्याला असुरक्षित वेबसाईट विषयी चेतावणी देतात. जसे कि chrome,जर एखादी वेबसाईट सुरक्षित नसेल तर त्या URL च्या सुरुवातीला Not Secure असे लाल रंगात दाखवते. 

२. Domain चेक करा 

बऱ्याच Fake वेबसाईट या Domain मध्ये थोड्या प्रमाणात बदल करतात. हा बदल असा असतो कि तो आपल्याला लगेच समजून येत नाही.
जसे कि खोटी वेबसाईट हि amaz०n.com अशा प्रकारे बदल करु शकते किंवा मग शेवटच्या Extension मध्ये बदल करु शकते. 
जसे amazon.org अशा प्रकारे बदल करु शकते. परंतु amazon चे खरे URL हे amazon.com हे आहे. 

३. Domain Age चेक करा 

Scam करणारे लोक फार काळ एक वेबसाईट वापरत नाहीत. ते सारखे डोमेन बदलत राहतात. जर तुम्हाला एखादी वेबसाईट चेक करायची असेल कि ती Fake आहे कि Real तर तुम्ही तिचे Domain Age चेक करु शकता.
Domain Age वरुन आपल्याला कळते वेबसाईट किती जुनी आहे. ज्या Domain चे Age जास्त असते ती वेबसाईट सुरक्षित असण्याचे प्रमाण अधिक असते. 
Domain Age चेक करण्यासाठी तुम्ही Domain Age Checker tool चा वापर करु शकता. 

४. Virus स्कॅन करुन पहा 

एखाद्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुमचा फोन किंवा लॅपटॉप Vibrate होत असेल किंवा हँग होत असेल तर तुम्ही ती वेबसाईट स्कॅन करु शकता. 
वेबसाईट स्कॅन केल्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळेल जसे कि त्या वेबसाईटमध्ये virus किंवा malware तर नाही. 
वेबसाईट स्कॅन करण्यासाठी तुम्ही VirusTotal चा वापर करु शकता. 

५. Contact information चेक करा 

तुम्ही जी सुद्धा वेबसाईट ओपन कराल त्यामध्ये तुम्हाला सर्वात खालच्या बाजूला Contact नावाचे Option दिसेल. त्या Option वर क्लिक करुन त्यामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का ते पहा.
कारण बऱ्याच वेळेस Fake वेबसाईट Contact information विषयी माहिती टाकत नाहीत. 

६. इतर पद्धती ज्याद्वारे तुम्ही Fake वेबसाईट ओळखू शकता. 

वरील उपायांसोबत तुम्ही खालील पद्धतीने देखील Check करु शकता. कोणती वेबसाईट खोटी आहे व कोणती सुरक्षित आहे. 
  • Privacy Policy चेक करा.
  • संपर्क साधण्यासाठी email address किंवा फोन नंबर आहे का.
  • ज्या भाषेत वेबसाईट आहे ती भाषा योग्य आहे का ते पहा.
  • Google Transparency Report पहा. 
ह्या मार्गाचा अवलंब करुन तुम्ही इंटरनेटवरील खोटी वेबसाईट ओळखू शकता. 
यामुळे तुमचा डेटा आता सुरक्षित राहण्यास मदत होईल. 
खूप लोकांना हि माहिती नसल्याने ते चूक करुन बसतात. परंतु तुम्हाला तर आता माहित झाले आहे Fake वेबसाईट कशी ओळखायची (how to check for fake websites).
तुमच्या मित्रांचे नातेवाईकांचे डिजिटल युगात रक्षण करण्यासाठी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी हि माहिती त्यांना whatsapp वर share करा. 

Leave a Comment