Download and Install Google Input Tools Marathi For Windows 7, Windows 10, and Windows 11 For Free.
आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये टाईप करायला आवडते. आपण लॅपटॉप किंवा पीसी वापरताना त्यामध्ये मराठी टाईप कसे करायचे यासाठी पीसीमध्ये खूप शोधाशोध करतो.
पण विंडोजमध्ये मराठी टाईप करण्यासाठी आपल्याला चांगले option मिळत नाही. खरे तर विंडोज पीसीमध्ये मराठी टाईप करण्यासाठी एक option आहे देखील पण ते सहज वापरणे कठीण आहे.
म्हणून आपल्या सर्वांना हव्या त्या भाषेत टाईप करता यावे यासाठी गुगलने एक टूल लाँच केले होते. ज्याला Google Input Tools Marathi या नावाने ओळखले जाते.
आजच्या या पोस्टमध्ये आपण गुगल इनपुट टूल मराठी काय आहे तसेच हे टूल इन्स्टॉल करुन कसे वापरायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे. तसेच तुम्हाला Google Input Tool Marathi Download करण्याची लिंक देखील देणार आहे.
जर तुम्हाला देखील लॅपटॉप किंवा पीसीमध्ये मराठी टाईप करायचे असेल तर ही पोस्ट वाचणे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे.
Google Input Tools Marathi काय आहे । What is Google Input Tools Marathi
गुगल इनपुट टूल हे एक language input tool आहे जे गुगलने develop केले आहे. हे आपल्याला standard इंग्लिश कीबोर्डच्या मदतीने मराठी टाईप करण्याची सुविधा देते.
हे टूल आपल्याला मराठीत टाईप करताना मराठी मध्येच वेगवेगळ्या मराठी शब्दांचे suggestion देखील देते. जेणे करुन एक मराठी शब्द आपण ३ ते ४ प्रकारे टाईप करु शकतो.
गुगल इनपुट टूल मराठीद्वारे आपण पीसीमध्ये कुठे ही किंवा ब्राऊजरमध्ये देखील मराठीत टाईप करु शकतो. या टूलद्वारे आपण ऑफलाईन मराठीत टाईप करु शकतो.
गुगल इनपुट टूल हे आपण दोन प्रकारे वापरु शकतो. एक पीसीमध्ये Install करुन आणि दुसरे म्हणजे Chrome ब्राऊजरमध्ये Extension Install करुन. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तसे तुम्ही हे टूल वापरु शकता.
मी तुम्हाला या पोस्टमध्ये Google Input Tool Marathi दोन्ही प्रकारे कसे वापरायचे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे टूल वापरताना कोणतीही अडचण येणार नाही.
Google Input Tools Marathi काम कसे करते | How Does Google Input Tools Marathi Work?
गुगल इनपुट टूल आपल्याला standard इंग्लिश कीबोर्डच्या मदतीने मराठी टाईप करण्याची सुविधा देते. ही सुविधा कशा प्रकारे काम करते हे आपण एका example द्वारे पाहूया.
समजा जर तुम्हाला Wordpad मध्ये मराठीत “शुभ सकाळ” असे टाईप करायचे असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या इंग्लिश कीबोर्डमध्ये “shubh sakal” असे टाईप करायचे आहे.
इंग्लिशमध्ये “shubh sakal” टाईप केल्याने ते आपोआप मराठीमध्ये Convert होईल. या मुळे तुम्ही जलद व सहज मराठीमध्ये पटकन टाईप करु शकाल.
आहे की नाही मराठीमध्ये टाईप करण्याची मजेदार ट्रिक ?
या टूलद्वारे तुम्ही हवे तेवढे व पाहिजे तेथे मराठीमध्ये टाईप करु शकता. तसेच या एका टूलद्वारे तुम्ही कोणत्याही भाषेत टाईप करु शकता. हे टूल पीसीमध्ये Install केल्यानंतर तुम्हाला मराठीत टाईप करण्यासाठी इतर कोणतेही टूल वापरण्याची गरज नाही.
Google Input Tool Marathi वापरण्याचे फायदे काय आहेत । What are the benefits of using Google Input Tools Marathi?
गुगल इनपुट टूल वापरल्यामुळे आपल्याला खालील फायदे मिळतात.
- गुगल इनपुट टूल वेगवेगळ्या भाषांसाठी Support करते.
- हे टूल वापरणे फार सोपे आहे.
- हे टूल आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे वापरु शकतो.
- गुगल इनपुट टूल आपण chrome ब्राउझरमध्ये Extension च्या मदतीने देखील वापरु शकतो.
- आपण इंग्लिश कीबोर्डमध्ये टाईप केलेले वर्ड automatically मराठीमध्ये convert होतात. जसे की “Namaste” इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर ते आपोआप “नमस्ते” या मराठी शब्दामध्ये Convert होईल. या मुळे मराठीत टाईप करणे फार सोपे होते.
Google Input Tools Download कसे करायचे । How to Download Google Input Tools Marathi
गुगल इनपुट टूल मराठी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली “Download Google Input Tool Marathi” असे एक बटण दिसेल त्यावर क्लिक करा. त्या नंतर Downloading स्टार्ट होईल.
Software | Google Input Tool Marathi |
Developer | |
Size | 8.28 MB/ZIP File |
Device | Laptop and PC |
Google Input Tools Marathi Download for Windows 7, Google Input Tools Marathi Download for Windows 10, Google Input Tools Marathi Download for Windows 11
Google Input Tools Windows मध्ये Install आणि Setup कसे करायचे । How to Install and Setup Google Input Tools Marathi in Windows
गुगल इनपुट टूल विंडोजमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. सर्वांत अगोदर “Download Google Input Tool Marathi” या बटनावर क्लिक करुन इनपुट टूल डाउनलोड करुन घ्या.
2. एक ZIP फाईल तुमच्या पीसीमध्ये डाउनलोड होईल. त्यानंतर ती फाईल extract करुन Install करा.
3. तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीच्या उजव्या बाजूस खालच्या साईडला एक Keyboard Layout चे option दिसेल त्यावर क्लिक करुन “Marathi” सिलेक्ट करा.
4. आता तुम्ही गुगल इनपुट टूल मराठीमध्ये वापरु शकता.
Google Input Tools कसे वापरायचे । How to use Google Input Tools Marathi
गुगल इनपुट टूल वापरण्यासाठी तुम्हाला हे टूल सर्वांत अगोदर डाउनलोड करुन पीसीमध्ये Install करावे लागेल. यासाठी तुम्ही वरील स्टेप्स फॉलो करु शकतात.
आता आपण गुगल इनपुट टूल कसे वापरायचे हे पाहूया.
गुगल इनपुट टूल इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जेथे टाईप करायचे आहे ते ओपन करा.
समजा तुम्हाला नोटपॅडमध्ये मराठी टाईप करायचे असेल तर नोटपॅड ओपन करुन पीसीच्या उजव्या बाजूस खालच्या साईडला असणाऱ्या Keyboard Layout option मधून Marathi(Google Input Tool) सिलेक्ट करा.
त्यानंतर तुम्हाला जे मराठीत टाईप करायचे आहे ते तुम्ही इंग्लिश कीबोर्डच्या मदतीने सहज टाईप करु शकता. गुगल इनपुट टूलच्या मदतीने मराठीत कसे टाईप करायचे यासाठी तुम्ही वरील व्हिडिओ देखील पाहू शकता.
हे वाचा – Freelancing द्वारे पैसे कसे कमवायचे ?
Google Input Tools Chrome Extension कसे वापरायचे ?
जर तुम्हाला मराठी टाइपिंग फक्त chrome browser वर करायची असेल तर यासाठी तुम्ही Google Input Tool चे chrome extension Install करु शकता.
गुगल इनपुट टूलचे क्रोम एक्स्टेंशन इन्स्टॉल करण्यासाठी सर्वांत अगोदर क्रोम ब्राउझरमध्ये “chrome web store” असे टाईप करुन सर्च करा.
पहिल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर chrome web store ओपन होईल. तेथे डाव्या बाजूस असणाऱ्या सर्च बारमध्ये “Google Input Tool” असे सर्च करा.
त्यानंतर तुम्हाला गुगल इनपुट टूल नावाने एक्स्टेंशन दिसेल. त्यावर क्लिक करुन “Add to chrome” बटनावर क्लिक करा. एक फाईल पीसीमध्ये इन्स्टॉल होईल. मग तुम्ही हे क्रोम एक्स्टेंशन वापरु शकता.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एक्स्टेंशनच्या मदतीने क्रोम ब्राउझरमध्ये मराठीत टाईप कसे करायचे ?
चला तर पाहूया क्रोम ब्राउझरमध्ये मराठीत कसे टाईप करायचे.
समजा तुम्हाला क्रोममध्ये Google docs मध्ये मराठीत टाईप करायचे आहे. यासाठी google docs ओपन करा व एक्स्टेंशनच्या ऑपशनमध्ये जाऊन तेथे मराठी सिलेक्ट करा.
आता तुम्ही गुगल docs मध्ये मराठीत टाईप करु शकता.
FAQ –
1. Google Input Tools Marathi फ्री आहे का ?
हो, Google Input Tools Marathi फ्री आहे. हे टूल तुम्ही पीसी किंवा लॅपटॉपमध्ये फ्री वापरु शकता.
2. Google Input Tools Marathi offline वापरु शकतो का ?
google input tool marathi तुम्ही दोन प्रकारे वापरु शकता. एक ऑफलाईन आणि दुसरे म्हणजे ऑनलाईन. गुगल इनपुट टूल सॉफ्टवेअर तुम्ही पीसीमध्ये ऑफलाईन देखील वापरु शकता. पण गुगल इनपुट टूल क्रोम एक्स्टेंशन वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असते.
Conclusion
Google Input Tools Marathi काय आहे आणि हे कसे वापरायचे या विषयी इतकी माहिती वाचल्यानंतर तुमच्या मनात काही शंका असेल असे मला वाटत नाही.
तरी देखील वरील माहिती विषयी जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता.
या ब्लॉग वर Publish होणाऱ्या अशाच उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.