Quora म्हणजे काय आणि हे कसे वापरायचे । quora meaning in marathi

इंटरनेट वर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सर्च करताना तुम्ही एकदा तरी quora या वेबसाईट वर गेलाच असाल.

तसेच प्ले स्टोअर वर किंवा तुमच्या मित्राच्या फोनमध्ये तुम्ही कोरा अँप नक्की पाहिले असेल. आज आपण येथे कोरा म्हणजे काय (quora meaning in marathi) तसेच कोरा कसे वापरायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा. जेणे करुन भविष्यात तुम्ही देखील एक चांगले कोरा वापरकर्ते बनाल.

Quora म्हणजे काय। Quora meaning in marathi

quora meaning in marathi

Quora म्हणजे एक सार्वजनिक मंच आहे जेथे लोक आपले प्रश्न विचारतात. तसेच इतर लोक त्या प्रश्नांचे उत्तर देतात.

कोराची स्थापना 25 जून 2009 रोजी झाली आणि 21 जून 2010 रोजी हे लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले.

कोरा वर तुम्हाला खूप साऱ्या देशातील लोक प्रश्न विचारताना तसेच त्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतात. कोरामध्ये तुम्हाला मराठी (quora marathi), हिंदी आणि इंग्लिश या सारख्या खूप भाषा पाहायला मिळतील.


Quora कसे वापरायचे ?

कोरा वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. तुम्ही ई-मेल आयडी किंवा गुगलद्वारे अकाउंट तयार करु शकता.

त्यानंतर कोरा तुम्हाला तुमच्या Interest विषयी विचारेल. मग तुम्ही कोरामध्ये पूर्णपणे लॉग इन व्हाल.

कोरामध्ये एकदा लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर खूप option तुम्हाला दिसतील. काही लोकांनी प्रश्न विचारलेले असतात ते देखील तुम्ही येथे पाहू शकता.

quora meaning in marathi

जर तुम्हाला कोरा वर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही Ask(विचारा) ऑपशन वर क्लिक करुन तुमचा प्रश्न तेथे ऍड करु शकता. तसेच जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल तर Answer(उत्तर द्या) ऑपशन वर क्लिक करुन उत्तर देऊ शकता.


तुम्ही कोरा का वापरले पाहिजे ?

हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण Quora हे देखील एक प्रकारचे सोशल मीडिया आहे. आज आपण व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम सारखे अँप वापरतो मग कोरा का वापरावे हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

आपण काही महत्वाचे पॉईंट पाहूया जेणे करुन तुम्ही कोरा का वापरावे हे तुम्हाला समजेल.

  • आपण कोरा वेगवेगळ्या भाषेमध्ये वापरु शकतो. विशेष म्हणजे तुम्ही quora marathi मध्ये देखील वापरु शकता.
  • तुमच्या मनात असलेले प्रश्न तुम्ही डायरेक्ट कोरा वरती विचारु शकता. तसेच त्या प्रश्नाचे उत्तर कोणी द्यावे हे देखील ठरवू शकता.
  • कोरावर तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींसोबत चांगले नेटवर्क बनवू शकता.
  • कोरावर लोक विविध प्रश्न विचारतात. जर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही उत्तर देऊन marathi quora मध्ये तुमचे योगदान देऊ शकता.
  • कोरामध्ये तुम्ही Space तयार करुन चांगले पैसे देखील कमवू शकता.

ही काही कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही कोरा वापरले पाहिजे.

हे वाचा – Dagdi Chawl 2 Marathi Movie Download


FAQ –

1. तुम्ही Quora किती भाषांमध्ये वापरु शकता ?

Quora आपण इंग्लिश, हिंदी, मराठी सारख्या २४ वेगवेगळ्या भाषांमध्ये वापरु शकतो.

2. Quora एवढे प्रसिद्ध का आहे ?

Quora वर आपण आपल्या मनातील प्रश्न विचारु शकतो तसेच कोरावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील देऊ शकतो त्यामुळे कोरा फार प्रसिद्ध आहे.


Conclusion

आज आपण येथे कोरा म्हणजे काय (quora meaning in marathi) पाहिले. या सोबतच कोरा कसे वापरायचे आणि कोरा का वापरले पाहिजे हे देखील जाणून घेतले.

जर तुम्हाला वरील माहिती विषयी काही शंका असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता.

या ब्लॉग वर Publish होणाऱ्या अशाच उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment