आपण कॉल केल्यावर समोरील व्यक्तीने आपला फोन स्पीकरवर ठेवला आहे हे ओळखण्याची भन्नाट ट्रिक

आपण कॉल केल्यानंतर समोरील व्यक्तीने आपला फोन स्पीकर वर ठेवला आहे का हे आपल्याला माहित असणे फार गरजेचे आहे.

बऱ्याचदा आपले मित्र आपली टिंगल करण्यासाठी किंवा काहीजण आपल्याकडे असणारी गुप्त माहिती सगळ्यांना ऐकवण्यासाठी असे पराक्रम करु शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे.

एखाद्याने तुमचा कॉल स्पीकर वर टाकला आहे हे का कळायला हवे ?

  • effective communication साठी फोन स्पीकर वर आहे की नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे.
  • हे तुम्हाला तुमचे communication style, आवाज आणि tone adjust करण्यासाठी मदत करते.
  • हे तुम्हाला तुमची sensitive आणि private माहिती इतरांपासून लपवून ठेवण्यास मदत करते.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स सांगणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल स्पीकर वर टाकला आहे का हे ओळखण्यास मदत मिळेल.

कोणी तरी फोन Speaker वर ठेवल्याची लक्षणे

How to recognize when someone has put your call on speaker in marathi

1. Voice Echo or Distant Sound

कोणी तरी आपला कॉल स्पीकर वर टाकला आहे हे ओळखण्याचे सर्वात सोपे लक्षण म्हणजे आपल्याला समोरील व्यक्तीचा आवाज पुन्हा पुन्हा येणे किंवा दूरचा आवाज येणे.

असे होते कारण मायक्रोफोन एकाच वेळेस दोन्ही आवाज म्हणजे speaker चा आणि background चा आवाज सोबत capture करतो.

2. Background Noise

आपण समोरच्या व्यक्ती सोबत फोन वर बोलत असताना सतत background चा आवाज येत राहणे हे देखील एक मोठे लक्षण आहे कि आपला फोन समोरच्या व्यक्तीने speaker वर टाकला आहे.

background noise यामध्ये गाड्यांचा आवाज, गर्दीचा आवाज किंवा office मधील आवाज या सारखे विविध आवाज असू शकतात.

3. Disrupted Sound Quality

जेव्हा एखादी व्यक्ती फोन स्पीकर वर ठेवते तेव्हा आवाजाच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला आपल्याला पहायला मिळतो.

फोनवर बोलताना आवाजामध्ये गॅप येत राहणे किंवा आवाज कधी कमी येणे तर मधेच जास्त येणे असे प्रकार यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात.

4. Lack of Privacy

ती व्यक्ती तुमचे कॉल वरील बोलणे इतरांना ऐकवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरांच्या आजूबाजूला उभी राहू शकते.

फोनवर बोलत असताना जर तुम्हाला background मधून बोलण्याचा आवाज आला तर म्हणजे तुमच्या बोलण्याला कोणत्याही प्रकारची Privacy राहिलेली नाही.

5. Nonverbal Cues

समोरील व्यक्ती फोन स्पीकर वर आहे हे सांगण्यासाठी विविध शाब्दिक संकेत वापरु शकते. तुम्ही त्याकडे लक्ष द्या.

म्हणजेच ते तुमचे बोलणे स्पीकर वर ऐकण्यासाठी त्यांचा आवाज वाढवू शकतात किंवा तुम्ही त्यांना फोनपासून दूर जाताना ऐकू शकता.

आजच्या मोबाईल फोनच्या युगात, कॉल करताना कोणीतरी आपला फोन स्पीकरवर कधी ठेवला हे ओळखता येणे फार महत्त्वाचे आहे. background चा आवाज येणे, आवाज कमी जास्त होणे अशा काही लक्षणांद्वारे तुम्हाला फोन स्पीकर वर असल्याचे समजू शकते.

Leave a Comment