आजच्या डिजिटल युगात हि पोस्ट वाचणाऱ्या जवळपास सर्वच व्यक्तींना फ्रीलांसिंग म्हणजे काय या विषयी थोडी का होईना माहिती असेलच.
पण फ्रीलांसिंग विषयी अधिक माहिती घेण्यासाठी आणि याद्वारे आपण स्वतःचा व्यवसाय सुरु करुन पैसे कसे कमवू शकतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही येथे आला आहात.
आजच्या या माहितीमध्ये तुमच्या मनात फ्रीलांसिंग व्यवसाय विषयी जेवढे प्रश्न आहेत त्या सर्वांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील. त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा.
फ्रीलांसिंग म्हणजे काय?
” फ्रीलांसिंग म्हणजे आपण आपल्या कौशल्यांचा वापर करुन दुसऱ्या व्यक्तीचे एखादे काम पूर्ण करुन देतो आणि त्याचा मोबदला म्हणून तो व्यक्ती आपल्याला पैसे देतो.”
फ्रीलांसिंगमध्ये दोन व्यक्तींमध्ये संवाद होऊन काम कशा प्रकारे करायचे आहे. ते काम किती वेळात पूर्ण झाले पाहिजे. तसेच काम पूर्ण केल्यानंतर पॆसे किती मिळतील या विषयी देखील संपूर्ण चर्चा होते.
एखाद्या व्यक्तीमध्ये जर व्हिडिओ एडिटिंगचे कौशल्य आहे आणि त्याला या कौशल्याच्या माध्यमातून पैसे कमवायचे असल्यास तो फ्रीलांसिंग वेबसाईट वर जाऊन व्हिडिओ एडिटिंगचे काम करुन देण्यास मदत करुन त्याद्वारे चांगले पैसे कमवू शकतो.
फ्रीलांसर कसे बनावे?
जर तुम्हाला फ्रीलांसिंगमध्ये स्वतःचे करीअर घडवायचे असेल किंवा फ्रीलांसर बनून जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला सर्वात अगोदर कोणते तरी कौशल्य (Skill) शिकावे लागेल.
फ्रीलांसिंग करण्यासाठी आपल्याकडे एखादे चांगले कौशल्य असणे गरजेचे असते. तुम्ही त्या कौशल्यात किंवा कामात जेवढे चांगले असाल तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे कमवू शकता.
जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त कौशल्य शिकून अधिक पैसे कमवू शकता. फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंग, कोडींग, Content Writing आणि Ms Office या सारखे कौशल्य शिकून तुम्ही विविध प्रकारचे काम करु शकता.
भारतातील चांगल्या फ्रीलांसिंग वेबसाईट कोणत्या आहेत?
फ्रीलांसिंगचे काम पुरवणाऱ्या इंटरनेट वर तुम्हाला अनेक वेबसाईट मिळतील. पण त्या सर्वच खात्रीशीर वेबसाईट असतील असे नाही.
ऑनलाईन अशा खूप वेबसाईट आहेत ज्या तुमच्या कडून काम करुन घेतील पण तुम्हाला काम केल्याबद्दल पैसे देणार नाहीत. अशी फसवणूक तुमच्या सोबत होऊ नये म्हणून तुम्हाला खात्रीशीर फ्रीलांसिंग वेबसाईट माहित असल्या पाहिजेत.
1. Upwork
फ्रीलांसिंग वेबसाईट विषयी चर्चा चालू असेल आणि Upwork चे नाव घेतले जाणार नाही असे होऊ शकत नाही. Upwork हि सर्वात जुनी वेबसाईट नाही पण फ्रीलांसिंगचे काम पुरवण्यात मागे देखील नाही.
Upwork वर तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार विविध प्रकारचे काम शोधून पैसे कमवू शकता. येथे तुम्हाला विविध क्षेत्रातील कौशल्यावर आधारीत जॉब करण्याची संधी मिळेल.
Upwork वर तुम्हाला खालील क्षेत्राशी निगडित जॉब मिळतील.
- Design & Creative
- Sales & Marketing
- Writing & Translation
- Finance & Accounting
- Development & IT
- Admin & Customer Support
- Legal
- Engineering & Architecture
2. Truelancer
Truelancer हि भारतातील फ्रीलांसिंगचे काम पुरवणारी सर्वात चांगली वेबसाईट मानली जाते. येथे तुम्ही पूर्ण केलेल्या कामाचा मोबदला १०० टक्के मिळतो. Truelancer वरती तुम्हाला Content Writing तसेच फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंगशी निगडित जॉब सहज मिळतील.
तुम्हाला जर येथून लहान प्रोजेक्ट्स मिळवायचे असतील तर ते देखील तुम्हाला सहज येथे मिळतील. वेबसाईट design, एडिटिंग, डेटा एन्ट्री सारख्या लहान प्रोजेक्ट्स पासून ते कोडींग, मार्केटिंग, Finance & Accounting अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट्स तुम्हाला येथे पहायला मिळतील.
3. Guru
Guru.com हि फ्रीलांसिंगचे काम करण्यासाठी सर्वात सुरक्षित वेबसाईट मानली जाते. येथे तुम्ही काम करण्याअगोदर Agreement तयार करु शकता. तसेच तुमची फी अगोदरच सांगू शकता.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स किंवा काम येथून मिळवू शकता. तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर Safepay द्वारे पैसे तुमच्या पर्यंत सुरक्षित पोहोचविले जातात.
Guru वर तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या जॉब मिळतील. तुम्ही हवे ते काम करुन चांगले पैसे कमवू शकता.
4. 99 design
Graphic design, Logo, फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंग सारख्या कामांसाठी ९९ design हि जगातील सर्वात चांगली फ्रीलांसिंग वेबसाईट आहे. तुम्हाला जर एडिटिंग किंवा Design शी निगडित एखादी जॉब हवी असेल तर तुम्ही येथे जॉब बद्दल सर्च करु शकता.
येथे तुम्हाला वेब पेज डिजाईन, वर्डप्रेस थिम डिजाईन, लोगो, पोस्टकार्ड, पोस्टर तसेच बुक कव्हर असे विविध प्रकारातील जॉब पाहायला मिळतील. जर तुम्हाला येथून जास्तीत जास्त काम मिळवायचे असेल तर तुम्ही केलेलं काम हे उत्तम दर्जाचे हवे. कारण येथे स्पर्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
5. Fiverr
फ्रीलांसिंगचे काम पुरवणाऱ्या टॉप १० वेबसाईटमध्ये हि देखील वेबसाईट येते. तुम्हाला हव्या त्या क्षेत्रातील जॉब येथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. तसेच इथे जॉब मिळवण्यासाठी स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात आहे.
येथे तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला योग्य वेळेत मिळतो. Fiverr वर तुम्हाला खालील क्षेत्राशी निगडित जॉब पहायला मिळतील.
- Graphic & Design
- Digital Marketing
- Writing & Translation
- Video & Animation
- Music & Audio
- Programming
तुम्ही वर दिलेल्या कोणत्याही फ्रीलांसिंग साईट वरुन sign up करुन काम करण्यास सुरुवात करु शकता.
फ्रीलांसिंग मधून पैसे कसे कमवायचे?
फ्रीलांसिंगद्वारे तुम्ही फक्त इतरांसाठी काम करुन नाही तर स्वतःचा एक लहान व्यवसाय चालू करुन देखील चांगले पैसे कमवू शकता. फ्रीलांसिंगद्वारे तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता.
- फ्रीलांसर बनून
- Agency चालू करुन
1. फ्रीलांसर बनून
तुमच्या मध्ये जे कौशल्य असेल त्याच्याद्वारे तुम्ही विविध फ्रीलांसिंग वेबसाईट वर जॉब शोधून काम पूर्ण करुन देऊन पैसे कमवू शकता.
फ्रीलांसर बनून जास्तीत-जास्त पैसे कमवण्यासाठी तुमच्या मध्ये विविध प्रकारची कौशल्ये असणे आवश्यक आहे. तसेच तुमची काम करण्याची पद्धत जर Client ला आवडली तर तो तुम्हालाच नेहमी काम देईल. फ्रीलांसिंग वेबसाईट वर तुम्ही तुमचे नेटवर्क वाढवून जास्तीचे काम मिळवू शकता.
फ्रीलांसर बनून तुम्ही महिन्याला ८०,००० ते १,००,००० रुपये सहज कमवू शकता.
2. Agency चालू करुन
तुम्ही विविध प्रकारच्या फ्रीलांसिंग साईट वरुन एकाच वेळी विविध प्रकारचे आणि मोठ्या प्रमाणावर काम घेऊन ते इतर व्यक्तींकडून म्हणजेच तुमच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडून करुन घेऊ शकता.
Agency चालू करुन तुम्ही चांगले लोक कामावर ठेऊ शकता आणि त्यांच्याकडून फ्रीलांसिंगचे काम करुन घेऊ शकता. तुमच्या हाताखाली इतर लोक कामाला असल्यामुळे काम पटकन पूर्ण होईल व तुम्हाला तुमचा मोबदला देखील लवकर मिळेल.
फ्रीलांसिंग साईट वरुन तुम्ही तुमचे नेटवर्क इतर लोकांसोबत वाढवू शकता. जेणे करुन इतर व्यक्ती तुम्हाला डायरेक्ट काम देतील. अशा प्रकारे तुम्हाला काम देखील जास्त प्रमाणात मिळेल.
Agency चालू करुन तुम्ही महिन्याला ५ ते ६ लाखापर्यंत कमवू शकता.
फ्रीलांसिंगचे फायदे
1. वेळ मिळतो
फ्रीलांसरला मिळणाऱ्या अनेक फायद्यांपैकी हा एक खूप महत्वाचा फायदा आहे. फ्रीलांसिंगचे काम करताना तुम्ही तुमच्या वेळेमध्ये काम करु शकता. इथे तुम्हाला ९ ते ५ काम करण्याची आवश्यकता नसते.
जर तुम्हाला कामातून आठवड्यातील काही दिवस किंवा अचानक सुट्टी घ्यायची असेल तर ते तुम्ही सहज करु शकता.
2. कामावर नियंत्रण
नोकरी करताना तुमचा Client किती हि वाईट बोलला तरी तुम्हाला एकूण घ्यावे लागते. परंतु फ्रीलांसिंग करताना तुम्ही स्वतःचे बॉस असता. तुम्हाला कुणासोबत काम करायचे आहे आणि कुणासोबत नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न असतो.
तुम्ही Client सोबत सविस्तर बोलून तुमच्या व त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊन सोबत काम करायचे कि नाही हा निर्णय घेऊ शकता.
3. तुम्हाला हवे तिथे काम करा
फ्रीलांसिंग काम करत असताना तुम्हाला ठराविक जागेवर किंवा ऑफिसमध्ये बसूनच काम करण्याची गरज नसते. तुम्ही जगभर फिरत सुध्दा Client चे काम पूर्ण करुन देऊ शकता.
फ्रीलांसिंगमुळे कोठे हि फिरत असताना आपल्याला काम करण्याची संधी मिळते.
4. स्वतः मालक असता
फ्रीलांसिंग काम म्हणजे हा एक प्रकारचा Small Business आहे. येथे तुम्ही कुणाच्याही हाताखाली काम करत नसता. कुणाचे काम करायचे आणि कुणाचे नाही करायचे हे तुमच्या मनावर असल्याने येथे तुम्ही स्वतः मालक असता.
5. सगळा नफा तुमचा असतो
फ्रीलांसिंग काम करुन तुम्हाला जो काही नफा मिळतो तो सर्व नफा तुमचा असतो. त्या नफ्याच्या आणि तुमच्यामध्ये तिसरा कोणी नसतो. यामुळे तुमची कमाई चांगल्या प्रकारे होते.
हे पहा – Swiggy सोबत हा व्यवसाय करुन महिन्याला लाखो रुपये कमवा
फ्रीलांसिंगचे नुकसान
1. कामाचा लोड कमी-जास्त होत असतो
फ्रीलांसिंग काम करत असताना तुम्हाला एका वेळी अनेक काम करण्याची वेळ येऊ शकते. अशा कारणामुळे कामाचा लोड वाढत जातो. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी धावपळ वाढू लागते.
अशा परिस्थितीत खूप मेहनत घ्यावी लागते.
2. काम आणि वैयक्तिक वेळ यांच्यात फरक राहत नाही
फ्रीलांसिंग काम घरुनच करत असल्यामुळे बऱ्याचदा स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वेळ काढता येणे अवघड होते.
काम जर जास्त प्रमाणात असल्यास स्वतःसाठी दिलेला वेळ देखील काम पूर्ण करण्यासाठी द्यावा लागतो. त्यामुळे वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.
3. कधी-कधी पैसे मिळत नाही
फ्रीलांसिंग साईट वर असे बऱ्याचदा घडते कि काम तर पूर्ण केले पण पैसेच मिळाले नाही. इंटरनेट वर अशा खूप फ्रीलांसिंग खोट्या वेबसाईट आहेत ज्या काम करुन घेतात व नंतर पैसे देत नाही.
अशा परिस्थितीत फ्रीलांसर म्हणून तुम्हाला सतर्क राहणे फार गरजेचे असते.
आज आपण येथे फ्रीलांसिंग म्हणजे काय तसेच भारतामध्ये अशा कोणत्या चांगल्या फ्रीलांसिंग वेबसाईट आहेत या विषयी सविस्तर माहिती बघितली. तसेच फ्रीलांसिंगद्वारे आपण कसा स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतो हे देखील पाहिले.
फ्रीलांसिंग व्यवसाय विषयी जर तुम्हाला आणखी काही विचारायचे असल्यास तुम्ही आम्हाला कंमेंटमध्ये विचारु शकता.