Content Writing करुन दिवसाला ५०० ते १००० रुपये कमवा | content writing meaning in marathi

आपल्या मधील बरेच जण इंटरनेट वर content writing meaning in marathi असे सर्च करतात पण हे सर्च करण्या मागचा त्यांचा उद्देश वेगळाच असतो. content writing विषयी ते सर्च करतात कारण त्यांना माहित आहे कि याद्वारे आपण पैसे देखील कमवू शकतो.

तुम्हाला माहित होते का आपण content writing द्वारे पैसे कमवू शकतो ?

इंटरनेट वर पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत त्या मधील एक मार्ग म्हणजे content writing. आपल्या देशात किती तरी जण content writing द्वारे महिन्याला लाखो – करोडो रुपय कमवतात. काही जणांनी तर content writing ची सुविधा पुरवणारी Agency चालू केली आहे.

मी तुम्हाला आज content writing च्या माध्यमातून आपण पैसे कसे कमवू शकतो तसेच हे काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची माहिती असणे किंवा काळजी घेणे गरजेचे आहे हे देखील सांगणार आहे.

सर्व प्रथम आपण समजून घेऊया कि content writing नेमके असते तरी काय.

Content Writing म्हणजे काय।Content Writing meaning in marathi

content writing म्हणजे ब्लॉगसाठी किंवा एखाद्या वेबसाईटसाठी माहितीचा शोध घेऊन लिहणे. यामध्ये ब्लॉग पोस्ट लिहणे किंवा व्हिडिओची स्क्रिप्ट लिहणे या सारख्या कामांचा समावेश होतो. content writing ला आपण मराठीमध्ये माहिती लिहिणे असे म्हणतो.

content writing मध्ये Instagram किंवा twitter सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर माहिती पोस्ट करणे या सारख्या कामांचा देखील समावेश होतो.


Content writing करताना कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो ?

एखाद्या ब्लॉग किंवा वेबसाईटसाठी Content(माहिती) लिहताना काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. content writing करताना म्हणजेच माहिती लिहताना आपण कशा हि प्रकारे ते लिहू शकत नाही.

ब्लॉग किंवा वेबसाईटसाठी माहिती लिहताना आपल्याला काही प्रक्रियांमधून जावे लागते. या प्रक्रियां शिवाय content writing चे काम पूर्ण होत नाही.

1. Content writing साठी खूप research करणे गरजेचे असते

तुम्हाला ज्या सुद्धा टॉपिक वर लिहायचे आहे त्या टॉपिक वर तुम्हाला पहिल्यांदा खूप माहिती गोळा करावी लागते. त्या सोबतच जी माहिती मिळाली आहे त्याच्यातील हवी असलेली माहिती बाजूला काढणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला येणे गरजेचे आहे.

Research करण्यासाठी आपल्याला Wikipedia तसेच इतर माहिती पुरवणाऱ्या वेबसाईटचा वापर करावा लागतो. Content लिहण्यासाठी योग्य ती माहिती योग्य त्या विश्वासू साईट वरुन घेणे गरजेचे असते. जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती खरी आहे का खोटी याची खात्री करणे देखील गरजेचे असते.

2. माहिती लिहण्याचे कौशल्य

प्रत्येक लेखकाचे (Writer) लिहण्याचे कौशल्य वेगळे असते. एखाद्या टॉपिक वर लिहताना त्यांची लिहण्याची Style व लेखनातून वाचकांशी(Readers) बोलण्याची पद्धत वेगळी असते.

Content write करताना हे कौशल्य आपल्यामध्ये असणे गरजेचे आहे. तुम्ही विविध ब्लॉग वाचून माहिती लिहण्याचे कौशल्य शिकू शकता. पण त्यांची लिहण्याची पद्धत कॉपी करु नका.

3. मुद्याला अनुसरुन लिहले पाहिजे

माहिती लिहताना तुम्ही ज्या टॉपिक वर लिहणार आहात त्याच्याशी निगडित माहिती तुम्हाला लिहता येणे गरजेचे आहे. हे आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया.

समजा तुम्हाला संगणक विषयी लिहायचे आहे तर तुम्ही त्या मध्ये खालील पॉईंट Add करु शकता.

  • संगणक म्हणजे काय 
  • संगणकाचे प्रकार 
  • संगणकाचा इतिहास 
  • संगणकाचे विविध भाग कोणते

अशा पद्धतीने तुम्ही मुद्याला अनुसरुन विविध टॉपिक यामध्ये add करु शकता.

4. Title आणि पहिला Paragraph आकर्षक असला पाहिजे

ज्या टॉपिक वर लिहणार आहात त्याचे Title किंवा Headline हि वाचकांना आकर्षक वाटली पाहिजे. म्हणजेच Title वाचल्यानंतर त्याच्या खालील माहिती वाचण्यासाठी वाचक हा उत्सुक झाला पाहिजे.

जर वाचक Title वर क्लिक करुन माहिती वाचण्यासाठी आला तर त्याने तुम्ही लिहलेली संपूर्ण माहिती वाचावी म्हणून Content चा पहिला Paragraph आकर्षक लिहणे गरजेचे आहे. कोणत्याही Content मधील त्याचे Title व पहिला Paragraph हा फार महत्वाचा असतो.

5. वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहणे

बरेच जण एखाद्या विषयावर लिहताना खूप अवघड शब्दांचा वापर करतात. जे समजणे वाचकांना फार अवघड जाते. तुम्ही माहिती लिहताना इतक्या सोप्या पद्धतीने लिहायला हवी कि एखाद्या लहान मुलाला देखील ती माहिती वाचून समजेल.

लिहताना तुम्ही अशा प्रकारे लिहले पाहिजे जसे तुम्ही त्यांच्याशी बोलतच आहात. वाचकांना असे वाटले नाही पाहिजे कि ते माहिती वाचत आहेत. त्यांना वाटले पाहिजे माहिती त्यांच्याशी बोलत आहे.

6. संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे

तुम्ही ज्या सुद्धा टॉपिक वर लिहणार आहात त्याच्याशी निगडित संपूर्ण माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाल्यास तुमची माहिती वाचल्यानंतर त्याला इंटरनेट वर दुसरीकडे ती माहिती वाचण्यासाठी जावे नाही लागले पाहिजे.

तुम्ही ज्या टॉपिक वर माहिती देणार आहात त्याच्याशी संभंधित जेवढे पण इतर टॉपिक निघतील ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करा.

7. SEO Friendly

तुम्ही जी पण माहिती लिहाल ती SEO Friendly असणे फार गरजेचे आहे. ज्या टॉपिक वर तुम्ही लिहणार आहेत त्या टॉपिक मधील कीवर्डचा योग्य वापर करुन तुम्हाला माहिती लिहता आली आली पाहिजे.


Content Writing चे काम कसे शोधायचे।marathi content writing jobs from home

तुमच्या मध्ये content writing चे कौशल्य आल्यानंतर काम शोधण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आता आपण पाहूया तुम्हाला content writing चे काम कसे मिळेल.

1. Linkedin

linkedin हे फक्त फोटो, व्हिडिओ Share करण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही आहे. तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांची प्रोफाइल तसेच मॅनेजर यांची प्रोफाइल मिळेल. linkedin चा जास्त वापर हा जॉब शोधण्यासाठी केला जातो.

तुम्ही इथे आकर्षित अशी प्रोफाइल तयार करुन तुमचे content writing चे स्किल Mention करु शकता. या सोबतच तुम्ही तुमचे माहिती लिखाणाचे कौशल्य दाखवण्यासाठी एखाद्या ठराविक टॉपिक वर पोस्ट टाकू शकता.

2. Upwork

Upwork विषयी सगळ्यांना माहीतच आहे. हि एक Freelancing साईट आहे. यामध्ये तुम्ही हव्या त्या भाषेत content writing करण्यासाठी जॉब शोधू शकता. तुम्हाला इंग्लिश येत नसल्यास तुम्ही हिंदी किंवा मराठी भाषेत देखील माहिती लिखाणाचे काम शोधू शकता.

3. ब्लॉगरला विनंती करुन

हा सर्वात चांगला मार्ग आहे माहिती लिखाणाचे काम शोधण्याचा. तुम्हाला जी सुद्धा भाषा येत असेल किंवा ज्या भाषेत माहिती लिहू शकता त्या भाषेतील जे ब्लॉग आहेत त्यांच्या Authors ना विनंती करुन तुम्ही माहिती लिखाणाचे काम सुरु करु शकता.

तुम्हाला जर मराठीत Content writing चे काम शोधायचे असेल तर गुगल वर Marathi blog असे सर्च करा. तुमच्या समोर मराठी ब्लॉग येतील.

तुम्हाला हव्या त्या ब्लॉग वर जाऊन Contact नावाचे option दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ब्लॉगच्या Author चा ई-मेल ID मिळेल तेथून तुम्ही त्याला Content writing च्या कामासाठी विनंती करु शकता.

माहिती लिखाणाच्या जॉबसाठी विनंती करताना तुम्ही एखादे Demo आर्टिकल देखील सेंड करु शकता. जेणे करुन त्यांना तुमचे लिखाणाचे कौशल्य समजेल. त्यांना जर Content writer ची गरज असल्यास ते तुम्हाला काम देतील.

4. INTERNSHALA

Internshala ही कॉलेज मधील Student साठी फार उपयोगी अशी वेबसाईट आहे. येथे तुम्ही विविध skills शी निगडित जॉब शोधू शकता.

Content writing चे काम शोधण्यासाठी देखील हि वेबसाईट फार उपयोगी आहे. येथे तुम्ही Content writing साठी internship किंवा Full time job देखील पाहू शकता.

5. Content gather

Content gather ही अशी वेबसाईट आहे जेथे तुम्ही तुमचा लिहलेला content विकू शकता.

पण ह्या वेबसाईटमध्ये केवळ इंग्लिश भाषेतीलच Content विकला जातो. तुम्हाला जर इंग्लिश येत असेल तर तुमच्यासाठी हि वेबसाईट फार उपयोगी आहे.

एखाद्या टॉपिक वर Detail मध्ये content लिहून तुम्ही तो येथे Sell करु शकता.

वरती दिलेल्या मार्गांद्वारे तुम्ही Content writing चे काम सहज शोधू शकता. जर तुमचे लिखाण कौशल्य चांगले असेल तर तुम्हाला काम सहजरित्या मिळेल.

Content writing द्वारे जर तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी वेळ लागेलं. जस-जसे तुम्ही माहिती लिखाणाचे काम करत राहाल तस-तसे तुमच्या मधील Content writing चे कौशल्य विकसित होत जाईल.

Bonus Tip - 

तुम्ही इतरांसाठी Content writing चे काम केल्यानंतर त्यांच्या कडून तुमच्या कामाविषयी Testimonial घेऊ शकता. हे Testimonial तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर पोस्ट करु शकता.

जेणे करुन ज्यांना Content writer ची आवश्यकता आहे ते तुम्हाला तुमच्या कामांचे Testimonial पाहून तुम्हाला कन्टेन्ट लिहण्यासाठी विनंती करतील. जर तुम्ही काम मिळवण्यासाठी विनंती करत असाल तरी देखील हे Testimonial तुमच्या कामांचे कौशल्य दाखवण्यासाठी मदत करतील. 

आज तुम्ही काय शिकलात ?

मी आज तुम्हाला Content writing म्हणजे काय (content writing meaning in marathi) सांगून कोणत्या प्रकारची कौशल्य तुमच्या जवळ असली पाहिजेत या विषयी माहिती सांगितली.

त्या सोबतच content writing चे काम तुम्ही कशा प्रकारे शोधू शकता या विषयी देखील सांगितले. पैसे कमवण्याशी निगडित आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला Detail मध्ये माहिती हवी आहे हे मला तुम्ही कंमेंट करुन सांगा.

ह्या ब्लॉगवर अशीच फायदेशीर माहिती पोस्ट होत असते. ह्या ब्लॉगवर पोस्ट होणाऱ्या नवीन माहितीची Notification मिळवण्यासाठी डाव्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन Notification Allow करा.

मी bcom graduate आहे. मी २०२० पासून ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत आहे. मला नवीन Technology, Movie आणि Digital Marketing विषयी शिकायला आणि त्या संदर्भात माहिती share करायला आवडते.

2 thoughts on “Content Writing करुन दिवसाला ५०० ते १००० रुपये कमवा | content writing meaning in marathi”

Leave a Comment