E-Shram Card फ्री ऑनलाईन कसे काढायचे।E-Shram Card Maharashtra Online Registration

आज आपण येथे ई-श्रम कार्ड (E-Shram card) काय आहे तसेच हे फ्री ऑनलाईन कसे काढायचे (e shram card maharashtra online registration) या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सध्या सगळीकडे ई-श्रम कार्ड विषयी चर्चा चालू आहे. तसेच हे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक सायबर कॅफेमध्ये जात आहे व पैसे खर्च करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का हे ई-श्रम कार्ड तुम्ही फ्री मध्ये ऑनलाईन काढू शकता. हे ई-श्रम कार्ड तुम्हाला ऑनलाईन काढण्यासाठी पैसे देण्याची गरज पडत नाही. 

ई-श्रम कार्ड काय आहे, हे कोण काढू शकते तसेच हे काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे पाहायला मिळतील. तसेच E Shram कार्ड फ्री ऑनलाईन कसे काढायचे या विषयी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला येथे विविध स्टेपद्वारे पाहायला मिळणार आहे.

ई-श्रम कार्ड काय आहे।E-Shram card marathi meaning

ई-श्रम कार्ड ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याची सुरुवात २०२१ मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली. ईश्रम कार्डचे ऑनलाईन पोर्टल हे register.eshram.gov.in Ministry of Labour & Employment द्वारे लाँच केले गेले आहे.

आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये (Private Sector) काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा कामगारांना सरकारच्या योजनांचा फायदा थेट मिळावा या दृष्टीने ई-श्रम कार्ड तयार करण्यात आले आहे. 

असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये स्थलांतर करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा कामगारांना केंद्र सरकारकडून काही विशेष सुविधा पुरवल्या जात आहे. या सोबतच भविष्यात देखील विविध सुविधा पुरवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. 

भारतामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा व सवलती असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मिळत नाही. 

त्यामुळे असंघटित क्षेत्रामधील लोकांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी ई-श्रम कार्ड तयार करण्यात आले आहे. सरकार भविष्यामध्ये हे कार्ड बनवून घेणाऱ्या व्यक्तींसाठी १००० ते ३००० रुपये देण्याचा विचार करत आहे. तसेच ६० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना पेंशन देण्याचा देखील विचार करण्यात येत आहे. 

ई-श्रम कार्ड तयार केल्यानंतर आपल्याला २ लाखांपर्यंत दुर्घटना विमा मिळतो तसेच सरकारच्या मदतीने हे कार्ड काढल्यास आपल्याला पैसे देण्याची गरज पडत नाही. हे कार्ड काढण्यासाठी आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन पर्यायाचा वापर करु शकतो. 

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना थेट सुविधा पुरवण्यासाठी त्यांची माहिती गोळा करुन कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी आपल्या जवळ आधार कार्ड व बँक खाते असणे गरजेचे आहे.


ई-श्रम कार्ड कोण बनवू शकते ?

ज्या व्यक्तीचे वय १८ ते ६० च्या दरम्यान आहे आणि जो टॅक्स भरण्यासाठी Eligible नाही तो प्रत्येक व्यक्ती ई श्रम कार्ड बनवू शकतो.

ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी आपण काय काम करतो या विषयी आपल्याला माहिती द्यावी लागते. हे सर्व काम विविध Categorie मध्ये विभागण्यात आले आहे. जसे कि पेंटर, फोटोग्राफर, गवंडी, टेलर अशा अनेक कामाच्या विभागण्या करण्यात आल्या आहेत. 

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी कोणत्या कामांचा समावेश होतो व त्यांचे NCO Code पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

NCO Code List


ई-श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे।E-shram card documents in marathi

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी आपल्याला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला केवळ आधार कार्ड तसेच बँक अकाऊंटची गरज असते. तसेच आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असण्याची गरज असते. 

थोडक्यात, ई-श्रम कार्ड काढण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

  • आधार कार्ड 
  • बँक अकाऊंट 
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर 

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी वरील कागदपत्रे पुरेसे आहेत.


E-Shram card फ्री ऑनलाईन कसे काढायचे।E-Shram Card Maharashtra Online Registration

ई-श्रम कार्ड जर तुम्हाला ऑफलाईन काढायचे असेल तर तुम्ही CSC (Common Service Center) मध्ये जाऊन हे कार्ड काढू शकता. पण जर तुम्हाला हे कार्ड फ्री ऑनलाईन काढायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फॉलो करु शकता.

  1. सर्वात अगोदर तुम्हाला register.eshram.gov.in वर जावे लागेल. तेथे तुम्हाला आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्याच्याखाली Captcha दिला जाईल तो भरावा लागेल. त्यानंतर खालच्या बाजूला दिलेले दोन्ही Option तुम्हाला No ठेवायचे आहेत या नंतर Send OTP बटनावर क्लिक करा.
  2. जो मोबाईल नंबर तुम्ही आधार कार्डशी लिंक केलेला आहे त्या नंबर वर एक OTP येईल. तो OTP येथे टाका आणि Submit बटनावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल तेथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. तेथे दिलेल्या Terms Agree करा आणि Submit बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो OTP येथे टाका आणि Validate बटनावर क्लिक करा.
  4. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती असेल. या पुढे खाली दिलेल्या Continue to enter other details बटनावर क्लिक करा.
  5. इथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती (Personal Information) भरावी लागेल. जसे कि Email ID, Marital Status, Blood Group आणि वडिलांचे नाव अशी सर्व माहिती भरुन Save & Continue बटनावर क्लिक करा.
  6. पुढील पेज वर तुम्ही राहत असलेल्या निवासी ठिकाण (Residential Detail) विषयी माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला State, District, Pin code अशी सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर Save & Continue बटनावर क्लिक करा.
  7. पुढच्या पेज वर तुम्हाला शैक्षणिक माहिती (Education Qualification) भरावी लागेल. इथे तुम्ही किती शिकलेले आहात तसेच तुम्ही महिन्याला किती कमवता या विषयी सांगायचे आहे. तुम्ही येथे Education आणि Income Certificate देखील अपलोड करु शकता. पुढे Save & Continue बटनावर क्लिक करा.
  8. पुढील पेजमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसाय (Occupation) व कामाविषयी माहिती द्यावी लागेल. तुम्ही कोणते काम करता ते टाकू शकता किंवा इन्फो आयकॉन वर क्लिक करा तुमच्या समोर एक PDF ओपन होईल.
  9. त्यामध्ये तुम्ही करत असलेले काम शोधून तेथे दिलेला NCO code तुम्ही टाकू शकता. त्या खाली तुम्ही किती वर्षे हे काम करत आहे या विषयी option निवडा. तुम्ही हे काम कोठून शिकला आहेत हे सांगून Save & Continue बटनावर क्लिक करा.
  10. पुढील पेजमध्ये तुम्हाला बँके विषयी माहिती द्यावी लागेल. येथे तुम्हाला अकाऊंट नंबर, खातेदाराचे नाव, IFSC Code अशी सर्व माहिती भरावी लागेल. पुढे Save & Continue बटनावर क्लिक करा.
  11. त्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही वर भरलेली सर्व माहिती दिसेल. ही सर्व माहिती एकदा चेक करुन घ्या. त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा.
  12. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचे ई-श्रम कार्ड तयार झालेले दिसेल. हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी वरच्या बाजूला Download UAN Card असे Option दिसेल त्यावर क्लिक करा.

तुमचे ई-श्रम कार्ड फोनमध्ये PDF फॉरमॅटमध्ये डाउनलोड झालेले दिसेल हे तुम्ही झेरॉक्स मारु शकता तसेच लॅमिनेशन देखील करु शकता. 

ई-श्रम कार्ड फ्री ऑनलाईन काढण्यासाठी वरील सोप्या स्टेप तुम्ही फॉलो करु शकता.


ई-श्रम कार्डचे फायदे।E-Shram card benefits in marathi

  • ई-श्रम कार्ड बनवल्यानंतर आपल्याला २ लाखांपर्यंत पंतप्रधान सुरक्षा विमा योजना प्राप्त होते. 
  • कोणत्याही प्रकारचे लोन मिळण्यासाठी मदत होते.
  • पेंशन डायरेक्ट आपल्याला ई-श्रम कार्डच्या मदतीने बँकेमध्ये मिळते. 
  • असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे एक प्रकारचे Identity Proof आहे. 
  • सरकार कडून तुम्हाला १००० ते ३००० रुपये बँकेमध्ये मिळतील.
  • जर तुम्ही विध्यार्थी असाल तर तुम्हाला Scholarship मिळू शकते.
  • केंद्र सरकार कडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते.

ई-श्रम कार्डचे असे अनेक फायदे आपल्याला मिळतात. तसेच भविष्यामध्ये सरकार असंघटित कामगारांसाठी ज्या सुविधा देईल त्या सर्व सुविधांचा लाभ आपण ह्या ई-श्रम कार्डद्वारे सहज घेऊ शकतो.

मित्रांनो, जर तुम्हाला हे E-Shram card maharashtra online registration कसे करायचे कळले नसेल तर तुम्ही CSC (Common Service Center) मध्ये जाऊन हे कार्ड काढू शकता. परंतु, तेथे तुम्हाला हे कार्ड काढण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

E-Shram card फ्री ऑनलाईन कसे काढायचे हि माहिती तुमच्या व्हाट्सअँप ग्रुपने सगळीकडे Share करा. 

ह्या ब्लॉग वर अशीच उपयुक्त माहिती पोस्ट होत असते. या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment