पुण्यामध्ये bike rent वर कशी घ्यायची । A Beginner’s Guide to Bike on Rent in Pune

जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्याच्या बाहेरुन पुण्यामध्ये फिरण्यासाठी येणार आहे तर पुण्यातील विविध ठिकाणे फिरण्यासाठी bike rent वर घेणे तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय आहे.

पुण्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणे फिरण्यासाठी जर तुम्ही बसने प्रवास केला तर तुम्ही फार tired व्हाल.

त्यामुळे जर तुम्हाला पुण्यामध्ये फिरण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी bike rent वर घ्यायची असेल तर ही पोस्ट वाचणे तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला पुण्यामध्ये बाईक रेंट वर कशी घ्यायची (Bike on Rent in Pune) या विषयी संपूर्ण माहिती देणार आहे.

पुण्यामध्ये bike rent वर का घ्यावी । Why rent a bike in Pune?

bike on rent in pune

पुणे हे महाराष्ट्रातील गर्दीने गजबजलेले आणि इतिहास, संस्कृतीने परिपूर्ण असे शहर आहे. एक्सप्लोर करण्यासाठी इथे असंख्य अशा गोष्टी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे शहर चांगल्या प्रकारे फिरायचे असेल तर बाईक रेंट वर घेणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

पुण्यात बाईक रेंट वर घेण्याची सर्विस जास्त प्रचलित झाली आहे कारण या Services सर्वांना सोयीस्कर आणि परवडण्यासारख्या आहे.

त्यामुळे पुण्यामध्ये Traveling साठी किंवा फिरण्यासाठी बाईक रेंट वर घेणे तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय आहे.


पुण्यामध्ये bike rent वर घेण्याचे फायदे । Benefits of bike on rent in Pune marathi

1. वाहतुकीचे पैसे वाचतात – पुण्यात फिरण्यासाठी जर तुम्ही uber किंवा ola सारख्या services वापरत असाल तर तुमचे खूप पैसे फिरण्यासाठी खर्च होतील. अशा वेळेस जर तुम्ही बाईक रेंट वर घेतली तर तुमचे खूप पैसे वाचतील.

2. फिरण्यासाठी फायदेशीर – पुण्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणे ही दूरदूर आहेत. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस बस किंवा टॅक्सी पाहावी लागेल. पण जर तुम्ही रेंट वर बाईक घेतली असेल तर हे तुम्हाला फिरण्यासाठी फायदेशीर पडेल.

3. Explore करण्यासाठी लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळते – जर तुम्ही पुण्यामध्ये बाईक रेंट वर घेतली तर पुण्यातील विविध ठिकाणे फिरताना तुम्हाला हवे तेथे फिरण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसेच फिरताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला फार कमी वेळ लागेल.


Popular Bike Rental Services in Pune

आता आपण येथे पुण्यातील काही प्रसिद्ध bike rental services विषयी पाहणार आहे. जेथून तुम्ही बाईक रेंट वर घेऊ शकता.

1. Boongg

Boongg ही एक प्रसिद्ध रेंट वर बाईक देणारी सर्विस कंपनी आहे. ही पुण्यासोबत इतर देखील शहरांमध्ये बाईक रेंट वर देण्याचे काम करते. हे तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेसाठी एक हेल्मेट देखील देतात. तसेच हे तुमच्याकडून Zero Deposit घेतात.

Boongg मध्ये तुम्हाला पुढील बाईक रेंट वर मिळतात –

 • Activa
 • Jupiter
 • Maestro
 • Honda Dio
 • Honda Activa 5G
 • Hero Splendor
 • Honda CB Shine
 • Honda CB Hornet
 • Bajaj Avenger
 • Yamaha FZ
 • Bajaj Pulsar
 • TVS Apache

Boongg च्या मदतीने बाईक कशी बुक करायची ?

 1. सर्वात अगोदर Boongg च्या वेबसाईट वर जा. तेथे सिटीमध्ये पुणे सिलेक्ट करा.
 2. त्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेपासून बाईक पाहिजे व किती तारखे पर्यंत पाहिजे ते सिलेक्ट करा.
 3. मग “Rent Now” च्या option वर क्लिक करा. तुमच्या समोर सर्व available bikes दिसतील.
 4. तुम्हाला हवी ती बाईक सिलेक्ट करा व पुण्यामधील कोणत्या area मध्ये ती बाईक तुम्हाला चालवायची आहे ते सिलेक्ट करा व पुढे “Book Now” च्या Option वर क्लिक करा.
 5. तुमच्या समोर नवीन web page open होईल तेथे तुम्हाला बाईकची डिटेल्स आणि रेंट किती आहे ते सर्व दिसेल.
 6. त्या नंतर “Proceed To Payment” option वर क्लिक करा व पेमेंट करुन टाका.
 7. तुम्ही जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला Boongg सेंटरला जाऊन तुम्ही बाईक घेऊ शकता.

Pick-up Instructions

 • बाईक घेताना ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.
 • रायडरने ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कर्मचारी ओळखपत्र किंवा कॉलेज आयडी कार्ड आणि सध्या राहत असलेल्या स्थानिक पत्त्याच्या पुराव्याची प्रत अनिवार्यपणे शेअर करणे आवश्यक आहे.
 • बाईकचा पेट्रोलचा खर्च Rider ला भरावा लागेल.
 • रायडरला Boongg कडून 1 विनामूल्य हेल्मेट मिळेल. जर रायडरला अतिरिक्त हेल्मेट आवश्यक असेल तर अतिरिक्त हेल्मेट शुल्क 50 रुपये प्रत्येक दिवसासाठी आकारले जाईल.

2. Rentrip

Rentrip ही पुण्यात चालणारी दुसरी two wheeler भाड्याने देण्याची सेवा आहे. ते भाड्याने विविध बाईक आणि स्कुटी देतात. Rentrip च्या मदतीने बाईक किंवा स्कुटी बुक करण्यासाठी तुम्ही त्यांच्या अँप किंवा वेबसाईटचा वापर करु शकता.

हे तुम्हाला तुमच्या घरापर्यंत बाईक देखील आणून देतात पण याची Additional fee तुम्हाला द्यावी लागते.

Rentrip वर तुम्हाला केवळ बाईक नाही तर कार व सायकल देखील रेंट वर मिळते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवे ते सिलेक्ट करु शकता.

Rentrip च्या मदतीने बाईक कशी बुक करायची ?

 1. पहिले Rentrip ची वेबसाईट ओपन करा किंवा मग अँप देखील वापरु शकता.
 2. तेथे तुम्हाला बाईक हवी आहे का कार ते सिलेक्ट करा. त्या नंतर City, गाडी किती दिवसांसाठी हवी आहे या सर्व डिटेल्स भरा. मग “Find Bike” वर क्लिक करा.
 3. त्या नंतर तुमच्या समोर सर्व available बाईक दिसतील. तुम्हाला जी बाईक आवडेल ती सिलेक्ट करा आणि “Add to cart” Option वर क्लिक करा.
 4. बाईकचे Payment करा व तुम्ही जी date सिलेक्ट केली होती त्या दिवशी बाईक तुम्ही घेऊ शकता.

3. Gearz vehicle

Gearz Vehicle ग्राहकांना रेंट वर बाईक घेण्याचे एक ऑनलाईन Bike Rental platform provide करते. इथे तुम्ही Daily, Weekly आणि Monthly basis वर बाईक बुक करु शकता.

हा प्लॅटफॉर्म फार प्रसिद्ध आहे कारण हे ग्राहकांना बाईक रेंट वर घेणे फार सोपे करुन देतात.

Gearz Vehicle Bike Rental प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही सहजपणे बाईक बुक करु शकता. तुम्हाला पिकअपची तारीख आणि ड्रॉपऑफची तारीख निवडायची आहे आणि Availability नुसार विविध बाइक्स दाखवल्या जातात.

Gearz Vehicle चे Features काय आहे ?

 • प्रत्येक आठवड्याला बाईक maintenance साठी जातात.
 • ग्राहकाला बाईक सोबत एक Complementary Helmet देखील दिले जाते.
 • हे आपल्याला Transparent Service Provide करतात. कोणतीही गोष्ट आपल्या पासून लपवून ठेवत नाही.
 • आपल्याला Affordable Price मध्ये बाईक मिळते.
 • तुमचे transaction private व RazorPay SSL security द्वारे केले जाते.

4. Gobikes

Gobikes देखील एक प्रसिद्ध बाईक रेंटवर देणारे प्लॅटफॉर्म आहे. देशातील विविध शहरांमध्ये हे बाईक रेंटवर देण्याचे काम करते.

Gobikes द्वारे बाईक रेंटवर घेण्यासाठी तुम्हाला सिटी, तारीख आणि वेळ सिलेक्ट करायची आहे. त्या नंतर तुम्ही available two wheelers मधून बाईक सिलेक्ट करुन payment option निवडा व पेमेंट करा.

तुम्हाला पेमेंट केल्यानंतर बाईकच्या सर्व डिटेल्स मेसेज व ई-मेल केल्या जातील. नंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या तारखेला बाईक येथून घेऊ शकता.

Gobikes चे Features काय आहे ?

 • Discounted rates मध्ये daily, weekly आणि monthly पॅकेज घेऊ शकता.
 • बऱ्याच शहरांमध्ये तुम्हाला Gobikes ची सुविधा पहायला मिळेल.
 • तुम्ही 24*7 म्हणजे दिवस असो किंवा रात्र येथून बाईक बुक करु शकता.
 • तुम्ही पेमेंट करण्याची वेळ देखील निवडू शकता.

वर दिलेल्या bike rental services पैकी तुम्ही एका प्लॅटफॉर्म वरुन बाईक रेंट वर घेऊ शकता. वरील कोणत्याही services मधून बाईक रेंट वर घेण्याअगोदर त्यांचे बाईक संदर्भातील Rules and Regulation एकदा जाणून घ्या.

तसेच ठरलेल्या वेळेत बाईक पुन्हा रिटर्न करा. ज्यामुळे तुमच्या वर कोणतेही extra charges लावले जाणार नाही.

Read – Driving Licence साठी Apply कसे करायचे?


Conclusion

पुण्यात बाईक भाड्याने घेणे (bike on rent in pune) हे शहर आणि आसपासचा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी एक सोयीस्कर आणि किफायतशीर मार्ग provide करते.

कोणतीही नवीन व्यक्ती जी पहिल्यांदा बाईक रेंट वर घेणार आहे त्या व्यक्तीसाठी वरील माहिती फार फायदेशीर आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही सहज स्वतःसाठी बाईक रेंट वर बुक करु शकता.

वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कृपया आम्हाला comment मध्ये सांगा. तुम्हाला अशी माहिती रेगुलर हवी असल्यास उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

जेणे करुन जेव्हा आम्ही नवीन पोस्ट publish करु तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.


FAQ

1. Driving License शिवाय मी पुण्यात बाईक भाड्याने घेऊ शकतो का ?

नाही, पुण्यात बाईक भाड्याने घेण्यासाठी तुमच्या जवळ Driving License असणे फार गरजेचे आहे.

2. बाईक भाड्याने घेण्यासाठी वयाची काही Age Restrictions आहेत का ?

होय, बहुतेक rental services बाईक चालवणाऱ्याचे किमान वय १८ ते २१ असण्याची अट घालतात.

3. Rental Services विमा संरक्षण देतात का ?

अनेक rental services भाड्याने घेतलेल्या बाईकसाठी विमा संरक्षण देतात. बाईक भाड्याने घेण्यापूर्वी एकदा Insurance Coverage ची चौकशी करुन घ्या.

Leave a Comment