बाहेरील देशात आणि भारतात चिकनचा शौक असलेले भरपूर लोक आहेत. बरेच लोक पोल्ट्री फॉर्मच्या चिकन ऐवजी देशी कोंबडा खरेदी करणे जास्त पसंत करतात.
पण असा देखील एक कोंबडा आहे जो या सर्वांपेक्षा महाग व खाण्यासाठी चविष्ट मानला जातो. कोंबड्यांच्या विविध प्रजातींमध्ये कडकनाथ कोंबडा सर्वात महाग असतो. जो प्रामुख्याने मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आढळतो.
पण आता त्याची निर्मिती देशातील इतर भागात ही होऊ लागली आहे. शेतकरी कुक्कुटपालनामध्ये कडकनाथ कोंबडीचे पालन करुन चांगले पैसे कमवत आहे.
कडकनाथ कोंबडीद्वारे भरपूर पैसे कमवा
कडकनाथ कोंबडी खूप खास आहे. ही कोंबडी संपूर्ण काळ्या रंगाची असते तसेच तिचे रक्त, मांस आणि अंडे देखील काळ्या रंगाचे असते. या कोंबडीची चव खाण्यासाठी चांगली आणि प्रोटीन सामान्य चिकनपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने कडकनाथची बाजारामध्ये मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कडकनाथचे पालन मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात केले जाते. परंतु आता वैज्ञानिक संशोधनाच्या मदतीने छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही त्याचे पालन केले जात आहे.
कडकनाथ कोंबडीचे जेड ब्लॅक कॉक, पेन्सिल आणि गोल्डन ब्लॅक असे तीन प्रकार आहेत. जर तुम्हाला कडकनाथ कोंबडीचे पालनपोषण करुन पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे किमान 150 स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे. येथे तुम्ही १०० कोंबड्या पाळू शकता.
हे वाचा – कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई करायची असेल तर अमूल सोबत सुरु करा हा व्यवसाय
कडकनाथ कोंबडी पालनाद्वारे किती पैसे कमवाल?
कडकनाथ कोंबडी चार ते पाच महिन्यात पूर्ण होते. या कोंबडीचे मांस 800 ते 1000 रुपये किलो दराने बाजारात विकले जाते. तसेच या कोंबडीच्या अंड्याची किंमत देखील ५० रुपयांपर्यंत जाते. यामुळे तुमची चांगली कमाई होईल.
साधारण इतर कोंबडींमध्ये 15 ते 25 टक्के फॅट असते. पण कडकनाथ कोंबडीमध्ये शरीराला आवश्यक असे 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रोटीन आढळते. तसेच या कोंबडीचे मांस आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर मानले जाते.