ही मशीन तुम्हाला महिन्याला ४० ते ५० हजार सहज कमवून देईल, गावात किंवा शहरात देखील होईल भरपूर कमाई

जर तुम्हाला कमी भांडवलामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही बिझनेस आयडिया तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे. कारण या व्यवसायामध्ये जे प्रॉडक्ट तुम्ही लोकांना विकणार आहे तिची डिमांड मार्केटमध्ये खूप आहे. तसेच हा प्रॉडक्ट प्रत्येक घरात दररोज वापरला जातो.

तर कोणता आहे हा व्यवसाय? हा व्यवसाय आहे पोहे बनवण्याचा. हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी खर्चात मशीनच्या साहाय्याने सुरु करु शकता आणि तयार झालेले पोहे मार्केटमध्ये दुकानदारांना आणि डिस्ट्रिब्युटरला विकू शकता.

पोहे बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला करेल मालामाल

सकाळी नाश्त्यामध्ये प्रत्येक घरात पोहे हमखास बनवले जातात. सकाळी लोक लवकर जेवण्यापेक्षा चहा सोबत पोहे खाणे जास्त पसंद करतात. आज प्रत्येक घरामध्ये तुम्हाला पोह्याचे एक तरी पॅकेट दिसेल. यामुळे पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरु करणे फायदेशीरच आहे.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त पोहे बनवण्याच्या मशीनची आवश्यकता असते. त्यामुळे जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरु करु शकता.

अशा प्रकारे तयार केले जातात पोहे

पोहे तयार करण्यासाठी आपल्याला पहिले तांदळातून दगड किंवा खडे बाजूला काढावे लागतात. ज्यामुळे पोह्यांची गुणवत्ता खराब होत नाही. नंतर हे तांदूळ साफ करुन ४० मिनिटांसाठी गरम पाण्यात ठेवले जातात. मग ते पाण्यातून काढून कोरडे होण्यासाठी ठेवले जातात.

त्या नंतर तांदूळ भाजले जातात. तांदूळ भाजण्यासाठी तुम्ही रोस्टर मशीन किंवा ओव्हनचा वापर करु शकता. अशा प्रकारे तांदूळ भाजल्यामुळे भाताला जोडलेली भुसी वेगळी होते. नंतर भुसे वेगळे केल्यानंतर ते फिल्टर केले जातात जेणे करुन इतर प्रकारचे पदार्थ त्यांच्यापासून वेगळे करता येतात.

ही प्रोसेस झाल्यानंतर ते पोहे बनवण्याच्या मशीनमध्ये टाकले जातात. ज्यामुळे त्यांना पोह्याचा आकार येतो. आता तुम्ही या तयार झालेल्या पोह्यांची पॅकिंग करुन दुकानांमध्ये पाठवू शकता.

व्यवसाय सुरु करण्यासाठी ऐवढा येईल खर्च

पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला एका मशीनची आवश्यकता असते. जिच्या मदतीने तुम्ही जास्त प्रमाणात पोहे तयार करु शकता. मार्केटमध्ये पोहे बनवण्याची मशीन ५० हजार पासून ते २ लाखांपर्यंत मिळून जाते. तुम्ही तुमच्या बजेट नुसार ही मशीन खरेदी करु शकता.

पोहे बनवण्याची मशीन पहा

मशीन व्यतिरिक्त तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी जागेची आवश्यकता असते. तुम्ही हवे तर घरुन देखील हा व्यवसाय सुरु करु शकता. जवळपास ६० ते ७० हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता.

हे पहा – खाकरा बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला महिन्याला कमवून देईल ३० ते ४० हजार रुपये

किती पैसे कमवाल?

पोहे तयार करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कच्चा माल खरेदी करावा लागतो. यासाठी जवळपास ६ लाख रुपये खर्च येतो. या व्यतिरिक्त तुम्हाला ५० हजाराचा खर्च करावा लागतो. अशा प्रकारे तुम्ही १००० क्विंटल पोहे तयार कराल.

१० लाख रुपयांमध्ये तुम्ही १००० क्विंटल पोहे तयार करुन विकू शकता. यामध्ये ८ लाख ६० हजार तुमचा उत्पादन खर्च असेल आणि १ लाख ४० हजार तुमचा नफा असेल.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment