Antivirus म्हणजे काय आणि याचे फायदे काय आहेत।Antivirus meaning in marathi

तुम्हाला Antivirus म्हणजे काय (Antivirus meaning in marathi) माहित आहे का ? Antivirus एक प्रकारचा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे जो डिव्हाईस मधील virus काढून टाकण्याचे काम करतो. 

आपल्याकडे असणाऱ्या डिव्हाईससाठी अँटीव्हायरस असणे फार गरजेचे असते. जेणे करुन आपला सर्व डेटा सुरक्षित राहील. अँटीव्हायरस नसल्यास आपल्या डिव्हाईस मधील सर्व डेटा नष्ट होऊ शकतो. 

इंटरनेटचा वापर करत असताना आपल्याकडे असणाऱ्या डिव्हाईस मधील डेटा सुरक्षित ठेवणे देखील गरजेचे असते. हे सर्व काम अँटीव्हायरस खूप चांगल्या प्रकारे करते. 

अँटीव्हायरसची निर्मिती हि सिस्टिममध्ये लपवून बसलेल्या विविध प्रकारचे व्हायरस किंवा Malware शोधून काढण्यासाठी करण्यात आली होती. अँटीव्हायरस हे डिव्हाईसचे एक प्रकारे सुरक्षा रक्षक असतात. 

आज आपण डिव्हाईसच्या अशाच सुरक्षा रक्षक म्हणजे Antivirus विषयी माहिती घेणार आहोत.

Antivirus म्हणजे काय।Antivirus meaning in Marathi

” Antivirus एक प्रकारचा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे जो डिव्हाईस मधील व्हायरस शोधून ते डिलीट करण्याचे काम करते तसेच इतर नवीन व्हायरसला सिस्टिममध्ये येण्यापासून थांबवते. “

अँटीव्हायरसमुळे आपला कॉम्प्युटर व फोन सुरक्षित ठेवण्यासाठी मदत मिळते. जर तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्या सिस्टिममध्ये अँटीव्हायरस असणे फार गरजेचे आहे. 

कारण इंटरनेट अशी जागा आहे जेथून व्हायरस तुमच्या डिव्हाईसमध्ये शिरतो. एकदा व्हायरस तुमच्या डिव्हाईसमध्ये घुसला त्यानंतर तो तुमच्या डेटाचा गैरवापर किंवा तो नष्ट देखील करु शकतो.


Antivirus ची वैशिष्ट्ये

अँटीव्हायरसची प्रामुख्याने दोन वैशिष्ट्ये आहे.

  1. Background Scanning
  2. Full System Scan

1. Background Scanning

ज्या वेळेस आपण डिव्हाईसमध्ये एखादे काम करत असतो किंवा ऑनलाईन काही तरी करत असतो त्या वेळेस अँटीव्हायरस Background मध्ये काम करत असते. 

Background मध्ये हे आपल्या सिस्टिममध्ये असणाऱ्या सर्व फाईल तपासत असते जेणे करुन जर एखादा व्हायरस असला तर त्याला त्वरित बाहेर काढता येईल. यामुळे Real टाईममध्ये किंवा डिव्हाईस चालू असताना व्हायरस आतमध्ये घुसणे शक्य नसते.

2. Full System Scan

अँटीव्हायरसच्या या सुविधेमुळे आपण एकाच वेळेस संपूर्ण डिव्हाईस स्कॅन करु शकतो. पण Background Scanning मुळे शक्यतो संपूर्ण सिस्टिम स्कॅन करण्याची गरज पडत नाही.

जर तुम्ही पहिल्यांदाच डिव्हाईसमध्ये अँटीव्हायरस install केले असेल तर Full System Scan करणे गरजेचे आहे. जेणे करुन अगोदर जर एखादा Virus किंवा Malware असला तर तो काढून टाकता येईल. 

जर तुम्ही पहिल्यांदाच अँटीव्हायरस Install केले असेल तर तुमचे डिव्हाईस एकदा Full System Scan करुन घ्या.


Antivirus सॉफ्टवेअर कसे काम करते ?

अँटीव्हायरस म्हणजे काय पाहिल्यानंतर आपण पाहूया कि हे काम कशा प्रकारे करते किंवा व्हायरस कशा पद्धतीने शोधून काढते. 

अँटीव्हायरसमध्ये अगोदर पासून व्हायरस Signature म्हणजेच Virus Defination File असते. या फाईलमध्ये Malware संबंधित माहिती असते. 

अँटीव्हायरस Virus Defination फाईल शिवाय मालवेअर(malware) ओळखू शकत नाही. मालवेअर Defination फाईलमध्ये जुन्या सर्व मालवेअर विषयी माहिती असते. म्हणून Virus Defination फाईल वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे असते. 

ज्यावेळी एखादी फाईल मालवेअरने बाधित असते त्या वेळेस अँटीव्हायरस Virus Defination च्या मदतीने त्या मालवेअर विषयी काही माहिती आहे का ते पाहते. Virus Defination मध्ये मालवेअर माहिती व त्याच्याशी निगडित काही प्रोग्रॅम राहतात.

अशा प्रोग्रॅमच्या मदतीने मालवेअर बाहेर काढून टाकणे सोपे होते. म्हणून अँटीव्हायरस कंपनी वेळोवेळी Virus Defination फाईल अपडेट करत असते. 

Virus Defination मदतीने मालवेअर सापडल्यानंतर अँटीव्हायरस ती फाईल किंवा सॉफ्टवेअर रिकव्हर किंवा आपण अनुमती दिल्यास डिलीट देखील करते. 

अशा प्रकारे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर काम करते.


Antivirus चे फायदे काय आहेत ?

इंटरनेट ज्या वेगाने पसरत चालले आहे त्याच प्रमाणे ऑनलाईन डेटा चोरीला जाणे किंवा डिव्हाईस हॅक होणे या सारख्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. 

अशा परिस्थितीत स्वतःच्या डेटाचे संरक्षण करणे फार गरजेचे आहे. यासाठी अँटीव्हायरस फार उपयोगी ठरते. 

अँटीव्हायरसमुळे आपला डेटा तसेच गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी मदत मिळते. अँटीव्हायरसचे काही फायदे तुम्ही खाली पाहू शकता.

  • आपला सर्व डेटा सुरक्षित ठेवते.
  • एखादे सॉफ्टवेअर सुरक्षित डाउनलोड आणि Install करु शकता.
  • कॉम्प्युटर मधील तुमचा डेटा इंटरनेटच्या माध्यमातून कोणी ही चोरु शकत नाही.
  • अँटीव्हायरसचे Paid Version असेल तर सर्व ऑनलाईन Transaction सुरक्षित होतील.
  • तुमचे सिस्टिम Slow किंवा हँग होणार नाही.
  • सिस्टिम सॉफ्टवेअर आणि अँप्लिकेशन सॉफ्टवेअर खूप Smooth काम करतील.
  • हार्ड डिस्क Corrupt होण्याची संभावना फार कमी आहे.

कॉम्प्युटर किंवा फोनसाठी Best Antivirus कोणते आहेत ?

सर्व जण आज कॉम्प्युटरचा वापर करतात असे नाही त्यामुळे मी तुम्हाला येथे अँड्रॉईड फोनसाठी देखील चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कोणते आहेत या विषयी माहिती सांगणार आहे.

अँड्रॉईड फोनसाठी Best अँटीव्हायरस

  • 360 Security
  • Avira Antivirus
  • Norton Security
  • Avast mobile security
  • AVG Antivirus Security

आयफोनसाठी Best अँटीव्हायरस

  • F-Secure
  • MC Afee
  • Lookout
  • Phone Guardian

कॉम्प्युटरसाठी Best अँटीव्हायरस

  • Norton अँटीव्हायरस
  • F-Secure अँटीव्हायरस
  • Avast Free अँटीव्हायरस
  • Avira Free अँटीव्हायरस
  • Mcafee Antivirus Plus

तुमच्याकडे कॉम्प्युटर असल्यास किंवा फोन असल्यास तुम्ही वरील अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरु शकता. तुम्ही वरील सॉफ्टवेअरची नावे Google वर सर्च केल्यानंतर तुम्हाला ती मिळतील. 

अँटीव्हायरसच्या official वेबसाईट वरुन तुम्ही ते डाउनलोड करु शकता.

हे वाचा – स्पॅम म्हणजे काय आणि या पासून सुरक्षित कसे रहायचे ?


आज तुम्ही काय शिकलात ?

आज मी तुम्हाला येथे Antivirus म्हणजे काय (Antivirus meaning in marathi) या विषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच तुमच्या जवळ असलेल्या फोन किंवा कॉम्प्युटर/लॅपटॉपसाठी चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कोणते आहेत हे सांगितले.

तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच तुमचे सिस्टिम हॅक होऊ नये यासाठी Antivirus असणे किती गरजेचे आहे हे तुम्हाला आता कळलेच असेल. 

तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास कृपया मला कंमेंटमध्ये कळवा.

ह्या ब्लॉग वर अशीच उपयोगी माहिती पोस्ट होत असते. जर तुम्हाला ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन पोस्ट विषयी माहिती करुन घ्यायचे असेल तर डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

जेणे करुन जेव्हा ह्या ब्लॉग वर नवीन पोस्ट Publish होईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. 

वरील संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद.

1 thought on “Antivirus म्हणजे काय आणि याचे फायदे काय आहेत।Antivirus meaning in marathi”

Leave a Comment