आज आपण विविध कामासाठी इंटरनेटचा वापर करत आहोत. इंटरनेट मुळे आपले खूप सारे काम सोपे झाले आहे. आज खूप सारे मोठे व्यवसाय इंटरनेट वर अवलंबून आहेत. पण ज्या प्रकारे काही गोष्टींचे फायदे असतात त्याच प्रकारे त्याचे तोटे देखील असतात.
इंटरनेट वर होणाऱ्या हॅकिंग विषयी तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल. एक हॅकर विविध कारणासाठी विविध प्रकारे आपला फोन किंवा आपले बँक अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या मधीलच हॅकिंगचा एक प्रकार म्हणजे फिशिंग.
आज मी तुम्हाला फिशिंग म्हणजे काय (phishing meaning in marathi) असते. तसेच फिशिंग अटॅक पासून आपण आपले संरक्षण कसे करु शकतो या विषयी माहिती सांगणार आहे. आपल्या मधील कोणावर हि फिशिंग अटॅक होऊ शकतो त्यामुळे हि माहिती आपल्याला ठाऊक असणे गरजेचे आहे.
फिशिंग म्हणजे काय।Phishing meaning in Marathi
फिशिंग हॅकिंगची अशी पद्धत आहे ज्यामध्ये हॅकर आपल्या बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे आयडी व पासवर्ड माहीत करुन घेण्यासाठी आपल्याला SMS किंवा ई-मेल पाठवतात.
हा SMS किंवा ई-मेल बँकेच्या नावाने पाठवला जातो. हा ई-मेल हुबेहूब बँके सारखा असतो. त्यामुळे लोकांना कळत नाही. पण ह्या फेक SMS किंवा ई-मेलचा URL Address मध्ये फरक असतो.
फिशिंग Attack चा वापर कसा केला जातो ?
हॅकर लोकांना विविध प्रकारचे ई-मेल पाठवतात. ह्या ई-मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण फिशिंग पेज वर जातो. पण हे फिशिंग पेज ओरिजनल पेज प्रमाणे असल्याने आपल्याला कळत नाही.
ह्या फिशिंग पेजमध्ये आपण आयडी व पासवर्ड टाकल्या नंतर आपल्याला ओरिजनल पेजवर Redirect केले जाते व आपण जो आयडी व पासवर्ड टाकतो तो हॅकरकडे जातो.
फिशिंग पेज व ओरिजनल पेज यामध्ये फरक असतो तो URL Address मध्ये त्यामुळे तुम्ही ज्या वेबसाईट वर जाल त्या वेबसाईटचा URL Address चेक करा.
फिशिंग Attack चे प्रकार
फिशिंग attack मध्ये देखील प्रकार असतात. हॅकर विविध फिशिंगचे प्रकार वापरुन आपली वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करु शकतो. फिशिंग attack चे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
1. SMS फिशिंग
SMS चा वापर बँकेची डिटेल्स माहिती करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही शक्यतो गरज नसल्यास SMS कडे लक्ष देऊ नका.
2. Voice फिशिंग
फिशिंगच्या ह्या प्रकारामध्ये हॅकर तुम्हाला बँकेच्या नावाखाली कॉल करु शकतो आणि मग तुमच्या कडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती मागू शकतो. तुम्ही हॅकिंगचा असा प्रकार ऐकला असेल जेथे बँकेच्या नावाखाली दुसरा व्यक्ती कॉल करतो.
3. स्पिअर फिशिंग
स्पिअर फिशिंग अटॅक कंपनीवर किंवा कंपनीतील विशिष्ट व्यक्तीवर केला जातो. यामध्ये ज्या व्यक्तीवर अटॅक होणार आहे त्या व्यक्तीची माहिती कंपनीतून नाव, पत्ता, फोन नंबर हि सगळी माहिती गोळा केली जाते.
4. फार्मिंग Attack
फार्मिंग attack मध्ये यूझरला एखाद्या लिंकच्या मदतीने फेक वेबसाईट वर पाठवले जाते. हि फेक वेबसाईट एकदम खरी वेबसाईट प्रमाणे दिसत असल्यामुळे आपल्याला कळून येत नाही.
अशा फेक वेबसाईट मध्ये आपण जेव्हा आपला आयडी व पासवर्ड टाकतो तेव्हा आपल्याला खऱ्या वेबसाईट वर redirect केले जाते व आपण जो आयडी व पासवर्ड टाकतो तो हॅकर कडे जातो.
फिशिंग Attack पासून कसे वाचायचे ?
जर तुम्हाला फिशिंग attack ला बळी नसेल पडायचे तर तुम्ही इंटरनेटचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही इंटरनेट वापरताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. तसेच अनोळखी वेबसाईट वर ई-मेल आयडी व पासवर्ड टाकू नका.
- तुम्ही ज्या वेबसाईट वर जाल त्या वेबसाईटच्या लिंकमध्ये https आहे का हे पहा. तसेच डोमेन नाव एकदा चेक करा.
- तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करताना URL कडे लक्ष द्या.
- कोणतेही स्पॅम मेल ओपन करु नका आणि अशा मेलमध्ये असलेल्या लिंकवर देखील क्लिक करु नका.
आज तुम्ही काय शिकलात ?
आज मी तुम्हाला फिशिंग विषयी माहिती (phishing meaning in marathi) सांगितली.
माझे काम जर तुम्हाला आवडत असेल व मी दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त आहे असे वाटत असेल तर कृपया मला कंमेंटमध्ये कळवा.
सोबतच डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा जेणे करुन मी जेव्हा नवीन माहिती पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.