तुम्ही जास्त प्रॉफिट देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात आहात का? तर मग हा खास व्यवसाय फक्त तुमच्यासाठी. हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये उत्पादन खर्च फार कमी आणि त्या उत्पादनाची विक्री ही जास्त किंमतीला केली जाते.
हा व्यवसाय करुन तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार हे नक्की पण यामध्ये तुम्हाला तुमचा तयार केलेला माल विकण्यासाठी डिस्ट्रिब्युटर आणि दुकानांशी संपर्क साधावा लागेल.
सर्जिकल कॅप बनवून होईल बंपर कमाई
सर्जिकल कॅप या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स मोठ्या प्रमाणात वापरतात. तसेच सध्या लोक प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी देखील याचा वापर करु लागले आहे. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सर्जिकल कॅपची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या बाजारपेठमध्ये सर्वे करुन पाहू शकता कोणी सर्जिकल कॅप बनवून विकत आहे का.
जर कोणी स्वतःहून सर्जिकल कॅप बनवत नसेल तर तुम्ही हा व्यवसाय त्वरित सुरु करु शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी जागा आणि एका मशीनची आवश्यकता असते. बाजारामध्ये सर्जिकल कॅप बनवण्यासाठी Automatic Bouffant Cap Making Machine उपलब्ध आहे. या मशीनद्वारे तुमचे सर्जिकल कॅप बनवण्याचे काम खूप सोपे होईल. ही Automatic Bouffant Cap Machine १ तासामध्ये १५,००० प्रॉडक्ट तयार करते.
हे पहा – घरी बसून महिला सुरु करु शकतील हे ३ व्यवसाय, महिन्याच्या शेवटी होईल भरपूर कमाई
भांडवल आणि कमाई
सर्जिकल कॅप मशीनचे mini version तुम्हाला बाजारात ५ लाखांपर्यंत मिळून जाईल. एक सर्जिकल कॅप बनवण्यासाठी ५० पैसे खर्च येतो आणि ही एक सर्जिकल कॅप बाजारामध्ये ५ रुपयांना विकली जाते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅपमध्ये भरपूर प्रॉफिट शिल्लक राहते.
ही मशीन १ तासात १५,००० प्रॉडक्ट तयार करते. जर तुम्ही दुकानात, डिस्ट्रिब्युटरला किंवा ग्राहकांना ही कॅप विकून जर तुम्हाला प्रत्येक कॅपमागे ४ रुपये प्रॉफिट राहिला तर १५,००० कॅप विकून तुम्हाला ६० हजारांचा प्रॉफिट होईल.
या व्यतिरिक्त तुम्ही काही लोकांना कामावर ठेऊन गर्दीच्या ठिकाणी किंवा ट्रॅफिक सिग्नलच्या जवळ कॅप विकण्यास सांगू शकता. अशा प्रकारे जर तुमच्या लोकांनी दिवसाला केवळ १०० कॅप विकल्या तर ४ रुपये प्रॉफिट प्रमाणे तुम्ही दिवसाला ४०० म्हणजे महिन्याला १२ हजार अधिक पैसे कमवू शकाल.