घरी बसून महिला सुरु करु शकतील हे ३ व्यवसाय, महिन्याच्या शेवटी होईल भरपूर कमाई

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आज मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला हाऊसवाइफ असल्याचे दिसून येते. महिलांना देखील आपण घरी बसून एखादा व्यवसाय सुरु करावा आणि स्वतः थोडे फार पैसे कमवावे असे वाटते. पण कोणता व्यवसाय सुरु करायचा हे त्यांना कळत नाही. जर तुम्हाला देखील व्यवसाय करायचा आहे पण कोणता करावा हे कळत नाही तर तुम्ही खाली दिलेल्या पैकी एक व्यवसाय सुरु करु शकता.

लोणचे बनवून होईल कमाई

देशामध्ये प्रत्येक राज्यात लोणचे जास्त प्रमाणात खाल्ले जाते. जेवणासोबत चांगली चव मिळावी म्हणून लोणचे सर्व जण खातात. आपण हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलो तेथे सुद्धा आपल्याला लोणचे जेवताना प्रोवाइड केले जाते. तुम्ही देखील घरबसल्या लोणचे बनवू शकता आणि दुकानदारांना किंवा हॉटेलमध्ये तुम्ही बनवलेल्या लोणच्याचा सॅम्पल देऊ शकता.

जर त्यांना तुमचे लोणचे आवडले तर तुम्ही त्यांना लोणचे त्यांच्या ग्राहकांना विकण्यासाठी पुरवू शकता. तसेच तुम्ही तयार केलेले लोणचे ऑनलाईन देखील विकू शकता.

टिफिन सेवेतून कमाई

शिक्षण आणि रोजगारासाठी लोक घरापासून लांब शहरात येतात. तेथे त्यांना घरच्यासारखे जेवण मिळत नाही. जर जेवण बाहेर खायचे झाल्यास ते त्यांना परवडत देखील नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना टिफिन सर्विस प्रोवाइड करु शकता.

बाहेरील गावामधून येऊन जे लोक रुम घेऊन राहत आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना टिफिन सर्विस प्रोवाइड करणे सुरु करु शकता. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही टिफिन सर्विस द्याल. तेवढ्या जास्त प्रमाणात तुमची कमाई देखील वाढत जाईल.

हे पहा –  ही मशीन महिलांना महिन्याला कमवून देईल ३० हजार रुपये

कॅन्टीन सुरु करु शकता

कॅन्टीनसाठी जेवण बनवणे हा पैसे कमवण्याचा एक चांगला पर्याय आहे. लोक तुम्हाला त्यांना काय खायला हवे ते सांगतील आणि तुम्हाला फक्त त्यांच्या सांगण्यानुसार जेवण बनवायचे आहे. या व्यतिरिक्त जे लोक कंपनीत जेवण्यासाठी बाहेरुन जेवण मागवतात त्यांच्याकडून देखील तुम्ही जेवण्याच्या ऑर्डर घेऊ शकता.

वर दिलेल्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय तुम्ही सुरु करुन महिन्याच्या शेवटी चांगली कमाई करु शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment