आपल्या मधील बरेच जण अशा भागात किंवा गावामध्ये राहता जेथे फोन करण्याची सुविधा नाही आणि असली तरी तेथे नेटवर्क नसते. ज्याच्या मुळे आपल्याला कोणाला पण कॉल करता येत नाही.
तुम्ही सुद्धा अशाच ठिकाणी राहता का ?
जर राहत असाल तर काळजी करु नका. कारण आज मी तुमची हि समस्या दूर करणार आहे.
आज मी तुमच्यासाठी फोनमधील अशी टिप (Trick) घेऊन आलो आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी रेंज किंवा नेटवर्क नसले तरी सुद्धा कॉल करु शकता आणि आवाज सुद्धा स्पष्ट ऐकू शकता.
हो, तुम्ही जे ऐकले ते खरे आहे. ती फोनमधील Trick म्हणजे Wifi Calling.
Wifi Calling म्हणजे काय।Wifi Calling in marathi
Wifi Calling हि फोन मधील अशी सुविधा आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही Wifi द्वारे कॉल करु शकता. तेही सिम कार्डमध्ये balance नसताना.
Wifi Calling हे जसे आपण Normal कॉल करतो त्या प्रमाणेच आहे. परंतु, यामध्ये आपण Wifi च्या नेटवर्कच्या मदतीने कॉल करतो.
Wifi Calling करण्यासाठी आपल्याला कोणते हि अँप Install करण्याची किंवा Special रिचार्ज करण्याची गरज नसते. हि सुविधा फ्री मध्ये मिळते.
Wifi Calling च्या मदतीने तुम्ही एखाद्याला कॉल करु शकता. त्या बरोबर मेसेज देखील पाठवू शकता.
Wifi Calling कसे काम करते ?
आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती सोबत बोलत असतो तेव्हा आपण जे बोलत आहोत तो message (संवाद) तुम्ही ज्या कंपनीचे सिम कार्ड वापरत आहात त्या टॉवर पर्यंत जातो. आणि मग तेथून त्या व्यक्तीपर्यंत तो message जातो.
परंतु Wifi Calling मध्ये तुम्ही wifi शी connect असता. अशा वेळी तुम्ही फोनवर जे काही बोलत आहात तो संवाद wifi च्या मदतीने टॉवर पर्यंत जलद गतीने जातो. यामुळे संवादाची देवाण-घेवाण पटकन होते.
तुम्ही जेथे राहता तेथे नेटवर्क नसल्यास एखाद्याचे Wifi घेऊन कॉल करु शकता.
परंतु, Wifi Calling करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असणे आणि तुमचा फोन एखाद्या Wifi शी Connect असणे गरजेचे आहे.
तुमच्या फोनमध्ये जर सिम कार्ड नसेल तर तुम्ही Wifi Calling चा वापर करु शकणार नाही.
Wifi Calling कसे चालू करावे ?
Wifi Calling चालू करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा Setting मध्ये जावे लागेल. Setting मध्ये गेल्यानंतर Sim Card मध्ये जा.
तेथे तुम्हाला Wifi Calling चे Option दिसेल ते चालू करा.
काही फोनमध्ये Setting वेगळी असू शकते. त्यासाठी तुम्ही Setting मध्ये गेल्यानंतर सर्वात वरती तुम्हाला Search करण्याचे Option दिसेल. त्यावर Click करुन Wifi Calling Search करा आणि त्यावर Click करुन Wifi Calling चालू करा.
Wifi Calling च्या मदतीने फोन कसा करायचा ?
तुम्हाला पहिल्यांदा एखाद्या Wifi शी कनेक्ट व्हावे लागेल. Wifi शी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्ती सोबत बोलायचे आहे त्याचा नंबर Dial करा आणि कॉल करा.
तुम्हाला हि मोबाईल टिप कशी वाटली मला कंमेंटमध्ये सांगा.
तुमच्या मित्रांना Wifi Calling करुन मोफत गप्पा मारा. तसेच हि माहिती तुमच्या मित्रांसोबत Share करा.