फोन हरवल्यानंतर लगेच ह्या गोष्टी करा।Lost of mobile phone in marathi

आपल्या मधील बरेच लोक फोन हरवल्यानंतर एकदम घाबरुन जातात. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते की जर आपला फोन कुणाला मिळाला तर तो त्याचा गैरवापर करेल. 

बरेच जण Net Banking ची सुविधा वापरत असल्याने त्यांची बँकशी निगडित सर्व माहिती जसे कि अकाउंट नंबर, पासवर्ड इत्यादी सर्व माहिती मोबाईलमध्ये Save असते. 

तुमची सुद्धा बँक Details मोबाईलमध्ये Save आहेत का?

एवढेच नाही तर खूप जण आपले Personal Chats इतरांपासून लपवून ठेवतात. 

आपले वैयक्तिक फोटो कोणी पाहू नये यासाठी विविध प्रकारचे पासवर्ड किंवा पॅटर्न Save करतात. 

पण एकदा फोन चोरीला गेल्यावर ह्या सर्व गोष्टींचा काही फायदा होत नाही. कारण आपला फोन आता दुसऱ्या कुणाच्या तरी हातामध्ये आहे. 

आपला फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास काय करायचे हे तुम्हाला माहीत आहे का?

अशा परिस्थितीत काय करायचे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. 

आपण खालील गोष्टींवर माहिती पाहणार आहोत. 

  1. फोन कसा शोधायचा ?
  2. फोन सुरक्षित कसा करायचा ?

फोन कसा शोधायचा ?

जर तुमच्या कडे अँड्रॉईड फोन असेल तर तुम्हाला Find My Device आणि आयफोन असेल तर Find My हे tool वापरायचे आहे. 

तुम्हाला Google मध्ये किंवा Chrome browser वर फक्त Find My Device असे Search करायचे आहे आणि Google तुम्हाला तुमच्या फोनची Last location दाखवेल. 

Find My Device च्या मदतीने तुम्ही तुमच्या फोन मधील सर्व डेटा सुरक्षित किंवा delete देखील करु शकता. 

Lost of mobile phone in marathi

या सोबतच तुम्ही तुमच्या फोन वर कॉल करुन पहा जर रिंग ऐकू येत असेल म्हणजे तुमचा फोन जवळच कुठे तरी पडला आहे. जिथे-जिथे तुम्ही फोन वापरला होता तिथे एकदा चेक करा. 

जर कॉल करुन रिंग वाजत नसेल किंवा फोन Switch off झाला असेल तर समजून जा कि तुमचा फोन आता चोरी झाला आहे. 

अशा वेळी तुम्हाला पुढील स्टेप करायची आहे ती म्हणजे फोन सुरक्षित करणे. 

फोन सुरक्षित कसा करायचा ?

तुम्हाला सर्व प्रथम तुमच्या फोनमध्ये ज्या कंपनीचे सिम कार्ड आहे. त्या कंपनीच्या Customer Care नंबर वर कॉल करुन तुमचे सिम कार्ड ब्लॉक करायला सांगा. 

कारण तुमचे सिम कार्ड हे तुमच्या सोशल मीडिया अकाउंट सोबत कनेक्ट असते. तसेच हा नंबर बँक अकाउंटशी देखील Connect असतो. त्यामुळे नंबर ब्लॉक करणे गरजेचे आहे. 

यानंतर तुम्हाला फोनचा IMEI नंबर ब्लॉक करणे देखील गरजेचे आहे. IMEI नंबर ब्लॉक केल्याने जर कोणी त्या फोनमध्ये दुसरे सिम कार्ड टाकले तरी ते चालू होणार नाही. 

थोडक्यात तो फोन आता कोणीही वापरु शकत नाही. 

IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फोन हरवल्याची Complaint करावी लागेल. यानंतर तुम्हाला त्यांच्या कडून एक पोलीस Complaint नंबर मिळेल. 

त्यानंतर खालील लिंक वर क्लिक करा. 

लिंक वर क्लिक करा

तुमच्या समोर पुढील वेबसाईट ओपन होईल. 

Lost of mobile phone in marathi

तुम्हाला Block Stolen/Lost Mobile option वर क्लिक करायचे आहे. 

Lost of mobile phone in marathi

तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. तो व्यवस्थित भरुन त्यामध्ये पोलीस Complaint नंबर टाकून फॉर्म Submit करायचा आहे. यानंतर तुमचा IMEI नंबर ब्लॉक केला जाईल. 

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोन सुरक्षित करु शकता. 

मी आशा करतो तुम्हाला आता फोन हरवल्यानंतर काय करायचे आहे हे कळाले असेल. 

हि संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment