जर तुम्हाला वर्षातील काही महिन्यांमध्ये लाख रुपये कमवून देणारा व्यवसाय करायचा असेल तर दिवाळीचा महिना तुमच्यासाठी व्यवसाय करण्यासाठी एकदम उत्तम राहील. पुढील काही महिन्यानंतर दिवाळी येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला देखील दिवाळीत एखादा व्यवसाय करुन भरपूर पॆसे कमवायचे असतील तर तुम्ही एकदम योग्य जागी आला आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा ४ व्यवसायां बद्दल सांगणार आहे जे तुम्ही दिवाळीमध्ये करु शकता आणि जेव्हा दिवाळी संपेल तेव्हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये जमा झालेले असतील.
दिवाळी सुरु होण्यापूर्वी श्रीमंत व्हा
संपूर्ण वर्षांमध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला पहायला मिळतो. प्रत्येकाच्या घरी नातेवाईकांची गर्दी जमलेली असते. तसेच लोक दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप साऱ्या नवीन गोष्टी देखील विकत घेतात.
त्यामुळे दिवाळीमध्ये एखादी ठराविक वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरु करणे आपल्यासाठी फार फायदेशीर सिद्ध होईल. कारण दिवाळीमध्ये प्रत्येक गोष्ट ही मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि याच संधीचा फायदा आपण व्यवसाय करण्यासाठी घेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया दिवाळीमध्ये आपण कोणते ४ व्यवसाय करु शकतो.
हे ४ व्यवसाय तुम्हाला करतील मालामाल
जर तुम्हाला खरोखरच दिवाळीमध्ये एखादा व्यवसाय सुरु करुन चांगले पैसे कमवायचे असतील तर हे खालील ४ व्यवसाय तुम्ही करु शकता. कारण या ४ व्यवसायांना दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त मागणी असते.
1. मातीचे दिवे
मातीच्या दिव्यांना वर्षांमध्ये सगळ्यात जास्त मागणी ही दिवाळीमध्ये असते. दिवाळीमध्ये घराच्या उंबऱ्यामध्ये दिवे लावले जातात. तसेच घर सजवण्यासाठी देखील या मातीच्या दिव्यांचा वापर केला जातो.
जर तुम्ही आता आकर्षक असे मातीचे दिवे तयार केले आणि मार्केटमध्ये जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी विकायला ठेवले तर जास्तीत जास्त लोकांची नजर तुमच्या दिव्यांकडे पडेल आणि ते लोक दिवे खरेदी देखील करतील. या व्यतिरिक्त गर्दीच्या ठिकाणी दुकान टाकल्यामुळे तुमची मार्केटिंग देखील चांगली होईल.
2. इलेक्ट्रॉनिक लाईट
दिवाळीमध्ये जर लाईटिंगची चकमकाक नसेल तर मग ती दिवाळी कसली. दिवाळीमध्ये प्रत्येक घराला लाईटिंगद्वारे सजवले जाते. घराच्या वर लावण्यात येणाऱ्या आकाश कंदीलला देखील आकर्षक अशी लाईटिंगद्वारे सजावट केली जाते.
आता सगळीकडे देवी बसणार आहे आणि मग दसरा देखील येणार आहे. त्यामुळे दिवाळी सोबत तुम्ही देवीच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात लाईट विकू शकतात.
3. लक्ष्मीची मूर्ती
दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मी देवीची घरोघरी पूजा केली जाते. त्यामुळे खूप लोक लक्ष्मी पूजन करण्यासाठी लक्ष्मी देवीची मूर्ती बाजारातून खरेदी करतात. ही मूर्ती मातीच्या साहाय्याने लहान आकारामध्ये तयार केली जाते आणि त्यावर थोडे कलर काम देखील केले जाते.
4. मेणबत्तीचा व्यवसाय
मेणबत्तीची मागणी संपूर्ण वर्षभर असते पण दिवाळीमध्ये ही जास्त प्रमाणात विकली जाते. दिवाळीमध्ये घराला सजावट करण्यासाठी या मेणबत्तीचा वापर केला जातो. तुम्ही विविध आकारात मेणबत्ती तयार करुन ती लोकांना विकू शकता. साधारणपणे बाजारामध्ये आपल्याला मेणबत्ती सरळ आकाराची दिसून येते पण जर तुम्ही ती वेगळ्या आकारात तयार केली तर लोक तुमच्या मेणबत्या जास्त प्रमाणात खरेदी करतील.
हे पहा – घराला स्मार्ट बनवण्याचा व्यवसाय तुमचे नशीब बदलेल, महिन्याच्या अखेरीस होईल लाखोंची कमाई
घरुनच सुरु करु शकता हे व्यवसाय
दिवाळीमध्ये सुरु करण्यासाठी जे ४ व्यवसाय आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व व्यवसाय तुम्ही घरी बसून सुरु करु शकता. तुम्हाला फक्त हे व्यवसाय सुरु करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता पडेल. तसेच या व्यवसायामध्ये तुम्हाला थोडी मार्केटिंगची देखील आवश्यकता पडेल.
चांगल्या प्रकारे मार्केटिंग करण्यासाठी जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी या वस्तू विकायला ठेवल्या तर जास्तीत जास्त लोकांना तुमच्या वस्तू दिसतील आणि हीच तुमच्या वस्तूची सगळ्यात मोठी मार्केटिंग असेल. जर जास्त लोकांना तुमची वस्तू दिसली तर ते खरेदी करतील आणि तुम्ही भरपूर पैसे कमवू शकाल.
अशाच प्रकारच्या बिझनेस आयडियाची माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇