Women Business: आज महिला देखील पार्ट टाइममध्ये स्वतःचा खर्च भागवण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय करु लागले आहेत. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय घरी बसून सुरु केला तर तुमचा व्यवसाय मधील सुरुवातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचवता येतो.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसाय विषयी सांगणार आहे जो तुम्ही घरी बसून सुरु करु शकता आणि महिन्याला चांगली कमाई करु शकता. तसेच हा व्यवसाय तुम्ही शहरात किंवा गावामध्ये राहून देखील सुरु करु शकता. त्यामुळे ज्या महिलांना घरी बसून व्यवसाय सुरु करुन चांगली कमाई करायची आहे त्यांच्यासाठी हा व्यवसाय एकदम उत्तम आहे.
हे काम करुन महिला बनतील आत्मनिर्भर
तरुण मुली आणि महिला या गावात राहत असो किंवा शहरात ते स्वतःचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नेहमी ब्युटी पार्लरमध्ये जात असतात. ब्युटी पार्लरमध्ये त्या चेहरा, केस, नखे आकर्षक दिसण्यासाठी काही तरी करत असतात.
यामध्ये NAS म्हणजे नखावरील नक्षी करण्याचे प्रमाण महिला आणि मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सध्या मुली आणि महिलांमध्ये नेलं आर्ट करण्याचे प्रमाण इतके वाढत चालले आहे की आता मार्केटमध्ये नेलं आर्ट स्टुडिओ खोलायला लागले आहेत. जेथे फक्त तुमच्या नखांवर नक्षी काढण्याचे काम केले जाते. हे सर्व काम एका मशीनच्या साहाय्याने केले जाते.
हाच व्यवसाय महिला घरी बसून देखील सुरु करु शकतात. तुम्हाला फक्त नेलं आर्ट करण्यासाठी एका मशीनची गरज असते. त्या नंतर तुम्ही महिलांना किंवा मुलींना नेलं आर्टची सर्विस प्रोव्हाइड करुन महिन्याला चांगले पैसे कमवू शकता.
व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक मशीन
जर तुम्हाला नेलं आर्टचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला काही मशीन खरेदी करणे गरजेचे आहे. या मशीन खरेदी केल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करु शकता. या व्यवसायात तुम्हाला पुढील मशीनची आवश्यकता असते.
- डिजिटल नेलं आर्ट प्रिंटर मशीन – जवळपास ५०,००० रुपये
- नेल आर्ट पैटर्न प्रिंटर – जवळपास १५०० रुपये
- नेल ड्रिल मशीन – जवळपास २००० रुपये
- नेल आर्ट वैक्यूम क्लीनर मशीन – जवळपास १०,००० रुपये
- लॅपटॉप – ३०,००० रुपये
वरील सर्व मशीन तुम्हाला नेलं आर्टचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक आहेत.
हे पहा – ही मशीन तुम्हाला महिन्याला ४० ते ५० हजार सहज कमवून देईल, गावात किंवा शहरात देखील होईल भरपूर कमाई
खर्च आणि कमाई किती होईल?
नेलं आर्टचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ९० हजाराच्या आसपास खर्च येईल. नेलं आर्ट करण्यासाठी एका व्यक्तीकडून २०० ते ३०० रुपये घेतले जातात. जर तुम्ही तुमच्याकडे आलेल्या मुली आणि महिलांकडून नेलं आर्ट करुन घेण्यासाठी २०० रुपये घेतले आणि दररोज तुम्ही केवळ ५ महिलांचे नेलं आर्ट करुन दिले तर दिवसाला १००० म्हणजे महिन्याला तुम्ही ३० हजार रुपये सहज कमवू शकाल.