कोणता ही व्यवसाय करायचा असल्यास त्या व्यवसायात किती भांडवल लागणार हा प्रश्न पहिल्यांदा समोर येतो. बरेच जण भांडवल लागेल म्हणून व्यवसाय करायचे टाळतात. पण असे देखील काही व्यवसाय आहेत जे तुम्ही काहीच भांडवल न लावता सुरु करु शकता व महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.
जर तुम्हाला देखील स्वतःचा व्यवसाय करायचा असेल पण भांडवलाचा अभाव असेल तर खाली दिलेला व्यवसाय तुम्ही आजच सुरु करु शकता.
रिअल इस्टेट ब्रोकरेज व्यवसाय
रिअल इस्टेट हा व्यवसाय जगभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ज्या प्रकारे लोकसंख्या वाढत चालली आहे त्या प्रकारे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. अधिकृत आकडेवारी आणि अहवाल दर्शवतात की लोकांच्या घरांच्या गरजांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारी आणि अहवाल दर्शवतात की लोकांच्या घरांच्या गरजांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पण त्यांच्याकडे योग्य घर कसे खरेदी करावे या गोष्टीचे ज्ञान नसल्याने ते रिअल इस्टेट ब्रोकरेजच्या क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यावसायिकांची मदत घेतात. अशा प्रकारे रिअल इस्टेट ब्रोकरेजचे काम करणाऱ्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पैसे कमवले आहे.
रिअल इस्टेट ब्रोकर्सचे मुख्य काम ग्राहकांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देणे, मालमत्तेसाठी विविध पर्याय ऑफर करणे, किंमत विचारात घेणे, मालमत्ता खरेदी आणि विक्री प्रक्रिये दरम्यान मदत करणे, नवीन खरेदीदार आणि विक्रेत्यांशी संपर्क साधणे हे सर्व काम रिअल इस्टेट ब्रोकर्स करतो.
हे वाचा – Business Idea Marathi: फक्त ५ लाखांची गुंतवणूक करुन महिन्याला २ लाख रुपये कमवा, असा सुरु करा व्यवसाय
विमा एजन्सी व्यवसाय
भारतात सध्या करोडो लोक विमा एजंट म्हणून काम करत आहेत आणि या कामाद्वारे ते आपले घर चालवत आहे. आपल्या देशातील सर्वात आघाडीची विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा निगम लिमिटेड (LIC) आहे. सरकारी विमा कंपनी म्हणून LIC सोबत सध्या १४ लाखांहून अधिक एजंट जोडले गेलेले आहेत.
भरत पारेख या व्यक्तीने देखील आपल्या व्यवसायाची सुरुवात येथून केली होती आणि आज त्यांची वार्षिक कमाई ४ कोटी रुपये आहे. त्यांच्या या यशामुळे आज त्यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत येते. तुम्ही वर दिलेल्या दोन व्यवसायांपॆकी कोणता ही एक व्यवसाय चालू करु शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. या व्यवसायात तुमचे बोलण्याचे कौशल्य फार महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा.
अशा प्रकारच्या नवीन व्यवसायांची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇👇