१०वी पास व्यक्ती देखील टाकू शकतो गॅस एजन्सी, दिवसाला होईल हजारो रुपये कमाई

आता जवळपास सर्व घरांमध्ये गॅसचा वापर करुनच जेवण बनवले जाते. तसेच हॉटेल्समध्ये देखील गॅसचा वापर करुनच जेवण तयार केले जाते. वर्षातील १२ ही महिने गॅस घरांमध्ये आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे लोकांना एलपीजी गॅस उपलब्ध करुन देणारी एजन्सी टाकणे एक चांगला व्यवसाय आहे.

एलपीजी गॅस एजन्सी टाकल्यास प्रत्येक गॅसच्या टाकीमागे आपल्याला चांगले कमिशन मिळते. पण या व्यवसायात सुरुवातीला तुम्हाला जास्त पैसे लावावे लागतात. यासाठी तुम्ही सुरुवातीला पैसे लोन वर घेऊ शकता आणि मग तुम्हाला या व्यवसायातून जे कमिशन मिळेल त्याद्वारे काही महिन्यांमध्ये तुमचे सर्व लोन फेडू शकाल.

विविध प्रकारच्या असतात डिलरशिप

एलपीजी गॅस एजन्सीसाठी आपल्याला सर्वप्रथम डिस्ट्रिब्युटरशिप घ्यावी लागते. येथे ४ प्रकारच्या डिस्ट्रिब्युटरशिप आपल्याला मिळतात. शहरी, रूर्बन, ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरक अशा प्रकारच्या डिस्ट्रिब्युटरशिप मधून तुम्ही एक निवडू शकता.

गॅस एजन्सीसाठी अर्ज करताना तुम्ही कोणत्या भागात हे काम सुरु करणार आहे तसेच तो भाग कोणत्या एरियामध्ये येतो हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. कारण त्याच्या आधारावर तुम्हाला गॅस एजन्सीचे लायसन्स दिले जाते.

भारतात भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी या प्रकारच्या डिलरशिप आपल्याला पहायला मिळतात. तुम्ही यापैकी कोणती ही डिलरशिप निवडू शकता.

गॅस एजन्सी टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी

तुम्हाला देखील गॅस एजन्सी टाकायची असेल तर तुम्हाला खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • गॅस एजन्सी लायसन्स घेण्यासाठी व्यक्तीचे वय २१ ते ६० च्या दरम्यान असायला पाहिजे.
  • तुमच्याकडे १०वी पास केलेले सर्टिफिकेट असायला पाहिजे.
  • पुरुष किंवा महिला कोणी पण या लायसन्ससाठी अप्लाय करु शकते.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती IOCL, HPCL सारख्या ऑयल मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत नसला पाहिजे.
  • गॅस एजन्सीसाठी अर्ज करण्यासाठी 10,000 रुपये शुल्क आकारले जाते.
  • अर्जदाराकडे 15 लाख रुपये राखीव असणे आवश्यक आहे. कारण हे पैसे गोदाम आणि एजन्सी कार्यालय बांधण्यासाठी खर्च केले जातात.

अशा लोकेशनला करा सुरु

start gas agency business marathi

सध्या सगळीकडे गॅसच वापरले जातात. पूर्वी गावाला लोक जेवण बनवण्यासाठी चुल्हीचा वापर करायचे पण आता तेथे सुद्धा गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे तुम्ही गॅस एजन्सी गावाला किंवा शहरात देखील टाकू शकता. फक्त ही एजन्सी टाकताना अशा ठिकाणी टाका जेथे लोक जास्त प्रमाणात राहत असतील.

तुम्ही गॅस एजन्सी मोठ्या सोसायटी जवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी टाकू शकता. अशा प्रकारची एजन्सी शहरात आणि गावाला दोन्ही कडे चालते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयी नुसार लोकेशन निवडू शकता.

गॅस एजन्सीसाठी किती खर्च येईल?

गॅस एजन्सी लायसन्स मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो. हा अर्ज करताना आपल्या कडून ठराविक रक्कम घेतली जाते. जनरल कॅटेगरी मधील लोकांना १० हजार रुपये भरावे लागतात. तसेच ओबीसी कॅटेगरीतील लोकांना 5000 रुपये आणि एससी कॅटेगरीतील लोकांना 3000 रुपये भरावे लागतात.

हे पहा – या व्यवसायात सरकार देते २५ टक्के अनुदान, महिन्याला होईल २ लाख कमाई

अशा प्रकारे करा गॅस एजन्सी लायसन्ससाठी अर्ज

गॅस एजन्सी लायसन्स मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://www.lpgvitarakchayan.in/ या वेबसाईट वर जाऊन स्वतःला रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तेथे तुमची प्रोफाइल तयार करा. गॅस वितरण कंपनी अर्जदाराचा इंटरव्यू देखील घेऊ शकते. इंटरव्यूद्वारे ते तुमचे Knowledge चेक करतील. त्यानंतर तुम्हाला हे लायसन्स दिले जाते.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment