Low Investment Business – या व्यवसायात सरकार देते २५ टक्के अनुदान, महिन्याला होईल २ लाख कमाई

जर तुम्हाला देखील कमी पैसे लावून चांगली इनकम करायची असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशा बिझनेस आयडिया विषयी सांगणार आहे जो कमी खर्चात सुरु होतो आणि तुम्हाला जास्त नफा मिळवून देतो.

या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही हा व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला सरकार २५ टक्के अनुदान(सबसिडी) देते. सरकार कडून मिळालेल्या २५ टक्के सबसिडीच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय सुरु करुन महिन्याला २ लाख रुपये कमवू शकता.

कोणता आहे हा व्यवसाय?

हा व्यवसाय आहे शेळीपालन. या व्यवसायात तुम्ही कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवू शकता. सध्या भारतामध्ये बरेच जण शेळीपालन हा व्यवसाय करुन चांगली कमाई करत आहे. हा व्यवसाय तुम्ही घरुनच सुरु करु शकता. सध्या या व्यवसायाला commercial व्यवसाय मानले जाते. जे देशाची अर्थव्यवस्था आणि पोषण यामध्ये खूप योगदान देते. शेळीपालन व्यवसायामुळे दूध, खत या प्रकारचे लाभ मिळतात.

सरकार देते २५ टक्के अनुदान(सबसिडी)

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त गोष्टींची गरज नसते. तुम्हाला फक्त थोडी जागा हवी जेथे तुम्ही शेळीपालन हा व्यवसाय सुरु करु शकता. ग्रामीण भागात स्वयं रोजगाराला आणि पशुपालनाला चालना देण्यासाठी सरकार अनुदान देते. केंद्र सरकार पशुपालकांना ८० टक्के अनुदान देते. तर मध्य प्रदेश सरकार ६० टक्के अनुदान देते.

government-gives-25-percent-subsidy-in-this-business

शेळीपालन करण्यासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता. हे कर्ज तुम्हाला NABARD’s (National Bank for Agriculture and Rural Development) मार्फत कमी व्याजदरात मिळेल. NABARD स्कीम मार्फत SC/ST Categorie मधील लोकांना ३३ टक्के सबसिडी शेळीपालन व्यवसायासाठी दिली जाते. तसेच OBC आणि General Categorie मधील लोकांना २५ टक्के सबसिडी दिली जाते.

शेळीपालन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

शेळीपालन व्यवसायात अनुदान मिळण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 • रेशन कार्ड
 • आधार कार्ड
 • मोबाईल नंबर
 • बँक पासबुक
 • पत्त्याचा पुरावा
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • शेळीपालन व्यवसाय अहवाल

शेळीपालन कर्ज अनुदान अर्ज कसा करावा?

 • शेळीपालन कर्ज अनुदानासाठी तुम्हाला पहिले जवळच्या बँकेत जाऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
 • यासाठी बँक तुम्हाला एक फॉर्म देईल. त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती नीट भरा.
 • तसेच फॉर्म सोबत जी आवश्यक कागदपत्रे लावणे गरजेचे आहे ती लावा.
 • त्या नंतर बँक अधिकारी तुम्ही फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची तपासणी करतील.
 • फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर असल्यास कर्जाची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल.

हे वाचा – ही क्रीम बनवून होईल भरपूर कमाई, गावात किंवा शहरात राहून सुरु करा हा व्यवसाय

शेळीपालन व्यवसायाद्वारे कमाई कशी होते?

शेळीपालन व्यवसायाद्वारे आपल्याला दूध, खत आणि मांस मिळते. शेळीचे दूध व मांस हे चविष्ट आणि Nutrition ने भरपूर असते जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असते. शेळीपालन व्यवसायात मांस खूप मिळते. बऱ्याच देशांमध्ये हे मांस मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. तुम्ही हे मांस बाहेरच्या देशात पाठवू शकता व चांगली कमाई करु शकता.

महाराष्ट्रात जवळपास ६० टक्के लोक मांस खातात. महाराष्ट्रात मेट्रो सिटीमध्ये शेळीचे मांस ७०० रुपये किलोच्या भावात विकले जाते आणि दुसऱ्या सिटीमध्ये हे ५५० ते ६०० रुपये किलोला विकले जाते.

शेळीपालन व्यवसायाद्वारे तुमची इनकम अनेक जागेतून होते. जसे की शेळीचे खत विकून, दूध विकून, शेळीचे मांस मेट्रो सिटीमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये विकून तुम्ही खूप चांगली कमाई करु शकता. अशा विविध मार्गांद्वारे तुम्ही सहज महिन्याला २ लाख रुपये कमवू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment