Refurbished म्हणजे काय।Refurbished meaning in marathi

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Refurbished meaning in marathi – आपल्यामधील बरेच जण ऑनलाईन एखादा फोन किंवा लॅपटॉप खरेदी करायला जातात. आपण जेव्हा हवा असलेला फोन सर्च करतो तेव्हा त्या लिस्ट मध्ये बरेच असे फोन असतात ज्यांच्यावर refurbished असे दाखवते.

refurbished फोन हे आपल्याला शक्यतो ऑनलाईनच मिळतात. ज्या फोनवर refurbished असे दाखवले जाते त्या फोनच्या किमती देखील फार कमी असतात. 

एक नवीन फोन आणि refurbished फोन यांच्या मध्ये काय फरक आहे व कोणता फोन घेणे आपल्यासाठी चांगले आहे या विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. 

Refurbished meaning in marathi

Refurbished फोन हे असे फोन असतात ज्यांच्यात काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते कंपनीला पुन्हा देण्यात आले आहेत.

ग्राहकाला फोन वापरताना काही समस्या आल्यास तो फोन कंपनीला पुन्हा देतो. कंपनी त्या फोनला repair करुन, तपासून पुन्हा विकते म्हणून यांना Refurbished फोन असे म्हणतात.

म्हणूनच Refurbished फोन हे Original फोनच्या तुलनेत स्वस्त असतात. परंतु हा फोन विकताना कंपनी  Refurbished फोन या नावाने विकते. जेणे करुन ग्राहकांची फसवणूक होणार नाही.


Refurbished फोन कसे बनवले जातात ?

जेव्हा आपण एखादा जुना किंवा Refurbished फोन खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या मनात खूप शंका असतात. 

 • हा फोन घेणे योग्य तर आहे ना ?
 • हे फोन चांगले असतात का ?
 • हे कसे बनवले जातात ?

या सारख्या बऱ्याच शंका आपल्याला येत असतात. आपण एखादा जुना Refurbished फोन घ्यायला फार घाबरतो. हे असे होणे सहाजिकच आहे. कारण आपण त्या फोनसाठी पैसे देणार आहे.

आपण अगोदर समजून घेऊया कि Refurbished फोन कसे बनवले जातात.

जेव्हा आपण एखादा फोन खरेदी करतो तेव्हा ठराविक जणांच्या फोनमध्ये काही तरी प्रॉब्लेम येतो. जसे फोन जास्त गरम होणे, बॅटरी लवकर संपणे, कॅमेरा चालू न होणे या सारख्या काही समस्या येतात.

अशा वेळेस आपण तो फोन कंपनीला पुन्हा देतो. मग कंपनी त्याला repair करुन, त्याचे योग्य प्रकारे परीक्षण करुन तो नीट करते.

अशा प्रकारे repair केलेले फोन ग्राहकांना विश्वासात घेऊन विकण्यासाठी, कंपनीची ब्रँड value चांगली ठेवण्यासाठी तसेच हा फोन repair करण्यात आलेला आहे हे ग्राहकांना कळावे म्हणून कंपनी असा फोन हा Refurbished फोन या नावाने विकते.

या सोबतच कंपनी अशा फोन वर २० ते ४० टक्यांपर्यंत discount देखील देते. या सोबतच ग्राहकांनी असे फोन खरेदी करावेत म्हणून कंपनी अशा फोन वर ६ महिन्याची Warranty देखील देते.


Refurbished Grading काय असते ?

जेव्हा Refurbished फोन विकायला उपलब्ध असतात तेव्हा त्या फोनच्या Condition नुसार त्याला काही Grade दिले जातात. हे Grade फोनची Condition दर्शवित असतात.

 • Grade A – ह्या ग्रेडमध्ये ते फोन असतात जे एकदम नवीन असतात पण काही कारणांमुळे त्यांना Refurbished केले गेले आहे.
 • Grade B – हे फोन थोडेसे डॅमेज झालेले असतात तसेच काही स्क्रॅचेस देखील पडलेले असतात.
 • Grade C –  हे फोन असे असतात जे ग्राहकांनी वापरलेले असतात. हे फोन बघूनच कळते कि हे वापरलेले आहेत.
 • Grade D – हे फोन जास्त वापरलेले असतात. हे जास्त डॅमेज असण्याची देखील शक्यता असते. अशा फोनला आपण second hand फोन देखील म्हणू शकतो.

Refurbished फोन खरेदी करावे की नाही ?

आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल Refurbished फोन खरेदी करावे कि नाही ?

अशा वेळेसाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगतो ज्याच्या मदतीने तुम्ही Refurbished फोन घ्यावा कि नाही हे ठरवू शकता.

 • Warranty – अशा फोन सोबत तुम्हाला ६ महिन्यांपर्यंतची वॉरंटी मिळते. जर फोन वापरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही जवळच्या service centre ला जाऊन तो फ्री मध्ये नीट करु शकता.
 • Testing – जेव्हा एखादा फोन repair करुन तो Refurbished म्हणून विकण्यास तयार होतो अशा वेळेस त्याची testing एखाद्या नवीन फोन सारखीच केली जाते.
 • Return Policy – जेव्हा आपण Refurbished फोन घेतो तेव्हा जर तो वापरताना काही प्रॉब्लेम आल्यास आपण तो फोन १० दिवसाच्या आतमध्ये जमा करु शकतो. तसेच त्याचे पैसे देखील आपल्याला मिळतात.

एक Refurbished फोन घेताना तुम्ही वरील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Refurbished फोन खरेदी करण्याचे फायदे

 • Refurbished फोन फार कमी किमतीत मिळतात. जर तुमचे बजेट कमी असल्यास तुम्हाला कमी किमतीत चांगला Refurbished फोन मिळेल.
 • Refurbished फोनवर तुम्हाला Return policy तसेच Warranty देखील मिळते त्यामुळे तुम्ही खात्रीने असे फोन खरेदी करु शकता.
 • Refurbished फोन हा second hand फोनपेक्षा फार चांगला असतो. Refurbished फोन हे थोडक्यात नवीनच फोन असतात.

Refurbished फोन खरेदी करण्याचे नुकसान

 • Refurbished फोन सोबत आपल्याला चार्जर किंवा हेडफोन मिळेलच असे नाही.
 • अशा फोनमध्ये पुन्हा प्रॉब्लेम निघण्याची शक्यता असते.
 • या फोनची पॅकेजिंग हि नवीन फोन सारखी नसते.

Refurbished फोन कोठून खरेदी करावे ?

इंटरनेटवर अशा बऱ्याच fake website आहेत ज्या तुम्हाला Refurbished फोन देतात पण अशा वेबसाईट वर आपली फसवणूक होते. यामुळे योग्य त्या व खात्रीशीर वेबसाईट वरुन फोन घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला Refurbished फोन घ्यायचा असेल तर तुम्ही Flipkart किंवा Amazon सारख्या साईट वरुन खरेदी करु शकता.

या साईट वरुन Refurbished फोन खरेदी करताना जी माहिती मी तुम्हाला वर सांगितली आहे ती लक्षात ठेऊन योग्य तो फोन घ्या. Refurbished फोन घेताना खालील गोष्टींची काळजी घ्या.

 • फोनला कोणता Grade आहे ?
 • फोन सोबत Return policy तसेच Warranty आहे का ?
 • फोन किती जुना आहे ?

या सगळ्या गोष्टी पाहूनच फोन खरेदी करा. 


आज तुम्ही काय शिकलात ?

आज आपण येथे पाहिले Refurbished meaning in marathi तसेच Refurbished फोन कसे बनवले जातात त्यांचे फायदे व नुकसान काय आहेत या विषयी माहिती पाहिली. जर वरील माहिती विषयी काही अडचण असल्यास आपण मला कंमेंटमध्ये सांगू शकता.

ह्या ब्लॉगवर अशीच फायदेशीर माहिती पोस्ट होत असते. ह्या ब्लॉगवर पोस्ट होणाऱ्या नवीन माहितीची Notification मिळवण्यासाठी डाव्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन Notification Allow करा.

Leave a Comment