Marathi BP | Marathi bp video – Balak Palak (BP) – मराठी बीपी

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Marathi BP, Marathi bp video, Marathi bp picture – Balak Palak Marathi bp movie: मराठी बीपी

Marathi bp is a short form of the widely searched film Balak Palak.

आपल्या देशात लैंगिक शिक्षणा विषयी फार कमी प्रमाणात बोलले जाते. तसेच या विषयावर बोलण्यासाठी किंवा या विषयी योग्य माहिती देण्यासाठी कोणी देखील समोर येत नाही.

या मुळे आजची तरुण पिढी लैंगिक शिक्षणा विषयी माहिती घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात आणि या संबंधित चुकीचे ज्ञान घेऊन बसतात.

एका ठराविक वेळेनंतर मुलांमध्ये लैंगिक शिक्षणा विषयी उत्सुकता निर्माण होते. परंतु पालक आपल्या मुलांना चुकीच्या गोष्टीं पासून दूर ठेवण्यासाठी या विषयी बोलण्याचे टाळतात.

मुलांना जसे शैक्षणिक ज्ञान दिले जाते त्या प्रमाणे लैंगिक शिक्षणा बद्दल योग्य व समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयन्त येथे करण्यात आला आहे.

आजच्या तरुण पिढीला तसेच इतर व्यक्तींना देखील लैंगिक शिक्षणा विषयी जागरुक करण्यासाठी आणि योग्य ज्ञान देण्यासाठी बालक पालक (marathi bp) हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

आज आपण येथे बालक पालक या चित्रपटा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Balak Palak – मराठी बीपी | Marathi BP Picture

marathi bp

बालक पालक चित्रपट ज्या प्रकारे सोप्या भाषेत लैंगिक शिक्षणा विषयी माहिती सांगतो तसा दुसरा कोणता ही मराठी चित्रपट आपल्याला बघायला मिळणार नाही.

नटरंग आणि बालगंधर्व सारखा प्रसिद्ध चित्रपट तयार केल्यानंतर रवी जाधव हे आपले लक्ष तरुणांना लैंगिक शिक्षणा विषयी योग्य माहिती देण्याकडे वळवतात.

पालकांकडून लैंगिक शिक्षणाबद्द्ल माहिती न मिळाल्यानंतर चार मुले (दोन मुले आणि दोन मुली) जीवनातील तथ्यांबद्दल स्वतःला कसे शिकवतात या विषयी संपूर्ण चित्रपट आपल्याला पहायला मिळेल.

चित्रपट आपल्याला मुंबई मधील १९८६ च्या उन्हाळ्यात घेऊन जातो. तेथे राहणाऱ्या चाळीतील चार मुले आपल्या लैंगिक शिक्षणा विषयीच्या ज्ञानाला सुरुवात करतात.

अव्या (रोहित फाळके), चिऊ (भाग्यश्री शंकपाळ), डॉली (शाश्वती पिंपळीकर) आणि भाग्य (मदन देवधर) विशू (प्रथमेश परब) च्या सल्यानुसार वागत असतात. ज्याला तो धिचुक-धिचुक म्हणतो. हे सर्व एकाच चाळेमध्ये राहत असतात आणि एकमेकांचे चांगले मित्र देखील असतात.

या मुलांच्या शाळेमध्ये शिकणारी एक मुलगी ज्योती ही पळून जाते. त्यामुळे सगळीकडे चर्चा होते. ” ज्योतीने शेण खाल्ले “. त्यानंतर शेण खाल्ले म्हणजे काय या गोष्टीचा शोध घेण्याचे हे सर्वजण ठरवतात.

शेण खाल्ले म्हणजे काय या गोष्टीचा शोध घेत हे सगळे मराठी सेक्स व्हिडिओ पाहण्यापर्यंत पोहोचतात. मग हे सगळे जण एका दुकानातून तशा प्रकारची व्हिडिओ आणून बघतात.

चित्रपट पाहताना आपल्याला अस्वस्थ वाटेल अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य येथे पहायला मिळत नाही. संवेदनशील विषयाला हा चित्रपट अतिशय चतुराईने सांभाळून घेतो. हा चित्रपट अशा विषयावर बोलतो ज्या विषयी पालक मुलांसोबत बोलणे टाळतात.

कलाकारांनी केलेल्या अप्रतिम अभिनयामुळे चित्रपटाला खूप मदत मिळते. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील सुबोध भावे, अमृता सुभाष, आनंद इंगळे, सई ताम्हणकर आणि किशोर कदम अशी प्रसिद्ध नावे आहेत.

परंतु हे सर्व चित्रपटामध्ये एक प्रकारे Side Actor चे काम करतात. या सर्व कलाकारांचे मुख्य काम हे खऱ्या नायक व नायिकांना (मुलांना) समर्थन करणे आहे.

विशू, अव्या, डॉली, चिऊ आणि भाग्य हे या चित्रपटाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांना पडलेले प्रश्न, त्याची उत्तरे, भावना आणि मनात असलेली उत्सुकता हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

Marathi bp Movie Information

Movie NameBalak Palak
Directed byRavi Jadhav
Produced byRitesh Deshmukh, Uttung Thakur
Release Date4 January 2013
Budget₹ 2.5 Crore
Box office₹ 12 Crore

Balak Palak Trailer – Marathi bp video

लैंगिक शिक्षणा बद्दल योग्य ती माहिती देण्यासाठी आपल्याला इंटरनेट वर काही Web Series देखील पहायला मिळतील. परंतु, मराठीमध्ये या विषयी जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकमेव पर्याय म्हणून आपल्या समोर उपलब्ध आहे.

हे वाचा – Takatak 2 Marathi Movie Download Filmyzilla

बालक पालक (marathi bp picture) चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी अप्रतिम पद्धतीने मुलांना लैंगिक शिक्षणा बद्दल माहिती देण्यासाठी हा चित्रपट तयार केला आहे.

तसेच या चित्रपटाचे निर्माते रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांचा देखील या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोलाचा वाटा आहे.

रितेश देशमुख यांचा चित्रपट निर्मिती मधील बालक पालक हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटा बद्दल असलेला आनंद ते Twitter वर व्यक्त करतात.

Balak Palak Star Cast

बालक पालक चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी कामे केली आहेत त्यांची नावे खाली पाहू शकता.

कलाकारांची नावे चित्रपटातील नावे
१.शाश्वती पिंपळीकरडॉली
२.मदन देवधरभाग्य
३.भाग्यश्री मिलिंदचिऊ
४.रोहित फाळकेअव्या
५.प्रथमेश परबविशू
६.किशोर कदमकदम काका
७.अविनाश नारकरश्री.गंधे
८.सई ताम्हणकरनेहा
९.विशाखा सुभेदारपेडणेकर काकू
१०.सुप्रिया पठारेसौ. पुराणिक
११.आनंद इंगळेश्री रेगे
१२.सुबोध भावेनवरा
१३.अमृता सुभाषपत्नी
१४.सतीश तारेरमेश

FAQ

बालक पालक चित्रपटाचे(Marathi BP Picture) दिग्दर्शक कोण आहेत ?

बालक पालक चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव आहेत.

बालक पालक चित्रपट कधी Release झाला ?

बालक पालक हा चित्रपट ४ जानेवारी २०१३ ला प्रदर्शित झाला.

बालक पालक चित्रपटाचे Box Office Collection किती आहे ?

बालक पालक चित्रपटाचे Box Office Collection हे १२ करोड आहे.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment