देशात दिवसेंदिवस OTT कंटेंटची डिमांड वाढत चालली आहे. सध्या ज्या नवीन मूवी रिलीज होतात त्या आपल्याला सर्वात अगोदर ओटीटी प्लॅटफॉर्म वर पहायला मिळतात. तसेच लोक आता वेब सिरीज देखील मोठ्या प्रमाणात पाहू लागले आहेत. त्यामुळे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या अँप आणि वेबसाईट वर क्राईम, कॉमेडी आणि रोमान्सशी रिलेटेड नवीन वेब सिरीज सतत रिलीज करत आहे.
सर्व ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये नेटफ्लिक्स वरील मूवी आणि वेब सिरीज जास्त प्रमाणात पाहिले जातात. लोकांना नेटफ्लिक्सचे शो जास्त आवडतात त्यामुळे ते नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन खरेदी करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नेटफ्लिक्स अगदी फ्री मध्ये वापरु शकता.
जिओ देत आहे फ्री मध्ये नेटफ्लिक्स वापरण्याची संधी
सध्या जिओ कंपनीने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा रिचार्ज प्लॅन १०९९ रुपयांचा असून यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. तसेच या प्लॅनमध्ये तुम्ही दिवसाला १०० SMS पाठवू शकता. इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दिवसाला २ GB डेटा देखील यामध्ये मिळतो. या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा देखील पुरवण्यात आला आहे.
पण हा प्लॅन इथेच संपत नाही. तर यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये नेटफ्लिक्स देखील वापरायला मिळते. जिओच्या १०९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला वरील सर्व गोष्टी तर मिळतात पण या व्यतिरिक्त तुम्हाला नेटफ्लिक्स, JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.
जिओचा हा १०९९ रुपयांचा प्लॅन ८४ दिवसांचा आहे. म्हणजे तुम्ही ८४ दिवसांसाठी फ्री मध्ये अनलिमिटेड कॉल्स, डेटा सोबत ८४ दिवसांसाठी नेटफ्लिक्स देखील फ्री मध्ये वापरु शकता.
हे पहा – तुमची पेट्रोल बाईक होणार आता इलेक्ट्रिक, हे किट बाईकला बसवा आणि वाचवा भरपूर पैसे
अशा प्रकारे फ्री मध्ये मिळवा नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन
आता पर्यंत तुम्हाला कळलेच असेल जिओचा १०९९ चा रिचार्ज मारल्यानंतर तुम्ही फ्री मध्ये ८४ दिवसांसाठी नेटफ्लिक्स वापरु शकता. नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर जिओचा १०९९ रुपयांचा रिचार्ज मारावा लागेल. हा रिचार्ज तुम्ही ऑनलाईन मारु शकता.