तुमची पेट्रोल बाईक होणार आता इलेक्ट्रिक, हे किट बाईकला बसवा आणि वाचवा भरपूर पैसे

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत चालली आहे. पेट्रोलच्या किमती वाढत असल्याने बाईक किंवा स्कुटी चालवणे देखील लोकांना महागडे वाटू लागले आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे ट्रान्सपोर्ट देखील महाग होत चालले आहे. या सर्व कारणांमुळे लोकांना बाईक चालवणे सध्या परवडत नाही.

अशा स्थितीमध्ये पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी लोक आता इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करु लागले आहे. मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. एक चांगली इलेक्ट्रिक बाईकची किंमत १ लाख २० हजार ते १ लाख ५० हजारा पर्यंत आहे. पण एवढे पैसे सगळ्यां जवळ असतीलच असे नाही.

लोकांची ही समस्या लक्षात घेऊन कंपनीने एक किट लाँच केले आहे जे आपण पेट्रोल बाईक किंवा स्कुटरला लावून तिला पूर्णपणे इलेक्ट्रिक करु शकतो.

कोणत्याही बाईक किंवा स्कुटरला बनवा इलेक्ट्रिक

मुंबई मधील एक स्टार्टअप कंपनी GoGoA1 ने एक इलेक्ट्रिक कन्वर्शन किट लाँच केले आहे. जे तुमच्या पेट्रोल गाडीला इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करते. कंपनीच्या माहितीनुसार हे किट गाडीला बसवल्यानंतर १५० किलोमीटर पर्यंत बाईक नॉनस्टॉप जाऊ शकेल.

कंपनीचे हे किट आरटीओ मान्यताप्राप्त असून ते बाजारात उपलब्ध असलेल्या ४५ पेक्षा जास्त बाइक-स्कूटर मॉडेल्समध्ये बसवले जाऊ शकते. हे किट हिरो होंडा आणि हिरोच्या सर्व बाईकमध्ये बसवले जाऊ शकते. यामध्ये स्प्लेंडर, शाईन आणि अ‍ॅक्टिव्हा सारख्या लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे.

पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक करण्यासाठी किती खर्च येईल?

बाईकच्या इलेक्ट्रिक किटची किंमत ही गाडीच्या मॉडेल वर अवलंबून आहे. होंडा ऍक्टिव्हाचे किट हे ६०,००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. यामध्ये मोटरीचे १९ हजार, बॅटरीचे ३० हजार, इलेक्ट्रिक कंपोनंटसाठी ५ हजार आणि चार्जरसाठी ५ हजार रुपये द्यावे लागतात.

हे किट ऍक्टिव्हाला बसवल्यानंतर ६० किलोमीटरची रेंज मिळते. जर मोठी बॅटरी टाकली तर १५१ किलोमीटर पर्यंत रेंज मिळेल.

हे पहा – कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई करायची असेल तर अमूल सोबत सुरु करा हा व्यवसाय

पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक करण्याचे हे मिळतील फायदे

  • पेट्रोलसाठी लागणाऱ्या पैशांची बचत होईल.
  • बाईकच्या मेन्टेनन्सचा खर्च फार कमी होईल.
  • कमी खर्चामध्ये जास्त किलोमीटर बाईक चालवता येईल.
  • प्रदूषणाला आळा घालण्यास मदत मिळेल.
  • नवीन इलेक्ट्रिक बाईक घेण्यापेक्षा जुनी पेट्रोल गाडीला इलेक्ट्रिक किट लावून भरपूर पैसे वाचवता येतील.

तुम्ही देखील आजच तुमची पेट्रोल वरील बाईक इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करुन घ्या.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment