आज आपण बाहेर फिरताना पेमेंट करण्याची गरज पडल्यास ऑनलाईन पेमेंट करण्याचा मार्ग निवडतो. कारण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपल्याला फक्त QR कोड स्कॅन करुन किती पैसे द्यायचे हे टाकायचे असते.
एखाद्याला पैसे देताना नोटा मोजत बसण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करणे हा मार्ग सगळ्यांना चांगला आणि कमी वेळ खर्च करणारा वाटतो.
आपण जर स्वतःच्या खिशात जास्त पैसे ठेवले तर कोणी तरी आपले पैसे चोरील अशी भीती देखील काही जणांना असते. पण जर तुम्ही ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असाल तर पैसे चोरीला जातील अशी भीती तुमच्या मनामध्ये राहत नाही.
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी खूप सारे अँप आज तुम्हाला प्ले स्टोअर वर मिळतील. त्या सगळ्या अँप मधील एक प्रसिद्ध अँप म्हणजे गूगल पे (Google Pay) या विषयी आज आपण माहिती (Google pay information in marathi) पाहणार आहोत.
तुम्ही सर्वानी गूगल पे हे नाव कधी ना कधी ऐकले असेल. आज मी तुम्हाला ह्या अँप विषयी तसेच त्यामध्ये आपल्याला कोणत्या सुविधा मिळतात ह्या विषयी माहिती सांगणार आहे.
गुगल पे काय आहे।Google pay information in marathi
गुगल पे हे UPI वर आधारीत एक Digital Payment App आहे. ज्याचा वापर करुन आपण सहज आपल्या बँक अकाऊंट मधून कुणाला हि ऑनलाईन पेमेंट करु शकतो.
गुगल पे ची सुरुवात १९ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. हे अँप Bhim आणि Phonepe सारखे आहे. यामध्ये आपल्याला स्वतःचे बँक अकाऊंट लिंक करण्याची आवश्यकता असते. हे केल्यानंतर तुम्ही कुणाला हि ऑनलाईन पेमेंट करु शकता.
गुगल पे हे अँप गुगलने तयार केलेले असून तुम्हाला हे अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही प्ले स्टोअर वर पाहायला मिळेल. गुगल पेमध्ये आपल्याला विविध भाषा मिळतात. ह्या अँपमध्ये जसे अपडेट येत जातील तशा प्रकारे आपल्याला आणखी नवीन भाषा यामध्ये दिसतील.
गुगल पे मधील सुविधा
गुगल पे ह्या अँपमध्ये तुम्हाला खूप सुविधा मिळतात. त्यापैकी काही महत्वाच्या सुविधां विषयी आपण येथे माहिती पाहणार आहोत.
1. अकाऊंट
ह्या अँपमध्ये Sign up करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ID Proof देण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त मोबाईल नंबर टाकून OTP टाकायचा आहे. नंतर जो नंबर तुमच्या बँक अकाऊंटशी लिंक आहे तो नंबर तुम्हाला गुगल पे मध्ये बँक अकाऊंट लिंक करण्यासाठी टाकावा लागेल.
2. सुरक्षितता (Security)
तुम्हाला ज्या व्यक्तीला पेमेंट करायचे आहे त्याला सरळ तुमच्या बँक अकाऊंट मधून तुम्ही त्याच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवता त्यामुळे मध्यस्थी कोणी तुमचे पैसे चोरु शकत नाही. यामध्ये गुगल आपल्याला २४/७ Multi Layer Security देते.
3. पेमेंट
गुगल पे द्वारे तुम्ही विविध प्रकारे पेमेंट करु शकता. तुम्ही बँक अकाऊंट नंबर व IFSC कोडचा वापर करुन डायरेक्ट त्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवू शकता.
तसेच UPI ID, QR कोड आणि नंबरद्वारे देखील सहज दुसऱ्यांना पैसे पाठवू शकता. यामुळे तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी जो मार्ग सोयीस्कर वाटेल तो तुम्ही वापरु शकता.
4. Transaction History
गुगल पे मधील ह्या सुविधेचा वापर करुन तुम्ही कुणाला किती पैसे पाठवले व कोणत्या तारखेला पाठवले हे सगळं पाहू शकता. यामुळे तुम्ही कुणाला तसेच किती वेळा ऑनलाईन पेमेंट केले हे सगळं पाहू शकता.
व्यवसायामध्ये तसेच दैनंदिन जीवनातील ऑनलाईन खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी गुगल पे मधील हि सुविधा तुम्हाला फार मदत करेल.
5. Transaction Charges Free
गुगल पेच्या माहितीनुसार तुम्हाला ५०,००० रुपयां पर्यंत कोणत्या हि Transaction वर Charges देण्याची गरज नसते.
6. बँक
Axis, HDFC, ICICI आणि SBI सारख्या ५५ बँकेला गुगल पे हे अँप Support करते. त्यामुळे तुम्ही गुगल पेचा सहज वापर करु शकता.
7. पैसे जिंकण्याची संधी
गुगल पेमध्ये तुम्हाला Referral आणि Scratch card द्वारे पैसे जिंकण्याची संधी मिळते. ऑनलाईन पेमेंट करुन तुम्ही Scratch card मिळवू शकता व चांगले पैसे कमवू शकता.
आज तुम्ही काय शिकलात ?
मित्रांनो,
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला खूप मदत होते. गुगल पेचा वापर करुन पेमेंट करत तसेच स्वीकारत असल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो. तसेच कुणाला किती पैसे व केव्हा दिले हे लक्षात ठेवावे लागत नाही.
गुगल पेमध्ये दिलेल्या विविध सुविधांचा वापर करुन तुम्ही तुमचे व्यवहार सहज व सोप्या पद्धतीने करु शकता.
मी आशा करतो आज सांगितलेली गुगल पे विषयी माहिती (Google pay information in marathi) तुम्हाला समजली तसेच आवडली असेल. हि पोस्ट आवडली असल्यास कृपया मला कंमेंटमध्ये कळवा.
ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन पोस्टची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.
जेणे करुन ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन पोस्टची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल.