इंटरनेटवर फ्री सॉफ्टवेअर शोधणे अवघड होते आणि एखादे सॉफ्टवेअर मिळाले तरी त्यामध्ये आपल्याला फार कमी Features मिळतात. या सोबतच आपल्या PC मध्ये असलेल्या System Configuration चा देखील विचार करावा लागतो.
Free video editing software मध्ये आपल्याला खालील गोष्टींची अडचण येते.
- Watermark असणे.
- सॉफ्टवेअरसाठी High System Requirement ची आवश्यकता असणे.
- Limited Effect मिळणे.
- lagging, freeze आणि crash सारख्या समस्या येणे.
यामुळे आपल्याला खूप अडचणींना सामोरे जावे लागते.
आज आम्ही तुमच्या या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी अशा काही खास सॉफ्टवेअर विषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वरील सगळ्या समस्यांपासून सुटका मिळेल.
ह्या Free video editing software मध्ये आपल्याला खालील Features मिळतील.
- No Watermark
- Low System Requirement मध्ये देखील चालतात.
- जास्त Effect मिळतात.
- Smooth Performance
- Linux, Windows, Mac Os साठी उपलब्ध
- Free Download
वरील सर्व Features(सुविधा) तुम्हाला खालील सॉफ्टवेअरमध्ये मिळतील.
१. Openshot
Openshot हे एक फ्री सॉफ्टवेअर असून हे तुम्ही तीनही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये म्हणजेच Linux, Windows, Mac Os मध्ये वापरु शकता.
यामध्ये तुम्ही Professional पद्धतीने व्हिडिओ एडिट करु शकता. OpenShot मध्ये तुम्हाला खालील Features मिळतात.
Features-
- Animation Effect – Animation Effect लावू शकता. तसेच 3D Animation वापरुन तुम्ही Title ला विविध Effect देऊ शकता.
- Cut – व्हिडिओ Cut करण्यासाठी एकदम सोपे
- Unlimited Track – background video तसेच Audio track चे Feature वापरु शकता. विविध प्रकारचे आवाज तुम्ही यामध्ये व्हिडिओला लावू शकता.
- Slow-motion/Time effect – Slow-motion तसेच Time effect मध्ये बदल करुन व्हिडिओ आणखी Attractive बनवू शकता.
- Simple Interface – नवीन व्हिडीओ एडिटरला समजण्यास सोपे जाते. यामध्ये तुम्हाला फक्त व्हिडिओ Drag आणि Drop करुन काम सुरु करता येते.
नवीन व्हिडिओ एडिटरसाठी हे सॉफ्टवेअर वापरणे अधिक सोयीस्कर ठरेल.
२. Movie Maker 10
ज्यांच्या लॅपटॉपमध्ये कमी रॅम किंवा स्टोरेज आहे, परंतु त्यांना व्हिडिओ एडिटिंग करायची आहे. अशा सर्वांसाठी Movie Maker 10 हे सॉफ्टवेअर फायदेशीर आहे. हे सॉफ्टवेअर फक्त Windows ऑपरेटिंग सिस्टिमसाठी बनले आहे.
हे फार Simple आणि समजण्यासाठी एकदम सोपे असे सॉफ्टवेअर आहे. यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंगशी निगडित कोणतीही गोष्ट सहजपणे करु शकता.
Features –
- Background Music – Background Music बदलू शकता त्यामध्ये विविध Track वापरुन खास Audio Effect देऊ शकता.
- Media formats – विविध मीडिया formats ला सपोर्ट करते. जसे कि mp4, wmv, mkv, mov, avi, mpeg, mpg, mts, jpg, png, gif, mp3, m4a, wav.
- Text Effect – Text Effectचा वापर करुन Attractive title बनवू शकता. यामध्ये ३० पेक्षा जास्त फॉन्ट प्रकार देखील मिळतात.
- High quality editing – High quality मध्ये व्हिडिओ एडिट करु शकता. फोटो किंवा व्हिडिओची quality मध्ये विविध बदल करु शकता.
- Transition effect – ३० पेक्षा जास्त transition effects(fade, ripple, cross-zoom, wave, pixelate, square wipe..) वापरु शकता.
तुम्हाला जर सर्वात Simple व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर हवे असेल तर तुम्ही ह्या सॉफ्टवेअरचा वापर करु शकता.
३. HitFilm Express
HitFilm Express हे सॉफ्टवेअर Windows आणि Mac os ऑपरेटिंग सिस्टिमसाठी उपलब्ध आहे.
हे सॉफ्टवेअर चालवणे थोडे अवघड असले तरी एकदा जमल्यानंतर तुम्ही याद्वारे चांगले व्हिडिओ एडिट करु शकता.
Features –
- Animation tools – यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात Animation चे effect पाहायला मिळतात.
- Layers – व्हिडिओचे Dimension बदलणे तसेच त्यामध्ये 3D किंवा 2D effect add करु शकता.
- Audio Limiter – Professional audio editing तुम्ही याद्वारे करु शकता. Audio edit करण्यासाठी तुम्हाला दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर Download करण्याची आवश्यकता नाही.
- Transition – जे effect ऍड केले आहेत त्यामध्ये Smooth transition होण्यास मदत होते.
४. Shotcut
Shotcut हे नाव ऐकून खूप जणांना वाटेल कि हे फक्त व्हिडिओ cut करण्यासाठी आहे, परंतु असे नाही. बाकीच्या सर्व Free video editing software प्रमाणे हे देखील व्हिडिओ cut करण्या व्यतिरिक्त बरेच काही करु शकते.
Features –
- Wide-format – विविध प्रकारच्या फॉरमॅटमध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करु शकता. यामध्ये तुम्ही 4K resolution सह व्हिडिओ एडिट करु शकता.
- Audio Features – तुम्ही आवाजाची loudness कमी जास्त करु शकता. Audio filter चा वापर करुन विविध effect लावू शकता.
- Video effect – 360 angle मध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करुन त्यामध्ये natural colors चा वापर करु शकता.
- Editing Features – व्हिडिओ Cut, Copy आणि Paste करण्यासाठी सर्वात सोपे आहे. Drag आणि Drop करुन व्हिडीओ एडिटिंग करु शकता.
तुम्ही हे सॉफ्टवेअर Linux, Windows आणि Mac Os मध्ये वापरु शकता.
५. VSDC
VSDC हे सॉफ्टवेअर केवळ Windows ऑपरेटिंग सिस्टिमसाठी बनवले गेले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही ते सर्व काम करु शकता जे Paid video editing software करतात.
Features –
- 4K Video Editing – 4K मध्ये व्हिडिओ एडिट करुन quality मध्ये बदल करु शकता.
- 3D Video
- 360 angle video – विविध angle वरुन घेतलेल्या व्हिडिओ तुम्ही ह्यामध्ये एडिट करु शकता.
- Live color Correction – व्हिडिओ एडिट करत असताना चालू मध्ये तुम्ही एखाद्या Object चा color बदलू शकता.
ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने व्हिडिओ एडिट करु शकता. त्या सोबतच वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे.
६. blender
हे एक सर्वोत्तम चांगले फ्री व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने आपण ग्राफिक्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल करु शकतो. blender हे सॉफ्टवेअर जास्त करुन त्यांच्यासाठी आहे ज्यांना Graphics शी related खूप सारे काम असते.
Features –
- Modeling – याच्या मदतीने तुम्ही विविध Cartoon मॉडेल्स तयार करु शकता.
- Animation – तुम्ही ह्या द्वारे High quality मध्ये animation effect ऍड करु शकता.
- Simulation – तुम्ही विविध Situation साठी सिम्युलेशन देखील तयार करु शकता.
- Video editing – सर्व प्रकारचे video editing tools तुम्हाला यामध्ये मिळतील.
वरील सर्व प्रकारचे features बघून तुम्हाला कळलेच असेल कि हे सॉफ्टवेअर किती फायदेशीर आहे. हे सॉफ्टवेअर वापरणे सुरुवातीला अवघड जाईल परंतु, एकदा सवय झाल्यावर तुम्ही Next level editing करु शकता.
हे सॉफ्टवेअर तुम्ही Linux, Windows आणि Mac Os मध्ये वापरु शकता.
निष्कर्ष –
तुम्हाला आज सगळे Free video editing software marathi मध्ये माहित झाले. वरील सॉफ्टवेअर तुम्हाला कसे वाटले त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला Comment मध्ये कळवा.
ह्या फ्री सॉफ्टवेअर विषयी तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला कंमेंटमध्ये कळवा. हि माहिती तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा.
अशाच Tips & Tricks साठी आम्हाला follow करा.