ब्लॉगिंग म्हणजे काय – ब्लॉगसाठी योग्य Niche कसा शोधायचा?|Blog meaning in marathi

ब्लॉगिंग विषयी अधिक जाणून घेण्या अगोदर blog meaning in marathi आपण समजून घेऊ कि ब्लॉगिंग म्हणजे नक्की आहे तरी काय ?

ब्लॉगिंग म्हणजे आपल्याला वाटेल त्या विषयावर लिखाण करुन ते इंटरनेट वर Publish करणे एवढेच नव्हे. ब्लॉगिंग या पेक्षा बरेच काही आहे.

सध्या इंटरनेट वर किंवा ऑनलाईन पैसे कमवण्याच्या मार्गांमध्ये ब्लॉगिंग हे नाव फार प्रचलित आहे. त्यामुळे आज आपण येथे ब्लॉगिंग म्हणजे काय (blog meaning in marathi) या विषयी माहिती घेणार आहोत त्या सोबतच ब्लॉगसाठी योग्य Niche कशा प्रकारे शोधायचा हे देखील पाहणार आहे.

ब्लॉगिंग म्हणजे काय ?|Blog meaning in marathi

ब्लॉगिंग विषयी जाणून घेण्याची तुमची ही उत्सुकता आत्ता आपण कमी करुया. ब्लॉगिंग म्हणजे काय (blog meaning in marathi) हे आपण एका उदाहरणाद्वारे समजूया.

समजा, तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल खूप Knowledge आहे. तुमचे मित्र कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेताना तुम्हाला विचारतात. तुमच्याकडे सल्ला मागतात. अशा वेळेस तुम्ही त्यांना त्यांच्या बजेटनुसार एक चांगला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप Suggest करता.

परंतु, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कसा घ्यावा? किती किमतीचा घ्यावा हा प्रश्न फक्त तुमच्या मित्रांनाच पडतो का?

तर नाही. असे किती तरी लोक असतील ज्यांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेताना सल्ल्याची गरज पडत असेल. त्यांना सल्ला देण्याचे काम तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवून करु शकता.

ब्लॉगिंग म्हणजे आपल्याला आवडत असलेल्या किंवा जास्त माहिती असलेल्या विषयावर लोकांना माहिती देणे.

इंटरनेटच्या साहाय्याने जास्तीत-जास्त आणि गरजू लोकांपर्यत जाऊन त्यांना एखाद्या विषयावर माहिती देण्याचा चांगला मार्ग म्हणजे ब्लॉगिंग.

आपण इंटरनेटवर एखादी गोष्ट Search केल्यानंतर जी माहिती आपल्या समोर येते. त्यातील काही ब्लॉग असतात तर काही वेबसाईट.

What is Blogging in Marathi

तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का ?

आपण Google वर एखादी गोष्ट Search केल्यानंतर जी माहिती मिळते. ती माहिती Google ला नेमकी मिळते कुठून. तर ती माहिती असते ब्लॉगवरील. ब्लॉग वर माहिती लिहिणार्यांना आपण  ब्लॉगर  म्हणतो.

ब्लॉगरचे दोन प्रकार आहेत.

 • Personal Blogger – या प्रकारचे ब्लॉगर फक्त आपल्या स्वतःसाठी किंवा एक प्रकारे आठवण म्हणून ब्लॉग वर माहिती टाकतात. अशा प्रकारच्या ब्लॉगरचा उद्देश हा ब्लॉगिंगद्वारे पैसे कमावण्याचा नसतो.
 • Professional Blogger – हे ब्लॉगर विविध विषयावर ब्लॉग तयार करुन ते लोकांपर्यंत पोहोचवतात. अशा ब्लॉगरचा मूळ उद्देश हा पैसे कमवणे असतो.

आज दिवसेंदिवस ब्लॉगर वाढत चालले आहेत. याचे मूळ कारण म्हणजे लोकांना कळले आहे कि ब्लॉगिंगद्वारे आपण पैसे कमवू शकतो. परंतु ब्लॉगिंगद्वारे पैसे कमवण्यासाठी आपल्याला ब्लॉगिंग हा Business आहे हे समजून घ्यायला हवे.

जगात खूप सारे ब्लॉगर आहेत. जे महिन्याला लाखो-करोडो रुपये कमावतात ते पण फक्त ब्लॉगिंगद्वारे. तुम्हाला कदाचित हे खरे वाटणार नाही. परंतु जग बदलत चालले आहे आणि त्या बरोबरच कमाईचे मार्ग देखील बदलत आहेत.

तुम्हाला पण जर ब्लॉगिंगद्वारे लाखो-करोडो रुपये कमवायचे असतील तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये काम करताना ब्लॉगिंगला स्वतःचा Business मानले पाहिजे आणि त्यानुसार काम केले पाहिजे.


ब्लॉगसाठी योग्य Niche कसा शोधायचा ?

blog-meaning-in-marathi

ब्लॉगिंगला सुरुवात करण्याअगोदर आपला ब्लॉग कोणत्या विषयावर असेल हे ठरवणे फार महत्वाचे असते. ब्लॉगचा विषय यालाच इंग्लिशमध्ये Niche असे देखील म्हणतात.

नवंनवीन ब्लॉगर जेव्हा ब्लॉगिंगला सुरुवात करतात तेव्हा त्यांचे ब्लॉगिंगमध्ये यशस्वी न होण्याचे मूळ कारण म्हणजे योग्य Niche न निवडणे. ब्लॉगिंगमध्ये यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या ब्लॉगसाठी योग्य विषय (Niche) निवडणे.

ब्लॉगिंगमध्ये career करायचे असल्यास आपल्याला ब्लॉगकडे Business म्हणून पाहावे लागते. Niche हा ब्लॉगिंगचा पाया आहे जर तो मजबूत नसेल तर आपण ब्लॉगिंगमध्ये जास्त दिवस टिकू शकत नाही.

त्यामुळे ब्लॉग सुरु करण्याअगोदर आपण योग्य Research करुन फायदेशीर असा NIche शोधणे गरजेचे आहे.

आज आम्ही तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंगच्या प्रवासामध्ये Niche विषयी थोडी माहिती सांगणार आहे. जेणे करुन तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉगिंगमध्ये Niche शी निगडित काही त्रास किंवा नुकसान सहन करायला लागणार नाही.

Niche म्हणजे काय ?

जर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये नवीन असाल तर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की Niche म्हणजे काय?

आपल्याला ब्लॉग म्हणजे वाटायचे की आपण हव्या त्या विषयावर लिहू शकतो. आपण आपल्या जीवनाविषयी किंवा इतर असा कोणताही विषय ज्यावर आपल्याला लिहायचे असेल. आज एका विषयावर तर उद्या दुसऱ्या विषयावर.

पण जर तुम्ही आजच्या वेळेला असे केले तर ब्लॉगिंगद्वारे पैसे कमवणे तर लांबची गोष्ट तुम्ही ह्याच्याकडे career किंवा Business म्हणून बघणे सुद्धा चुकीचे ठरेल.

आज ब्लॉगिंगची पद्धत बदली आहे. आज इंटरनेटवर सगळे ब्लॉग हे वेगवेगळ्या Niche शी निगडित आहेत.

Niche म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर फक्त जर Health(आरोग्य) विषयी माहिती देत असाल तर मग Health हा तुमच्या ब्लॉगचा Niche झाला. आपण इथे Health चे उदाहरण दिले. तुमचा ब्लॉग दुसऱ्या कोणत्याही विषयावर असे शकतो तर तो तुमच्या ब्लॉगचा Niche आहे.

हे वाचा – ब्लॉगिंगमध्ये डोमेन नेम काय असते ?


Niche चे प्रकार

Multi Niche

जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर Health, Sports, Fashion, Technology अशा वेगवेगळ्या विषयावर लिहत असाल तर अशा ब्लॉगला Multi Niche ब्लॉग म्हणतात. आपण ज्या News Website किंवा ब्लॉग पाहतो त्या सर्व Multi Niche आहेत. उदा: ndtv.com, esakal.com

अशा प्रकारच्या ब्लॉग वर खूप पोस्ट टाकावे लागतात. हा ब्लॉग Multi Niche असल्याने यावर पोस्ट लिहण्यासाठी जास्त Keyword Research तसेच Topic शोधावा लागत नाही.

Advantages –

 • ह्या प्रकारच्या ब्लॉगमध्ये कमाई चांगली होते.
 • ब्लॉगवर मोठ्या प्रमाणात Traffic येते.
 • वेगवेगळ्या टॉपिक वर आपण पोस्ट लिहू शकतो.

Disadvantages –

 • हे ब्लॉग Rank करणे अवघड असते.
 • खूप SEO (Search Engine Optimisation) करावे लागते.
 • जास्त पोस्ट लिहाव्या लागतात.
 • ब्लॉगची Authority बनण्यास वेळ लागतो.

Specific/Single Niche

जर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर फक्त Technology विषयी लिहत असाल संपूर्ण ब्लॉग हा Technology वर असेल तर त्या ब्लॉगला आपण Specific Niche ब्लॉग असे म्हणतो. उदा: shoutmemarathi.net

अशा प्रकारचा Niche Long-term च्या दृष्टीने फायदेशीर मानला जातो.

Advantages –

 • Multi Niche च्या तुलनेत कमी काम करावे लागते.
 • Multi Niche च्या तुलनेने कमी पोस्ट लिहाव्या लागतात.
 • ब्लॉगची Authority बनण्यास फार मदत होते.
 • ब्लॉग Rank होण्यास मदत होते.

Disadvantages –

 • Multi Niche च्या तुलनेने कमाई थोडी कमी होते.

Micro Niche

समजा, तुम्ही Technology च्या देखील आतमध्ये जाऊन फक्त Mi phone बद्दल माहिती देत असाल इतर कोणत्याही फोनबद्दल तुम्ही माहिती देत नसाल. तुमचा संपूर्ण ब्लॉग हा Mi phone वर आहे तर तो Micro Niche ब्लॉग आहे.

आज खूप सारे Micro Niche ब्लॉग आहेत. कारण हे ब्लॉग खूप फायदेशीर असतात.

Advantages –

 • फार कमी काम करावे लागते.
 • जास्त SEO (Search Engine Optimisation) करावे लागत नाही.
 • जास्त पोस्ट लिहायला लागत नाही.
 • ब्लॉग पोस्ट लवकर Rank होतात.
 • ब्लॉगची Authority वाढते.
 • Conversion Rate खूप असतो.

Disadvantages –

 • कमाई थोडी होते Multi Niche आणि Specific Niche च्या तुलनेने.
 • ब्लॉगवर Limited Traffic येते.

ब्लॉगसाठी फायदेशीर Niche कसा शोधायचा ?

मार्केटमध्ये तीन प्रमुख Niche आहेत. यशस्वी ब्लॉगर प्रामुख्याने या तीन Niche मध्ये कार्यरत आहेत – Wealth(संपत्ती), Health(आरोग्य), Relationship(नाते).

आज आपल्याला इंटरनेटवर जेवढे ब्लॉग दिसतील त्यातील बरेच ब्लॉग हे याच Niche शी निगडित आहेत.

Wealth, Health, Relationship यामध्ये कोणकोणते Sub-niche तसेच Micro-niche टॉपिक येतात, ज्यावर आपण ब्लॉग बनवू शकतो ते पाहूया. जेणे करुन आपल्याला ब्लॉगसाठी Niche निवडण्यास मदत होईल.

Wealth Market

ह्यामध्ये आपण Business, Real estate, Share market ह्या सारख्या विषयांवर(Niche) ब्लॉग बनवू शकतो.

Wealth market मध्ये आपण ह्या सगळ्या विषयांवर लिहू शकतो. पण जर आपण यामधील एकच Niche निवडला तर जास्त फायदेशीर राहील. Single आणि Micro Niche असण्याचे Advantages – Disadvantages आपण वर पाहिले. त्यानुसार आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

आता आपण Wealth Niche मध्ये आणखी आतमध्ये जाऊन काही Topic पाहूया ज्यावर आपण ब्लॉग बनवू शकतो.

१. Technology (तंत्रज्ञान)

Technology मध्ये आपण Tech news, Apps/Laptop/Smartphone Review अशा वेगवेगळया विषयांवर लिहू शकतो. खूप लोक नवीन लॅपटॉप किंवा स्मार्टफोन घेताना Suggestion(सल्ला) म्हणून Google वर Search करतात.

अशा लोकांना तुम्ही तुमच्या ब्लॉगद्वारे मदत करु शकता. विविध प्रकारचे Tech news देऊ शकता.

२. Online Job (नोकरी)

आज लाखो तरुण जॉब शोधण्यासाठी indeed.co.in, naukari.com सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. आपण online job site बनवून विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जॉब विषयी माहिती देऊ शकतो.

विविध State मध्ये उपलब्ध असणाऱ्या जॉब विषयी माहिती गोळा करुन आपण ती आपल्या ब्लॉग वर टाकू शकतो. त्यासोबत जॉबला Apply करण्यासाठी लागणारे contact detail देऊ शकतो.

३. Finance (अर्थ व्यवस्था)

आपण लोकांना Mutual Fund, Share Market, Stocks यासारख्या विषयावर लोकांना Knowledge देऊ शकता. लाखोंच्या संख्येने लोक Equity, डिमॅट अकाउंट याविषयी search करतात. तुम्ही Finance या विषयावर ब्लॉग बनवून लोकांना Guide करु शकता.

स्वतःचे खर्च कसे manage करावे, Passive income source कसा तयार करावा याविषयी माहिती देऊ शकता.

४. Business (व्यवसाय)

व्यवसाय कसा सुरु करायचा, व्यवसाय online कसा घेऊन जायचा अशा व्यवसायाशी निगडित असणाऱ्या टॉपिक वर आपण Articles लिहू शकतो.

कोणत्या पण व्यवसायाची मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते. Product sell कशा प्रकारे वाढवला जातो याविषयी आपण काही Techniques किंवा Tips ब्लॉगच्या मार्फत सांगू शकतो.

Health Market

आज इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य(Health) या विषयावर Search केले जाते. Healthy राहण्यासाठी लोक विविध उपाय Search करतात.

तुम्हाला Health या मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी विषयी जास्त माहिती आहे किंवा Health मधील असा विषय ज्या विषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडते अशा टॉपिक वर तुम्ही ब्लॉग Create करु शकता. Health मध्ये असे कोणते टॉपिक आहेत ज्यावर आपण ब्लॉग बनवू शकतो ते पाहूया.

१. Weight Loss/Gain (वजन कमी होणे/वाढणे)

जिम न करता वजन कशा प्रकारे कमी करता येईल याविषयी स्त्री असो वा पुरुष दोघेही मोठ्या प्रमाणावर Search करतात. वजन कमी करण्यासाठी कोणता Diet plan follow करावा या विषयी आपण लोकांना मार्गदर्शन करु शकतो.

वजन वाढवण्यासाठी आपण काय खायला हवे. कोणत्या पदार्थामध्ये किती प्रोटीन असतात याविषयी आपण लोकांना माहिती सांगू शकतो.

२. Stress Management (ताण व्यवस्थापन)

भारतात १० माणसांमागे प्रत्येगी २ माणसे ही Stress मध्ये असतात. आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. Stress मुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक आत्महत्या करतात. काही व्यक्तींना तर आपण Stress मध्ये आहोत याची जाणीव देखील होत नाही.

Stress ची लक्षणे कोणती? Stress आल्यास तसेच कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी आपण लोकांना माहिती देऊ शकतो. Stress सोबत लढण्यास आपण त्यांची मदत करु शकतो.

३. Diet Plan (आहार योजना)

व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी कोणते अन्न खायला हवे व कोणते टाळायला हवे याविषयी आपण माहिती देऊ शकतो. तसेच Weight gain आणि loss करण्यासाठी कोणता Diet plan follow करावा याविषयी आपण लोंकाना माहिती देऊ शकतो.

४. Beauty Tips (सौंदर्य टिप्स)

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि त्यासाठी वेगवेगळे beauty tip देखील वापरतो. इंटरनेटवर सुंदर दिसण्यासाठी कोणकोणत्या tips आहेत ह्या विषयी स्त्री -पुरुष मोठ्या प्रमाणावर Search करतात.

आपण दोन्ही Gender साठी विविध प्रकारचे Beauty tips देणारा एक उत्कृष्ट ब्लॉग बनवू शकतो. यामध्ये आपण Natural पद्धतीने कशा प्रकारे आपले सौंदर्य वाढवू शकतो या विषयी देखील सांगू शकतो.

Relationship Market

आज तरुण पिढी नाते संबंधाच्या मागे संपूर्ण आयुष्य खराब करुन घेते. चित्रपटांच्या माध्यमातून हे लोक चुकीच्या पद्धतीने नाते संबंधाचा अर्थ समजतात. नाते संबंधा विषयी आपण लोकांना Guide करु शकतो.

१. Relationship speech (नातेसंबंध भाषण) 

आपण कार्यक्रमांसाठी तसेच कुटुंब दिनासाठी भाषण तयार करु शकतो. नाते संबंधाच्या विषयावर तुम्ही लोकांना मार्गदर्शन करु शकता.

२. Inspirational Thoughts (प्रेरणादायक विचार) 

आज लोकांमध्ये मोटिवेशनची फार कमी आहे. मोटिवेशन मिळण्यासाठी ते इंटरनेटवर सतत मोटिवेशनल speech. status, Quotes Search करत राहतात. तुम्ही प्रेरणादायक विचार ब्लॉगच्या माध्यमातून Share करु शकता.

स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत मोटिव्हेटेड कसे रहावे, वाईट काळामध्ये देखील कसे प्रेरणादायक रहावे याविषयी तुम्ही लोकांना सांगू शकता.

Wealth, Health, Relationship मध्ये आम्ही जे काही Niche तुम्हाला सांगितले या व्यतिरिक्त देखील इतर Niche वर तुम्ही ब्लॉग बनवू शकता. यासाठी तुम्ही इंटरनेटवर या मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी येतात या विषयी Search करु शकता आणि त्यापैकी एका टॉपिक वर तुम्ही ब्लॉग बनवू शकता.

blog-meaning-in-marathi

Niche निवडण्या अगोदर स्वतःला हे प्रश्न विचारा | Ask Yourself These Questions Before Choosing Niche

नवीन ब्लॉगर वाटेल त्या विषयावर ब्लॉग बनवतात आणि काही दिवसांनी हार मानतात. आम्ही आपणास अगोदर पण सांगितले Niche हा ब्लॉगचा पाया आहे. जर तुमचा पाया मजबूत नसेल तर तुम्ही फार काळ ह्या Industry मध्ये टिकू शकणार नाही.

हि पोस्ट संपण्या अगोदर आम्ही आपणाला काही प्रश्न विचारणार आहोत.

प्रश्न १: तुम्ही या Niche मध्ये आनंदी आहात का?

ब्लॉगिंगमध्ये Niche निवडताना खूप जण पैशांचा विचार करुन Niche निवडतात. ज्या niche मध्ये जास्त पैसे मिळतात त्या niche मध्ये ते ब्लॉग बनवतात आणि काही दिवसांनी Fail होतात.

कारण त्यांनी ब्लॉग्गिंगसाठी जो Niche निवडलेला असतो तो त्यांच्या आवडीचा नसतो.

तुम्ही जो पण Niche निवडाल गरजेचे नाही कि त्यामध्ये तुम्ही Expert असायला हवे पण त्या niche मध्ये तुम्हाला Interest असला पाहिजे. जर त्या niche मध्ये तुम्हाला Interest असेल तर तुम्ही Research करुन content तयार करु शकता.

प्रश्न २: या Niche मध्ये जास्त काळ काम करु शकता का?

आपण ब्लॉगिंगसाठी जो पण Niche निवडू त्यामध्ये आपण Long term च्या दृष्टीने काम करु शकतो का हे पाहणे देखील खूप महत्वाचे आहे.

ब्लॉगिंगद्वारे Income सुरु होण्यास वेळ लागतो. त्यामुळे जर निवडलेल्या niche मध्ये तुम्ही जास्त काळ काम करु शकत नसाल तर पुढे जाऊन तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून आताचं स्वतःला प्रश्न विचारा ह्या niche मध्ये तुम्ही जास्त काळ काम करु शकता का?

प्रश्न ३: ह्या Niche मध्ये पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहेत?

ब्लॉगमध्ये पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत. परंतु त्यापैकी दोन प्रमुख मार्ग म्हणजे – Google Adsence, Affiliate Marketing.

तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग निवडणार हे ठरवा.

Affiliate Marketing साठी तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये कोणता Product Sell करणार. तो Product Physical असणार का Digital(Online) हे देखील तुम्ही तुमच्या Niche च्या Accordingly ठरवायला हवे.

Google Adsence द्वारे कमाई करणार असाल तर तुमच्या niche मध्ये किती cpc मिळतो हे तुम्हाला ठाऊक असायला हवे. Google Adsence द्वारे कमाई करणार असाल तर भरपूर Traffic लागेल. हा Traffic तुम्ही कसा आणणार याचा विचार करा.

या सर्व गोष्टींचा विचार करुन तुम्ही ब्लॉगसाठी Niche निवडायला हवा.


आज तुम्ही काय शिकलात ?

आज तुम्ही येथे ब्लॉगिंगला सुरुवात करण्याअगोदर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे Niche Selection (ब्लॉगसाठी विषय निवडणे) शिकलात.

आपण तयार केलेला ब्लॉग भविष्यात यशस्वी होईल कि नाही हे खुप साऱ्या गोष्टींवरती अवलंबून असते. त्या सर्व गोष्टींमध्ये Niche हा देखील एक महत्वाचा घटक आहे.

आपण वरील पोस्टमध्ये ब्लॉग म्हणजे काय (blog meaning in marathi) तसेच niche म्हणजे काय आणि आपल्या ब्लॉगसाठी योग्य niche कसा शोधायचा हे पाहिले.

वरील संपूर्ण पोस्ट वाचल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी योग्य Niche शोधण्यासाठी अडचण येत असेल किंवा काही समस्या असेल तर तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता.

जर तुम्हाला वाटत असेल हि पोस्ट नवीन ब्लॉगर बनण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर असेल तर तुम्ही ही पोस्ट सोशल मीडिया तसेच व्हाट्सअँप द्वारे इतरांसोबत share करु शकता.

तुमच्या एका शेअर मुळे कदाचित एखाद्या चांगल्या नवीन ब्लॉगरचा जन्म होऊ शकतो.

Leave a Comment