Business idea in marathi : २० रुपये किमतीची वस्तू ४० रुपयांना विकली जाते, ५० टक्के प्रॉफिटवाला हा व्यवसाय तुम्हाला बनवेल मालामाल

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आपण स्वतःचा एखादा असा व्यवसाय करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु कोणता व्यवसाय करावा हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. बरेच लोक जेवण पुरवण्याचा व्यवसाय करतात तर काही जण वेगवेगळे प्रॉडक्ट विकण्याचा व्यवसाय करत असतात. या प्रत्येक व्यवसायात प्रॉफिट मार्जिन देखील वेगवेगळे असते.

पण आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चक्क ५० टक्के प्रॉफिट शिल्लक राहते. कारण या व्यवसायात १० रुपयांची वस्तू २० रुपयांना आणि २० रुपयांची वस्तू ४० रुपयांना विकली जाते.

हा व्यवसाय आहे स्टेशनरी वस्तू विकण्याचा यामध्ये तुम्हाला भांडवल देखील कमी लागते. स्टेशनरी वस्तूमध्ये तुम्ही पेन, पेन्सिल, नोटबुक, भेटकार्ड आणि लग्नपत्रिका या सारख्या गोष्टी विकू शकता. स्टेशनरीचे दुकान खोलण्यासाठी तुम्हाला 300 ते 400 चौरस मीटर जागा लागेल.

स्टेशनरी दुकानासाठी किती खर्च येईल ?

स्टेशनरी व्यवसाय तुम्ही कमी भांडवल लावून सुरु करु शकता. ४० ते ५० हजार रुपयांमध्ये तुम्ही एक चांगले स्टेशनरी दुकान टाकू शकता. स्टेशनरी दुकान टाकताना तुमच्या दुकानाची जागा कुठे आहे हे देखील फार महत्वाचे आहे. जर तुम्ही स्टेशनरी दुकान शाळा किंवा कॉलेजच्या जवळ टाकले तर तुम्ही जास्त वस्तू विकू शकता.

स्टेशनरी वस्तू तुम्ही घाऊक विक्रेत्यांकडून घेऊन शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन किरकोळ किमतीला त्या विकू शकता. अशा प्रकारे हळूहळू तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करु शकता.

किती कमाई होईल ?

जर तुम्ही या व्यवसायात चांगल्या प्रकारे भांडवल लावले व योग्य ठिकाणी म्हणजेच शाळा किंवा कॉलेजच्या जवळ दुकान टाकले तर तुम्ही महिन्याला सहज ४० ते ५० हजार रुपये कमवू शकता.

या व्यवसायात तुमचे दुकान कुठे टाकले आहे हे फार महत्वाचे आहे. तसेच या व्यवसायातून कमाई वाढवण्यासाठी तुम्ही लहान शाळांशी चांगले नेटवर्क तयार करुन त्यांना फक्त तुमच्याकडूनच पुस्तके, नोटबुक घेण्यासाठी सांगू शकता. यामुळे तुमची कमाई देखील जास्त होईल.

हे वाचा –  लेमनग्रासच्या मागणीत होतेय मोठ्या प्रमाणात वाढ, २५ हजार रुपये गुंतवून ५ लाख रुपये होईल कमाई

या व्यवसायात थोडीशी मार्केटिंगची देखील आवश्यकता असते. यासाठी तुम्ही तुमच्या दुकानाचे पॅम्प्लेट छापून शाळा आणि कॉलेजच्या आजूबाजूच्या भिंतीवर लावू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment