All Purpose Cream making business: जर तुम्हाला देखील जॉब सोबत स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर मग हा खास व्यवसाय तुमच्यासाठी आहे.
हा व्यवसाय आहे All Purpose क्रीम बनवण्याचा. शहरांमध्ये तसेच गावात देखील या क्रीमची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
तुम्ही हा व्यवसाय शहरात किंवा गावी राहून देखील सुरु करु शकता. वर्षातील १२ ही महिने या क्रीमची डिमांड असते. तसेच भविष्यात या क्रीमची मागणी आणखी वाढणार आहे.
ऑल पर्पज क्रीम काय आहे?
ऑल पर्पज क्रीम एक सफेद क्रीम असते. या क्रीमचा वापर त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचेला ओलाव्या पासून संरक्षण देण्यासाठी केला जातो.
या क्रीमचा वापर बारा ही महिने केला जातो त्यामुळे या क्रीमला फार डिमांड आहे. तसेच देशात ज्या प्रकारे ब्युटी पार्लर व्यवसाय वाढत चालला आहे त्यानुसार या क्रीमची मागणी भविष्यात आणखी वाढेल.
गाव असो किंवा शहर सगळीकडे या क्रीमची डिमांड असल्यामुळे कोणी सुद्धा या व्यवसायाद्वारे चांगले प्रॉफिट मिळवू शकते.
किती पैशात सुरु होईल बिझनेस
खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) ने ऑल पर्पज क्रीम मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर एक प्रकल्प तयार केला आहे. या रिपोर्टनुसार ऑल पर्पज क्रीमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 14.95 लाख रुपये इतका एकूण खर्च येतो.
पण हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 1.52 लाख रुपये द्यायचे आहेत. बाकी तुम्ही लोन घेऊ शकता. तुम्हाला 4.44 लाख रुपये टर्म लोन मिळेल आणि भांडवलासाठी 9 लाख रुपयांचे कर्ज देखील घेऊ शकता.
रिपोर्ट नुसार ऑल पर्पज क्रीम मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु करण्यासाठी तुमच्याकडे 400 चौरस मीटर जमीन असली पाहिजे. तुम्ही ही जागा भाड्याने देखील घेऊ शकता.
या व्यवसायात प्लांट आणि यंत्रसामग्रीसाठी 3.43 लाख, फर्निचर आणि फिक्सरवर 1 लाख, ऑपरेशनपूर्व खर्च 50 हजार, खेळत्या भांडवलासाठी 10.25 लाख इतका खर्च येतो.
या व्यवसायाची एकूण प्रोजेक्ट कॉस्ट 15.17 लाख रुपये आहे.
हे वाचा – या व्यवसायात सरकार देते २५ टक्के अनुदान, महिन्याला होईल २ लाख कमाई
कमाई किती होईल?
जर तुम्ही पूर्ण क्षमतेने हे काम सुरु केले तर पहिल्या वर्षी सर्व खर्च वजा केल्यावर तुम्हाला 6 लाख रुपये निव्वळ नफा मिळेल.
व्यवसायात जसजशी वाढ होईल तसतशी तुमची कमाई दरवर्षी वाढेल. रिपोर्ट नुसार, पाचव्या वर्षी तुमचा नफा 9 लाखांपेक्षा जास्त असेल.