हे सेंटर जर घरी खोलले, तर महिन्याचे ३० ते ४० हजार सहज कमवाल – असा सुरु करा व्यवसाय

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्हाला कमी पैशात स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा असेल तर हा व्यवसाय तुम्ही डोळे बंद करुन सुरु करु शकता.

या व्यवसायात सुरुवातीला तुम्हाला जास्त पैसे लावण्याची आवश्यकता नाही व हा व्यवसाय तुम्ही घरी बसून चालवू शकता.

पण जर हा व्यवसाय तुम्ही गर्दीच्या ठिकाणी बसून सुरु केला तर तुमचा व्यवसाय आणखी चांगल्या प्रकारे वाढवता येऊ शकतो. तसेच या व्यवसायाद्वारे तुम्ही महिन्याला ३० ते ४० हजार अगदी सहज कमवू शकता.

चला तर आपण त्या बिझनेस आयडिया विषयी माहिती घेऊया.

ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र खोलून महिन्याला ३० ते ४० हजार अशा प्रकारे कमवा

तुम्ही कधी ना कधी स्वतःचे आधार कार्ड दुरुस्त करण्यासाठी किंवा पॅन कार्ड काढण्यासाठी एकदा तरी ग्राहक सेवा केंद्रामध्ये(Common Service Center) गेला असाल.

ग्राहक सेवा केंद्र हा व्यवसाय सुरु करुन तुम्ही लोकांना खालील सेवा देऊ शकता व महिन्याला ४० हजार रुपये कमवू शकता.

  • नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुने आधार कार्ड दुरुस्त करुन देणे.
  • पॅन कार्ड काढणे.
  • तहसीलदार किंवा तलाठी दाखला काढून देणे.
  • रेशन कार्ड काढून देणे.
  • परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म भरणे.
  • वेगवेगळ्या Government Scheme आणि योजनाचे फॉर्म भरणे.

या सारख्या खूप सेवा तुम्ही तुमच्या ग्राहकांना पुरवू शकता. तसेच या सेवा पुरवण्यासाठी तुम्ही त्यांच्या कडून ठराविक रक्कम घेऊ शकता.

ग्राहक सेवा केंद्र हा व्यवसाय तुम्ही घरी बसून नक्कीच सुरु करु शकता पण जर तुम्हाला जास्त ग्राहक मिळवायचे असतील तर हा व्यवसाय तुम्ही गर्दीच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या गावात किंवा शहराच्या ठिकाणी चालू करा.

या सोबतच जर तुम्ही तुमच्या ग्राहकांशी चांगले बोलला व व्यवस्थितपणे त्यांचे काम करुन दिले तर ते नेहमी तुमच्याकडे येतील व अशा प्रकारे महिन्याला ३० ते ४० हजार कमवणे तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही.

ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र खोलण्यासाठी लागणारी आवश्यक उपकरणे

जर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम Csc ID घ्यावी लागेल.

या सोबतच तुम्हाला तुमच्या दुकानात काही उपकरणे ठेवणे फार गरजेचे आहे. जसे की कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेशन करण्याची मशीन या सर्व गोष्टी तुमच्या ग्राहक सेवा केंद्र(Common Service Center) मध्ये असणे गरजेचे आहे.

२० रुपये किमतीची वस्तू ४० रुपयांना विकली जाते, ५० टक्के प्रॉफिटवाला हा व्यवसाय तुम्हाला बनवेल मालामाल

ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राद्वारे किती कमाई होईल?

मगाशी सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय तुम्ही घरी बसून देखील सुरु करु शकता पण जर तुम्हाला जास्त कमाई करायची असेल तर हा व्यवसाय तुम्ही गर्दीच्या ठिकाणी सुरु करा.

या व्यवसायात तुम्हाला जास्त भांडवल देखील लागत नाही. तुम्हाला फक्त दुकानाचे भाडे आणि वर दिलेली उपकरणे खरेदी करायला पैसे खर्च करावे लागतील. साधारण ४० हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय चालू करु शकता.

चांगले ठिकाण निवडून जर तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर महिन्याचे किमान ३० हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता. ठराविक काळानंतर जेव्हा लोकांना तुम्ही देत असलेल्या सेवांविषयी माहिती होईल तेव्हा तुमची कमाई आणखी वाढेल.

Leave a Comment