आजच्या या डिजिटल युगात आपल्याला सायबर क्राईमची रिपोर्ट ऑनलाईन कशी करायची (Cyber Crime complaint online marathi) हे माहित असणे फार आवश्यक आहे.
सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच या माध्यमांच्या मदतीने सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात केले जातात.
तसेच दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. परंतु, सामान्य जनतेला या सायबर क्राईमची रिपोर्ट कशी करायची हे माहित नाही.
तुम्हाला माहित आहे का आता आपण ऑनलाईन पद्धतीने सायबर क्राईमची तक्रार करु शकतो.
आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सायबर क्राईमची ऑनलाईन तक्रार कशी करायची हे सांगणार आहे. त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा.
सायबर क्राईम म्हणजे काय ?
इंटरनेटच्या साहाय्याने अश्लील व्हिडिओ पाठवणे, धमकी देणे, आपले वैयक्तिक फोटो-व्हिडिओ Viral करणे या सारख्या गोष्टी सायबर क्राईममध्ये येतात.
सायबर क्राईम विविध प्रकारे केले जातात. हे सायबर क्राईम कशा प्रकारे केले जातात ते तुम्ही खाली पाहू शकता.
१. बऱ्याचदा आपल्याला अनोळखी व्हाट्सअँप ग्रुपमध्ये ऍड केले जाते आणि नको त्या गोष्टी शेअर केल्या जातात. आपले फोटो फेसबुकच्या माध्यमातून Viral करणे, फोटो खाली अश्लील कॉमेंट करणे हे सर्व सायबर क्राईममध्ये येते.
२. तुम्हाला अनोळखी नंबर वरुन कॉल येतो. तुमचा Lucky Draw मध्ये नंबर लागला आहे आणि ते पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर द्यावा लागेल. असे Fraud दररोज कुणा सोबत तरी होत असतात.
३. इंटरनेटचा वापर करताना तुमच्या समोर एक स्क्रीन ओपन होते. त्यामध्ये तुम्हाला spin करायचे असते व काटा ज्या वस्तू वर थांबेल ती वस्तू तुम्हाला मोफत मिळेल असे सांगितले जाते.
यामध्ये iphone, Watch, Car, Cycle अशा आकर्षक वस्तू असतात. नंतर या वस्तू मिळवण्यासाठी आपल्याकडून E-Mail ID, Mobile Number, Bank Account Number मागितला जातो.
सायबर क्राईम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खालील Audio Clip ऐकू शकता.
सायबर क्राईमची ऑनलाईन तक्रार कशी करायची?।Cyber Crime complaint online marathi
जर तुमच्या सोबत एखादा ऑनलाईन fraud झाला तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्येच करायला हवी असे काही नसते. तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने आपली तक्रार नोंदविता येते,
मी तुम्हाला येथे ऑनलाईन सायबर क्राईम विषयी तक्रार कशी नोंदवायची या विषयी Step by Step माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला तक्रार नोंदविताना कोणती ही अडचण येणार नाही.
सायबर क्राईम तक्रार तुम्ही ऑनलाईन (Cyber Crime complaint online marathi) पद्धतीने खालील प्रकारे करु शकता.
स्टेप १ – कोणत्याही प्रकारची सायबर क्राईम तक्रार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या cybercrime.gov.in वर जावे लागेल. यासाठी तुम्ही गूगल वर Cyber Crime Portal असे देखील सर्च करु शकता.
स्टेप २ – Cyber Crime Portal वर गेल्यानंतर तुमच्या पुढे सर्वप्रथम 1930 हा Helpline Number दिसेल. वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला बरेच option दिसतील.
महिला आणि लहान मुलांसोबत होणाऱ्या क्राईमची तक्रार करण्यासाठी पहिल्या ऑपशन वर क्लिक करा. तसेच अन्य सायबर क्राईम तक्रारीसाठी दुसऱ्या ऑपशन वर क्लिक करा.
स्टेप ३ – Report other Cyber Crime बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑपशन येतील. त्यातील File a Complaint बटनावर क्लिक करा.
त्यानंतर समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये ” तुम्ही जी सायबर क्राईम तक्रार करत आहे ती खरी असली पाहिजे तक्रार खोटी असल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते ” असा एक मेसेज सांगण्यात येईल. पुढे I Accept बटनावर क्लिक करा.
स्टेप ४ – तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. तुम्ही जर या पोर्टल वर पहिल्यांदा आला असाल तर Click here for new user बटनावर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुम्ही राहत असलेला तालुका, तुमचा ई-मेल आयडी, तुमचा मोबाइल नंबर टाकून Get OTP वर क्लिक केल्यानंतर एक OTP पाठवला जाईल तो तुम्हाला येथे टाकावा लागेल. त्यानंतर Captcha भरुन तुम्हाला Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
स्टेप ५ – तुमच्या समोर User Profile Detail नावाचे पेज ओपन होईल. येथे तुम्हाला Login ID, Title, तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, लिंग, ई-मेल आयडी, आईचे किंवा वडिलांचे नाव अशा प्रकारची माहिती भरावी लागेल.
त्यानंतर Save & Continue बटनावर क्लिक करा. तुमची प्रोफाईल त्यानंतर अपडेट करण्यात येईल.
स्टेप ६ – त्यानंतर तुमच्या समोर पुढील पेज ओपन होईल. येथे तुम्ही तुमची तक्रार आता नोंदवू शकता. तक्रार नोंदवण्याचा या पेजमध्ये तुम्हाला चार Option दिसतील.
- Incident Details
- Suspect Details
- Complainant Details
- Preview & Submit
तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याला वरील चार प्रक्रिया मधून जावे लागेल.
स्टेप ७ (Incident Details) – Incident Details मध्ये तुमच्या सोबत काय झाले आहे ते सांगावे लागेल.
Category of Complaint येथे तुमच्या सोबत कोणत्या प्रकारचा सायबर क्राईम झाला आहे हे Select करावे लागेल. Example: Online and Social Media Related Crime, Online Financial Fraud, Hacking Computer System, Online Gambling, Cryptocurrency Crime.
Sub Category of Complaint येथे तुम्हाला तक्रारीतील एक घटक निवडावा लागतो. Example: Cheating of Impersonation, Cyber Bullying, Email Phishing, Fake Profile, Online Job Fraud असे खूप घटक तुम्हाला येथे मिळतील.
पुढे तुमच्या सोबत Cyber Crime कधी झाला त्या दिवसाची तारीख व वेळ टाकावी लागेल. पुढे तुम्ही तक्रार उशिरा करत आहे का तेथे Yes किंवा No असे निवडावे लागेल.
जर तक्रार उशिरा करत असाल तर त्याचे कारण देखील द्यावे लागेल. नंतर तुमच्या सोबत सायबर क्राईम कोठे झाला ते सिलेक्ट करावे लागेल. जसे ई-मेल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, युट्युब इत्यादी.
पुढे तुमच्या सोबत काय घडले ते टाईप करुन सांगावे लागेल. तुम्ही तुमचे म्हणणे १५०० शब्दांमध्ये मांडू शकता. त्यानंतर Save as Draft & Next बटनावर क्लिक करा.
स्टेप ८ (Suspect Details) – त्यानंतर तुमच्या समोर Suspect Details हे पेज ओपन होईल. येथे तुम्हाला ज्या व्यक्तीवर शंका आहे तिचे सर्व details तुम्ही येथे टाकू शकता.
तुम्हाला ज्या व्यक्तीवर शंका आहे तिचे नाव टाकावे लागेल. पुढे तुम्हाला त्या व्यक्तीचा ई-मेल, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट नंबर माहित असेल तर ते टाकावे लागेल व जे सिलेक्ट केले आहे त्याची माहिती द्यावी लागेल.
तुम्हाला ज्या व्यक्तीवर शंका आहे त्याचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही येथे अपलोड करु शकता. तुम्हाला त्या व्यक्तीचा ऍड्रेस माहित असेल तर Yes व नसेल माहित तर No बटनावर क्लिक करा.
त्यानंतर Save as Draft & Next बटनावर क्लिक करा.
स्टेप ९ (Complainant Details) – Complainant/Victim Details या पेजवर तुम्हाला ज्याच्या वर शंका आहे त्याची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
यामध्ये त्याचे नाव, पत्ता, जन्म तारीख अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती भरावी लागेल. तसेच त्याचा ID Proof देखील अपलोड करावा लागेल.
खालच्या बाजूला त्या व्यक्तीचा पत्ता टाकून Save & Preview या बटनावर क्लिक करा.
स्टेप १० (Preview & Submit) – या पूर्वी तुम्ही जी माहिती भरली आहे ती योग्य आहे का नाही ती पून्हा तुम्ही येथे चेक करु शकता. सर्व माहिती योग्य असल्यास I Agree या बटनावर क्लिक करा. त्यानंतर Confirm & Submit बटनावर क्लिक करा.
त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल. तुम्हाला एक Acknowledgement नंबर मिळेल. हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वर देखील मिळेल.
सायबर क्राईम अहवालाची स्थिती कशी चेक करायची?|How to Check Cyber Crime Report Status
सायबर क्राईमची तक्रार नोंदविल्यानंतर आपल्याला शेवटी एक Acknowledgement नंबर मिळतो. त्या नंबरच्या साहाय्याने तुम्ही Cyber Crime Report Status चेक करु शकता.
Cyber Crime Report Status चेक करण्यासाठी सर्वप्रथम cybercrime.gov.in वर जावे लागेल. तेथे वरच्या बाजूला तुम्हाला Track Your Complaint या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्हाला Acknowledgement नंबर टाकून Get OTP बटनावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. तो OTP येथे टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला Cyber Crime Report Status तुमच्या समोर दिसेल.
आज तुम्ही काय शिकलात ?
देशात घडणाऱ्या इतर गुन्ह्याप्रमाणे सायबर गुन्हा म्हणजे सायबर क्राईमचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परंतु, या पासून आपले व आपल्या कुटुंबाचे देखील रक्षण करणे गरजेचे आहे.
जर तुमच्या सोबत सायबर क्राईम झाला तर सायबर क्राईमची ऑनलाईन तक्रार कशी करायची (Cyber Crime complaint online marathi) या विषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला येथे सांगितली आहे.
वरील माहिती विषयक जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारु शकता.
मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल व लोकांना सायबर क्राईम विषयी जागरुक करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही माहिती मित्रांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करु शकता.
सायबर क्राईमची तक्रार ऑनलाईन कशी नोंदवायची ?
सायबर क्राईमची तक्रार तुम्ही Cyber Crime Portal वर ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता.
सायबर क्राईमचा Helpline Number काय आहे ?
सायबर क्राईमचा Helpline Number हा 1930 आहे.
सायबर क्राईम अहवालाची स्थिती कशी चेक करायची?|How to Check Cyber Crime Report Status
सायबर क्राईमची तक्रार ऑनलाईन नोंदविल्यानंतर आपल्याला एक Acknowledgement नंबर मिळतो. Cyber Crime Portal वर जाऊन तेथे Track Your Complaint ऑपशन वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला मिळालेला Acknowledgement नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही सायबर क्राईम अहवालाची स्थिती पाहू शकता.