मार्केटमध्ये सध्या पेट्रोल स्कूटर सोबत इलेक्ट्रिक स्कूटर देखील मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. महागड्या पेट्रोलच्या खर्चापासून वाचण्यासाठी लोक इलेक्ट्रिक स्कूटर जास्त प्रमाणात वापरु लागले आहे. पण इलेक्ट्रिक स्कूटर आपण जास्त लांब घेऊ जाऊ शकत नाही. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग करायची असल्यास ती आपल्याला घरीच चार्ज करावी लागते.
या सर्व समस्यांमुळे आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे जर स्कूटर चार्जिंग आणि पेट्रोल दोन्ही वर चालली असती तर किती बरे झाले असते. असा विचार आपल्या मनामध्ये एकदा तरी आला असेल आणि आपल्या मनातील हा विचार आता Yamaha कंपनीने पूर्ण करुन दाखवला आहे.
पेट्रोल आणि चार्जिंगवर चालणारी स्कूटर झाली लाँच
बाईक आणि स्कूटर बनवण्यात प्रसिद्ध असणारी कंपनी यामाहाने नुकतीच एक हायब्रीड स्कूटर लाँच केली आहे. जिचे नाव Yamaha Fascino Fi Hybrid Scooter असे आहे. तुम्ही ही स्कूटर पेट्रोल आणि चार्जिंगच्या मदतीने सहज चालवू शकता. जर तुम्ही बाहेर फिरताना तुमचे पेट्रोल संपले तर तुम्ही या स्कूटरला बॅटरी वर आणि बॅटरी संपल्यास पेट्रोल वर वापरु शकता.
हे आहेत फीचर्स
Yamaha Fascino Fi Hybrid स्कूटरमध्ये 125cc चे इंजिन बसवण्यात आले आहे. जे 8.2hp पॉवर आणि 10.3Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या स्कूटरचे वजन फक्त ९९ किलो आहे. तसेच यामध्ये आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऍपल फ्युएल कंझ्युमर ट्रॅकर, मेंटेनन्स, लास्ट पार्किंग व्हेन्यू, खराबी नोटिफिकेशन, रायडर रँकिंग सारखे स्मार्ट फीचर्स पहायला मिळतात.
अशा प्रकारे ६ हजारात मिळेल स्कूटर
या स्कूटरची शोरुम किंमत ९० हजाराच्या आसपास आहे. तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तेथे किंमत थोडी कमी किंवा जास्त असू शकते. पण तुम्ही ही स्कूटर मात्र ६ हजाराच्या डाउन पेमेंट वर खरेदी करु शकता.