पुढील काही महिन्यांमध्ये खूप सण येणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचा असा लहान व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा एकदम योग्य टाईम आहे. तसेच जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त भांडवल जरी नसेल तरी देखील हा व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता.
हा व्यवसाय १२ ही महिने चांगल्या प्रकारे चालतो. तसेच वर्षातील काही खास सणांच्या कालावधीत या व्यवसायाद्वारे जास्त पैसे कमवण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते.
Low Investment Business – Inkjet Plotter
Inkjet Plotter मशीनचा वापर १२ ही महिने नॉनस्टॉप केला जातो. पण सणांच्या दिवसांमध्ये या मशीनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. सणांच्या कालावधीत काम इतके मिळते की २४ तास ही मशीन चालू ठेवावी लागते.
या मशीनचा वापर भिंती वरील वॉलपेपर तयार करण्यासाठी केला जातो. तुम्हाला फक्त एक ग्राफिक डिज़ाइनरची आवश्यकता असते. घर, दुकान आणि ऑफिस मधील सर्व भिंतीसाठी सुंदर आणि आकर्षक वॉलपेपर बनवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो.
सणांमध्ये वाढते डिमांड
पुढील काही महिन्यांमध्ये खूप वेगवेगळे सण येणार आहेत. त्यामुळे लोक त्यांचे घर, ऑफिस किंवा दुकानचे रिनोवेशन करतात. अशा काळात ज्यांच्याकडे ही मशीन आहे त्यांना मोठ्या प्रमाणात कामाची ऑर्डर येते.
सणांच्या कालावधीत कामाचा लोड इतका वाढतो की या मशीन वर काम करणाऱ्या व्यक्तींना इतर काम करण्यासाठी वेळच मिळत नाही.
कसा सुरु कराल व्यवसाय?
Inkjet Plotter मशीनची किंमत बाजारामध्ये तिच्या Specification नुसार वेगवेगळी आहे. तुम्हाला १ ते २ लाखांमध्ये चांगली मशीन मिळून जाईल. या मशीन वर चांगल्या प्रकारे वॉलपेपर डिजाईन करण्यासाठी तुम्हाला एका ग्राफिक डिज़ाइनरची गरज पडेल. या व्यतिरिक्त ही मशीन ठेवण्यासाठी आणि काम करण्यासाठी तुम्हाला किमान १०*१० च्या खोलीची गरज पडेल.
आता तुम्हाला लोकांकडून त्यांचे घर किंवा ऑफिसचे वॉलपेपर डिजाईन करण्याचे काम मिळवावे लागेल. यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही इंटिरियर डिज़ाइनरचे काम करणाऱ्या व्यक्तीं सोबत कॉन्टॅक्ट वाढवा. त्यांच्या कडून तुम्हाला मोठ्या प्रमाणात वॉलपेपर डिजाईनचे काम मिळून जाईल.
या व्यतिरिक्त जे लोक घरात किंवा ऑफीसमध्ये नवीन फर्निचर किंवा फिटिंगची कामे करतात त्यांच्या सोबत चांगली मैत्री करा म्हणजे जेव्हा त्यांना असे काम मिळेल तेव्हा ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगतील.
हे पहा – आता फक्त 10वी पास व्यक्ती देखील उघडू शकतो कीटकनाशक दुकान, कसे ते पहा
कमाई किती असेल?
तुम्ही कोणत्या ठिकाणी हा व्यवसाय सुरु करत आहे तसेच तेथील मार्केटमध्ये किती लोक अशा प्रकारचे काम करत आहे या सर्व गोष्टींवर तुमची कमाई अवलंबून असेल. जर तुमच्या Area मध्ये फार कमी लोक हा व्यवसाय करत असतील तर तुम्ही जास्त पैसे कमवू शकता.
कारण जर तुमच्या भागात जास्त लोक हा व्यवसाय करत असतील तर Competition खूप वाढेल. त्यामुळे तुम्हाला ग्राहक कमी मिळतील व तुमची कमाई देखील कमी होईल. या व्यवसायात तुम्ही किती पैसे कमवू शकता हे जाणून घेण्यासाठी १ दिवसासाठी मार्केट सर्वे करा. यामुळे तुम्हाला मार्केट साईझ आणि प्रॉफिट मार्जिन या विषयी माहित होईल.