सध्या मोबाईल आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. दिवसातून किती तरी वेळा आपण फोन हातात घेतो व त्यामध्ये वेगवेगळ्या activity करत असतो. मोबाईलमध्ये आपण ज्या सर्व activity करतो त्या सर्व Private आहेत असे आपल्याला वाटते पण जर आपला मोबाईल कोणी हॅक केला असेल किंवा ट्रॅक करत असेल तर. अशा परिस्थितीत तुम्ही फोनमध्ये जे काही करत असाल त्या सर्व गोष्टी दुसरे देखील कोणी तरी पाहत असेल.
तुमच्या फोनमध्ये तुमचे बँक अकाऊंटची details असू शकतात तसेच विविध प्रकारचे private फोटो किंवा विडिओ असू शकतात. या सर्व गोष्टींद्वारे तुम्हाला समोरील व्यक्ती ब्लॅकमेल करु शकते किंवा तुमच्या कडून विशिष्ट गोष्टीची मागणी करु शकते.
जर तुम्हाला वाटत असेल की या सर्व गोष्टी तुमच्या सोबत घडू नये त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल privacy आणि Security ची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आज आपण येथे कोणी तरी आपला मोबाईल ट्रॅक करत आहे हे कसे ओळखायचे आणि त्यापासून सुरक्षित कसे रहायचे या विषयी माहिती पाहणार आहोत.
मोबाईल ट्रॅकिंगची चिन्हे
1. अचानक बॅटरी संपणे –
जर तुमच्या मोबाईलची बॅटरी नेहमीपेक्षा लवकर संपत असेल तर हे मोबाईल ट्रॅकिंगचे लक्षण असू शकते. आपल्या फोनला ट्रॅक करणारे apps आणि spyware background मध्ये चालू असतात त्यामुळे जरी तुम्ही फोन वापरत नसला तरी हे अँप्स तुमची बॅटरी मोठ्या प्रमाणात वापरतात.
2. इंटरनेटचा विनाकारण जास्त वापर –
कारण नसताना इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होणे हा एक प्रकारचा संकेत आहे की तुमचा मोबाईल unauthorized source कडे तुमचा सर्व डेटा ट्रान्सफर करत आहे. ट्रॅकिंग सॉफ्टवेअर अनेकदा जमा केलेली माहिती रिमोट सर्व्हरला पाठवतात, त्यामुळे डेटा वापरामध्ये अनपेक्षित वाढ होते.
3. मोबाईल जास्त गरम होणे –
तुम्ही मोठ्या प्रमाणात किंवा लगातार मोबाईल वापरत नसले तरी फोन जास्त गरम होतो हे देखील मोबाईल ट्रॅकिंग मुळे होते. ट्रॅकिंग सॉफ्टवेअर आणि स्पायवेअर background ला शांतपणे कार्य करत असल्याने तुमचे डिव्हाइस जास्त प्रमाणात गरम होते.
4. कॉल दरम्यान विचित्र background आवाज येणे –
कॉलवर बोलत असताना background मधून क्लिक आवाज येणे या सारख्या गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असतील तर म्हणजे तुमचे बोलणे कोणी तरी ऐकत आहे असा होतो. background मधून क्लिक आवाज येणे किंवा static, echoes सारखा आवाज येणे या सर्व गोष्टी कॉल रेकॉर्डिंग किंवा interception software तुमच्या फोनमध्ये असल्याचे दर्शवतात.
ट्रॅकिंगपासून मोबाईलचे रक्षण कसे करायचे ?
तुमच्या मोबाइल गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी आणि ट्रॅकिंग रोखण्यासाठी तुम्ही खालील उपायांचा वापर करु शकता.
1. तुमचे डिव्हाइस नियमितपणे अपडेट करा – तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टिम, अँप्स आणि security patches updated ठेवा.
2. antivirus आणि anti-spyware अँप इन्स्टॉल करा – तुमच्या मोबाईल मधून ट्रॅकिंग सॉफ्टवेअर किंवा मालवेअर स्कॅन करण्यासाठी आणि काढण्यासाठी एक Trusted antivirus आणि anti-spyware अँप वापरा.
3. संशयास्पद लिंक आणि डाउनलोड पासून सावध रहा – संशयास्पद लिंक वर क्लिक करणे किंवा unverified sources कडून अँप डाउनलोड करणे टाळा. malicious सॉफ्टवेअर चुकून डाउनलोड होण्याचा धोका टाळण्यासाठी official अँप स्टोअर वरुन किंवा reputable websites वरुन इतर गोष्टी डाउनलोड करा.
4. app permissions आणि privacy settings चेक करा – तुमच्या मोबाईल मधील अँपला देण्यात आलेल्या Permission वेळोवेळी चेक करा. अनावश्यक परवानग्या देऊ नका ज्याचा संभाव्यपणे ट्रॅकिंग किंवा डेटा संकलनासाठी गैरवापर होऊ शकतो.
5. मजबूत आणि unique पासवर्ड वापरा – मजबूत पासवर्ड, पिन किंवा बायोमेट्रिक authentication द्वारे तुमचे डिव्हाइस सुरक्षित करा. सहज अंदाज लावता येणारे पासवर्ड वापरणे टाळा आणि extra लेअरची security साठी two-factor authentication चालू करा.
6. अँप आणि इंटरनेटच्या वापराचे निरीक्षण करा – डेटा वापरामध्ये तुम्हाला अचानक वाढ दिसून आल्यास, संभाव्य tracking activities ओळखण्यासाठी पुढील तपास सुरु करा.
7. फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध रहा – ईमेल, मेसेज किंवा कॉलद्वारे होणाऱ्या फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध रहा जे तुम्हाला वैयक्तिक माहिती उघड करण्यासाठी फसवण्याचा प्रयत्न करतात.
8. मोबाइल सुरक्षितते बद्दल स्वतःला शिक्षित(Educate) करा – नवीन मोबाईल सुरक्षा धोक्यांपासून सावध राहण्याबाबत माहिती मिळवत रहा. तुमच्या मोबाइल गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी अपडेट्स आणि टिपांसाठी विश्वासू ऑनलाइन स्रोतांना फॉलो करा.
हे पहा – तुमचे लाईट बिल निम्मे कमी करेल ही मशीन, लोकांना माहित झाले तर ते सुद्धा घरात बसवतील ही मशीन
आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात, मोबाईल ट्रॅकिंग अनेक व्यक्तींसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अचानक बॅटरी संपणे, असामान्य डेटा वापर आणि विचित्र नेटवर्क activity या सारख्या मोबाईल ट्रॅकिंगच्या लक्षणांबद्दल जागरुक राहून, तुम्ही तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी विविध पावले उचलू शकता.
तुमचा मोबाइल सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी सतर्क राहणे, तुमचे डिव्हाइस नियमितपणे अपडेट करणे, विश्वासू सुरक्षा अँप्स Install करणे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहे.
अशाच टेकनॉलॉजि अपडेट्ससाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇