Anime म्हणजे काय? हे एवढे प्रसिद्ध का आहेत । Anime meaning in marathi

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आपल्या पैकी सर्वांनी लहान असताना कधी ना कधी कार्टून पाहिले असेल. कार्टून पाहणे सर्वांना आवडते. पण जर तुम्हाला वाटत असेल Anime देखील कार्टूनचा एक प्रकार आहे. तर मग तुम्ही थोडा चुकीचा विचार करत आहात.

ऍनिमे पाहताना तुम्हाला जरी कार्टून प्रमाणे दिसत असले तरी हे कार्टून पेक्षा काही प्रमाणात वेगळे असते.

तर मग ऍनिमे म्हणजे काय(anime meaning in marathi) व कार्टून आणि ऍनिमेमध्ये काय फरक असतो हे आज आपण येथे पाहणार आहोत. मला खात्री आहे ही संपूर्ण पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही स्वतः एक तरी ऍनिमे पाहण्यासाठी नक्की उत्सुक व्हाल.

या पोस्टमध्ये मी तुम्हाला काही चांगले ऍनिमे देखील सांगणार आहे जे तुम्हाला खूप आवडतील. त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा.

Anime म्हणजे काय। Anime meaning in marathi

anime-meaning-in-marathi

ऍनिमे हा एक जपानी शब्द आहे. जपानमध्ये ऍनिमेशनचा वापर करुन ज्या movie आणि series बनवल्या जातात त्यांना तेथे Anime असे म्हटले जाते.

ऍनिमे हा शब्द जपान, अमेरिका सारख्या विकसित देशांमध्ये फार प्रचलित आहे.

ज्या प्रकारे आपल्या देशात मराठी, हिंदी, south movie चे वेगळे मार्केट आहे. त्याच प्रमाणे या देशांमध्ये ऍनिमेचे देखील खूप मोठे मार्केट आहे. येथे ऍनिमे फक्त लहान मुले नाही तर मोठी माणसे देखील anime movie आणि series आवडीने बघतात.

जपान हा देश कार्टून बनवण्यात फार फेमस आहे आणि या गोष्टींचाच फायदा त्यांना ऍनिमे बनवताना देखील झाला. Doraemon, shinchan या सारखे फेमस कार्टून तुम्ही एकदा तरी नक्की पाहिले असणार. हे सर्व जपानने बनवलेले कार्टून आहे.

जपान हा देश कोणत्याही प्रकारचे ऍनिमे बनवताना त्या मधील Character अशा प्रकारे तयार करतात कि तुम्हाला ते ऍनिमे आहे असे कधी वाटणार नाही. त्यामुळे असे खूप ऍनिमे character आहे जे फार प्रसिद्ध आहे.


ऍनिमे आणि कार्टूनमध्ये काय फरक आहे ?

जर तुम्ही पहिल्यांदा ऍनिमे विषयी ऐकले असेल तर ऍनिमे आणि कार्टून सारखेच असते असा गैरसमज तुमचा देखील झाला असेल.

ऍनिमे आणि कार्टूनमध्ये काय फरक असतो हे पाहण्यासाठी तुम्ही खालील महत्वाचे पॉईंट पाहू शकता.

  • कार्टून लहान मुलांसाठी काही character एकत्र करुन तयार केलेली एक कॉमेडी स्टोरी असते. तर ऍनिमे खतरनाक animation चा वापर करुन एक danger तयार केलेली स्टोरी असते.
  • कार्टूनमध्ये साधे ऍनिमेशन वापरले जाते तर ऍनिमेमध्ये मोठ्या प्रमाणात VFX आणि Animation चा वापर करण्यात आलेला असतो.
  • कार्टून मधील मूवी आणि सिरीजचे बजेट कमी असते तर ऍनिमे मूवी आणि सिरीजचे बजेट कधी-कधी हॉलिवूड मूवी इतके असते.
  • कार्टून मधील प्रत्येक character साधे म्हणजे त्याला पाहून तुम्हाला भीती वाटणार नाही असे असते पण ऍनिमे मधील जवळपास सगळे character खतरनाक असतात. ऍनिमे मधील character कडे खूप शक्ती असते.
  • कार्टून लहान मुलांना आवडते पण मोठ्या मुलांना ते आवडत नाही. तर ऍनिमे सगळ्या वयातील लोकांना पाहायला आवडते.
  • कार्टूनमध्ये जास्त एपिसोड नसतात. पण ऍनिमेमध्ये खूप एपिसोड पहायला मिळतात.

हा काही फरक आहे जो आपल्याला कार्टून आणि ऍनिमेमध्ये पहायला मिळतो.


ऍनिमेची सुरुवात कशी झाली ?

ऍनिमे हा शब्द 1900 च्या दशकाच्या सुरुवातीस “ekonte” (picture stories) and “douga” (moving pictures) सारख्या जपानी animated media चे वर्णन करण्यासाठी वापरला जात असे.

सुरुवातीला ऍनिमेशनचे काम सेल शीटवर हाताने ऍनिमे काढणे अशा पारंपारिक पद्धतीने केले जात असे.

1960 च्या दशकात, जपानमध्ये दूरदर्शन प्रसारणाच्या वाढीसह ऍनिमे आणखी प्रसिद्ध होऊ लागले. 1963 मध्ये प्रसारित झालेली आणि Osamu Tezuka द्वारे तयार केलेली “Astro Boy” ही ऍनिमे मालिका फार प्रसिद्ध झाली.

1970 आणि 1980 च्या दशकात,ऍनिमेने जपानमध्ये लोकप्रियता मिळवणे सुरुच ठेवले आणि इतर देशांमध्ये ऍनिमे release करणे सुरु केले. 1980 च्या दशकात विशेषत: ऍनिमे निर्मितीमध्ये भरभराट झाली आणि “मोबाइल सूट गुंडम” आणि “ड्रॅगन बॉल” सारख्या आता प्रसिद्ध असणाऱ्या ऍनिमे मालिकांची सुरुवात झाली.

आज ऍनिमेचा संपूर्ण जगभरात एक वेगळाच fanbase आहे.


ऍनिमेचे प्रकार कोणते आहेत | What are the types of anime in marathi

आपल्याला येथे ऍनिमेचे खूप वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. ऍनिमेचे हे प्रकार तुम्ही खाली पाहू शकता.

ShonenSeinen
ShojoJosei
Cowboy BebopMecha
Fruits BasketCode Geass
Slice of lifeHarem
IsekaiVampire Knight
Magical girlPerfect Blue
Ping PongSailor Moon

बेस्ट ऍनिमे सीरिज कोणत्या आहेत | What are the best anime series in marathi

इंटरनेट वर शोधायला गेल्यास असे खूप ऍनिमे मिळतील जे फार प्रसिद्ध आहे. पण मी तुम्हाला येथे काही खूप फेमस असणाऱ्या ऍनिमेची नावे सांगणार आहे.

जर तुम्ही अजून एकदा पण ऍनिमे पाहिले नसेल तर खाली दिलेल्या ऍनिमे पासून तुम्ही ऍनिमे बघण्यास सुरुवात करु शकता.

  1. One Punch Man
  2. Death Note
  3. Attack On Titan
  4. Lookism
  5. Dragon ball
  6. Naruto
  7. My Hero Academia
  8. One Piece
  9. Cowboy Bebop
  10. Hunter x Hunter

ऍनिमे कसे पाहायचे? | How to watch anime in marathi

ऍनिमे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सुरक्षित माध्यमांचा वापर करु शकता.

1. Subscription Streaming Services

काही प्रसिद्ध streaming services जसे कि Netflix, Hulu, Amazon Prime Video आणि Crunchyroll आपल्याला विविध प्रकारचे anime series आणि movies पाहण्यासाठी उपलब्ध करुन देतात.

या प्लॅटफॉर्म वर ऍनिमे पाहण्यासाठी आपल्याला monthly fee द्यावी लागते.

2. Free Streaming Services

Pluto TV, Tubi आणि Anime-Planet सारख्या काही फ्री streaming सर्विसेस आहेत ज्या आपल्याला फ्री मध्ये anime series आणि movies पाहण्याची संधी देतात.

या फ्री streaming सर्विसेस असल्या तरी यांच्याद्वारे ऍनिमे पाहताना आपल्याला काही ads दिसतात. ज्याद्वारे या वेबसाईट कमाई करतात व आपल्याला फ्री मध्ये ऍनिमे पाहू देतात.

3. Rental or purchase

ऍनिमे पाहण्याचा हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ऑनलाईन स्टोअर जसे की Amazon, Google Play आणि iTunes सारख्या प्लॅटफॉर्म वरुन ऍनिमे रेंट किंवा डायरेक्ट खरेदी करु शकता.

असे केल्यास तुम्ही पाहिजे तेव्हा ऍनिमे पाहण्याचा आनंद लुटू शकता.

हे वाचा – फोटो viral होण्यासाठी चांगले Caption कसे शोधायचे ?


FAQ –

1. ऍनिमे कोणत्या भाषेत पहायला मिळतात ?

Anime प्रामुख्याने जपानमध्ये तयार केले जातात त्यामुळे ऍनिमे मूवी आणि सिरीज आपल्याला japanese भाषेत जास्त पाहायला मिळतात. पण ऍनिमे आता आपल्याला dubbed भाषेत म्हणजे इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन आणि हिंदी भाषेत देखील पाहायला मिळतात.

2. ऍनिमे पाहणे सुरक्षित आहे का ?

ऍनिमे पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. ऍनिमे पाहताना एक काळजी घ्या की तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म वरुन ऍनिमे पाहणार आहे तो प्लॅटफॉर्म legal असला पाहिजे.


Conclusion

काही वेळ मनोरंजनासाठी ऍनिमे पाहणे हा एक उत्तम पर्याय आहे. ऍनिमे ज्या प्रकारे तयार केले जातात, त्या मध्ये जसे ऍनिमेशन व VFX वापरले जाते त्या नुसार ऍनिमे बघण्यासाठी फार आकर्षक वाटते.

आज आपण येथे ऍनिमे म्हणजे काय(anime meaning in marathi) तसेच ऍनिमे विषयी इतर माहिती पाहिली. एवढी माहिती वाचल्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला ऍनिमे म्हणजे काय(anime meaning in marathi) अशी शंका राहिली असेल.

जर तुम्हाला वरील माहिती विषयी काही शंका असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता.

या ब्लॉग वर Publish होणाऱ्या अशाच नवीन माहितीची Notification मिळवण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment