दररोज इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी कल्पना करा की जर हे इंटरनेट तुम्ही त्याच्याकडे जी माहिती मागता ती अचूक दाखवण्यासोबत तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या राहणीमानानुसार तुम्हाला माहिती देऊ लागले तर. तुम्ही व्यक्ती म्हणून कोण आहे तसेच काय सर्च करु शकता हे समजून घेऊ लागले तर.असे झाले तर काय होईल ?
भविष्यात येणारे इंटरनेटचे नवीन Version किंवा जे आले आहे असे देखील म्हणता येईल त्याबद्दल तुम्हाला माहित आहे का ?
आपण सर्व जण वेब उत्क्रांतीच्या अशा टप्प्यावर आलो आहे. जेथे इंटरनेट आपल्याला अधिक सोयी पुरवण्यासाठी सज्ज आहे. भविष्यात येणाऱ्या इंटरनेटच्या या नवीन वेब उत्क्रांतीला Web 3.0 या नावाने ओळखले जाते.
आज मी तुम्हाला वेबची नवीन उत्क्रांती Web 3.0 विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला Web 3.0 विषयी अधिक माहिती घेण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही.
Web 3.0 काय आहे। Web 3.0 meaning in marathi
Web 3.0 इंटरनेटची तिसरी पिढी आहे जिथे वेबसाईट व अँप्स हे मशीन लर्निंग, जास्त डेटा तसेच Decentralized ledger technologyच्या साहाय्याने मिळालेल्या माहितीवर मानवाप्रमाणे प्रक्रिया करण्यास सक्षम असतील.
इंटरनेटची येणारी ही नवीन पिढी म्हणजे Web 3.0 बुद्धिमान तसेच मुक्त इंटरनेट पुरवणारी पिढी असणार आहे. Web 3.0 ही इंटरनेटची अशी पिढी आहे जेथे आपली Privacy(वैयक्तिक माहिती) पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण आपल्या Device मध्ये काय करतो हे केवळ आपल्यालाच माहित असेल इतर कोणाला ही नाही.
Web 3.0 विषयी विस्तारमध्ये माहिती घेण्याअगोदर तुम्हाला वेब उत्क्रांतीच्या प्रकाराविषयी माहित असणे गरजेचे आहे.
वेब उत्क्रांतीचे प्रकार – Types of Web Evolution
Web 1.0 (1992-2004)
Web 1.0 ही इंटरनेटची सुरुवातीची पिढी आहे. ज्यावेळी Web 1.0 ची सुरुवात झाली तेव्हा इंटरनेट वर केवळ Static Website होती.
Static Website म्हणजे अशा प्रकारची वेबसाईट जेथे User केवळ माहिती वाचू शकतो. त्या माहितीवर आपले मत मांडू शकत नाही. तसेच ती माहिती Share करु शकत नाही किंवा Like देखील करु शकत नाही. इंटरनेटच्या या पहिल्या पिढीमध्ये कोणत्याही प्रकारचे Algorithm नव्हते. त्यामुळे User ला माहिती शोधण्यासाठी फार त्रास होत होता.
इंटरनेटची पहिली पिढी म्हणजेच Web 1.0 ही माहिती शोधण्यासाठी खूप त्रासदायक होती तसेच जर माहिती मिळाली तर आपण त्यावर प्रतिक्रिया करु शकत नव्हतो.
Web 2.0 (2004-आतापर्यंत)
इंटरनेट वरील HTML, JavaScript तसेच CSS3 च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेबसाईट तसेच अँप्लिकेशन अधिक संवाद करण्यासाठी तयार होऊ लागले. ज्यामुळे वेबवर आधारीत नवीन स्टार्टअप जसे की Youtube, Facebook सारख्या कंपनीला गती मिळाली.
Web 2.0 मध्ये आपण वेबसाईट वर केवळ माहिती वाचू शकत नाही तर त्यावर Comment करु शकतो. वाचलेली माहिती इतरांसोबत Share करु शकतो. माहितीला Like करु शकतो. हे सर्व Web 2.0 मुळे शक्य होते. तसेच आपण सर्च केलेली माहिती अचूक मिळण्यासाठी Search Engine च्या Algorithm मध्ये वेळोवेळी बदल करण्यात येऊ लागले.
Web 2.0 चे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर आता तुम्ही ही माहिती ज्या वेबसाईट वर वाचत आहे. ह्या वेबसाईट वरील कोणत्याही माहितीवर तुम्ही कंमेंट करु शकता तसेच ती इतरांसोबत Share देखील करु शकता. या सर्व सोयीसुविधा Web 1.0 मध्ये नसायच्या.
Web 2.0 मध्ये येणाऱ्या सर्व वेबसाईटला Dynamic & Interactive Website असे म्हणतात.
Web 3.0 (येणे बाकी आहे)
Web 3.0 हा वेब उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे. जो इंटरनेटला अधिक बुद्धिवान बनवेल. तसेच स्मार्ट प्रोग्राम चालवू शकणाऱ्या Artificial Intelligence तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाप्रमाणे मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करुन आपल्यासाठी इंटरनेट वरील सोयी सुविधा वाढवेल.
आपण एखादी माहिती सर्च करताना आपल्या आवडीनुसार कोणती माहिती आपल्यासाठी उत्तम राहील याचा निर्णय Artificial Intelligence घेईल आणि तशी माहिती आपल्याला देईल.
Web 3.0 ची प्रमुख वैशिष्ट्ये
तसे पाहायला गेले तर Web 3.0 ची खूप वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी काही वैशिष्ट्ये खालील आहेत.
सगळीकडे माहिती राहते
कोणत्याही वेबसाईट वर असलेली माहिती ही त्या वेबसाईटच्या होस्टिंगमध्ये Store करुन ठेवलेली असते. पण जेव्हा हे सर्वर हॅक केले जातात किंवा ते खराब होतात अशा वेळी त्यामध्ये असणारी माहिती नष्ट होते.
Web 3.0 मध्ये येणाऱ्या सर्व वेबसाईट वरील माहिती विविध ठिकाणी Store केलेली असते. ज्यामुळे एका ठिकाणी जरी माहिती नष्ट करण्यात आली तरी तीच माहिती आपल्याला विविध ठिकाणांहून मिळण्यास तयार असते.
वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते
Web 2.0 मध्ये येणारे सर्व वेबसाईट व अँप्लिकेशन आपली वैयक्तिक माहिती घेतात जेणे करुन ते आपल्या Location नुसार व आवडीनुसार आपल्याला योग्य माहिती पुरवू शकतील. पण आपण दिलेल्या ह्याच वैयक्तिक माहितीचा वापर ते पैसे कमवण्यासाठी देखील करतात.
मोठं-मोठ्या कंपन्यांना तसेच मार्केटिंग Agency ला हे आपली वैयक्तिक माहिती विकतात व त्यांकडून पैसे घेतात. परंतु यामुळे आपली Privacy धोक्यात येते.
परंतु, Web 3.0 मध्ये आपली माहिती ही पूर्णपणे आपल्याजवळ सुरक्षित असते. येथे कोणत्याही वेबसाईट किंवा अँपला आपल्याला स्वतःची वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसते.
Artificial Intelligence
Artificial Intelligence हे Web 3.0 मधील प्रमुख व लक्ष देण्यासारखे वैशिष्ट्ये आहे.
Artificial Intelligence मुळे प्रत्येक User ला त्याच्या आवडीनुसार माहिती पुरवण्यास मदत होईल. Web 3.0 मधील Artificial Intelligence मानवाचे हावभाव समजू शकेल. त्याच्या आवडीनिवडी समजून त्याला योग्य वस्तू खरेदी करण्यास प्रोत्साहित करेल.
या लेखावरील माझे मत
Web 3.0 आपल्याला स्वतःच्या आवडीनुसार माहिती पुरवते व एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सुचविते. तसेच विविध वेब अँप्लिकेशनसाठी आपल्याला वैयक्तिक माहिती देण्याची गरज राहणार नाही. इंटरनेटची तिसरी पिढी म्हणजे Web 3.0 आपल्याला उपयुक्त तसेच मजेदार ठरणार आहे.
तुम्ही सर्व जण Web 3.0 साठी उत्सुक आहात का ?
वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कंमेंटमध्ये कळवा. ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या अशाच उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.