Snack Making Business – नोकरीपेक्षा नाश्ता बनवण्याच्या व्यवसायात होते जास्त कमाई, जेवढी चांगली चव तेवढी मोठी होईल कमाई

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

तुम्हाला नोकरी करुन कंटाळा आला असेल किंवा नोकरी व्यतिरिक्त एखादा व्यवसाय करुन जास्त पैसे कमवायचे असतील तर स्नॅक म्हणजे नाश्ता बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला चांगले पैसे कमवून देईल. कारण हा व्यवसाय १२ ही महिने चालतो आणि संपूर्ण देशामध्ये याची खूप मोठी मागणी आहे.

या व्यवसायात तुम्ही बनवलेले स्नॅक जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. फक्त लोकांना तुमच्या नाश्ताची चव आवडली पाहिजे मग ते स्वतःहून तुमच्याकडे स्नॅक खरेदी करायला येतील.

या कारणामुळे आहे डिमांड

आज देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला चहा सोबत किंवा चहाच्या व्यतिरिक्त काही चमचमीत खायला पाहिजे असते. त्यामुळे बाजारात नमकीन पदार्थ म्हणजे स्नॅक मोठ्या प्रमाणात विकले जातात.

मार्केटमध्ये ब्रँडेड कंपन्यांचे वेगवेगळे प्रकारचे स्नॅक म्हणजे चमचमीत पदार्थ नाश्त्यामध्ये खाण्यासाठी उपलब्ध आहे. तरी देखील आपल्याला स्नॅकच्या प्रकारांमध्ये कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे तुम्ही स्वतः या स्नॅक बनवण्याच्या व्यवसायामध्ये उतरु शकता. जर तुम्ही लोकांना स्नॅकमध्ये गुणवत्ता आणि चांगली चव दिली तर तुमचा स्नॅकचा व्यवसाय वाढण्यास फार मदत होईल.

अशी करा सुरुवात

जर तुम्हाला स्नॅक बनवण्याच्या व्यवसायामध्ये उतरायचे असेल तर तुम्हाला काही मशीनची आवश्यकता असते. या सर्व मशीन तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईन खरेदी करु शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला शेव मेकिंग मशीन, फ्रायर मशीन, मिक्सिंग मशीन, पॅकेजिंग आणि वजन करण्याची मशीन इत्यादी मशीनची आवश्यकता असते.

तुम्ही स्नॅक तयार करुन मार्केटमध्ये सप्लाई करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी परवाने आणि परवानग्या घेणे आवश्यक आहे, ज्यात प्रामुख्याने अन्न परवाना, एमएसएमई नोंदणी आणि जीएसटी नोंदणी समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी जागेची देखील आवश्यकता असते.

व्यवसाय सुरु करण्यासाठी या गोष्टी असतील आवश्यक

स्नॅक बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला काही कच्या मालाची आवश्यकता असते. यामध्ये तुम्हाला बेसन, तेल, मैदा, मीठ, मसाले, शेंगदाणे, मसूर, मूग डाळ अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. हा सर्व कच्चा माल तुम्हाला बाजारामध्ये सहजरित्या मिळेल.

हा सर्व व्यवसाय तुम्ही २० हजार रुपये गुंतवून सुरु करु शकता. पण जर तुम्हाला मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर २ लाखामध्ये तुम्ही सुरुवात करु शकता.

हे पहा – या मशीन वर दररोज फक्त २ तास काम करुन तुम्ही महिन्याला ६० हजार रुपये सहज कमवू शकता

एवढी होईल कमाई

स्नॅक बनवण्याच्या व्यवसायात तुम्हाला २० ते ३० टक्के प्रॉफिट शिल्लक राहते. जसजसे तुमचे स्नॅक मोठ्या प्रमाणात विकले जातील तुमचा नफा देखील वाढत जाईल. या व्यवसायातून तुम्ही काही महिन्यांमध्येच १ ते २ लाख सहज कमवू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment