आपल्या मधील बरेच जण व्यवसाय करत आहेत. काही जण कपड्यांचा तर काही जण विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा असे विविध प्रकारचे व्यवसाय करत आहे. परंतु ऑफलाईन व्यवसाय करण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे देखील आहेत.
- मर्यादित मार्केट Area आपण कव्हर करु शकतो.
- जास्त लोकांपर्यंत आपण आपला व्यवसाय पोहोचवू शकत नाही.
- ऑफलाईन व्यवसाय असल्यामुळे जास्त पैसे कमवू शकत नाही.
- ऑफलाईन व्यवसाय किंवा दुकान चालू करण्यासाठी खूप भांडवल लागते.
अशा बऱ्याच समस्या आपल्याला येतात जर आपण ऑफलाईन व्यवसाय सुरु करणार असेल.
पण आज जर तुम्हाला स्वतःचे दुकान टाकायचे असेल तर वरील सर्व तोटे तुम्ही दूर करु शकता. इंटरनेटच्या काळात आज व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नाही.
आपण आज ऑनलाईन दुकान (स्टोअर) टाकून कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो. ऑनलाईन स्टोअरच्या मदतीने आपण केवळ भारतातच नाही तर बाहेरील देशात सुद्धा आपला माल विकू शकतो.
त्यामुळेच ऑनलाईन व्यवसाय करुन आपण जास्त लोकांना आपल्या वस्तू विकू शकतो. तसेच ऑफलाईन व्यवसायापेक्षा ऑनलाईन व्यवसायात आपण जास्त पैसे कमवू शकतो.
आज आम्ही तुम्हाला स्वतःचे ऑनलाईन स्टोअर कसे खोलायचे व त्याद्वारे पैसे कसे कमवायचे हे सांगणार आहे.
आपण ऑनलाईन स्टोअर खोलण्यासाठी तसेच वस्तू विकण्यासाठी Shopify चा वापर करणार आहोत. Shopify एक अशी वेबसाईट आहे जेथे तुम्ही स्वतःचे ऑनलाईन स्टोअर खोलू शकता. तसेच Amazon किंवा Flipkart सारखी ई-कॉमर्स साईट तयार करु शकता.
Shopify वर स्टोअर कसे बनवायचे व वस्तू विकून पैसे कसे कमवायचे हे आपण पाहणार आहोतच पण सुरुवातीला Shopify काय आहे या विषयी माहिती घेऊया.
Shopify काय आहे?
Shopify हे ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे जे कुणाला ही ऑनलाईन स्टोअर खोलून वस्तू विकण्यास परवानगी देते.
Shopify हे ड्रॉपशिपिंग बिझनेस मॉडेल वरती काम करते. ड्रॉपशिपिंग मध्ये आपण ऑनलाईन इतर कंपनीच्या वस्तू विकत असतो. पण ह्या वस्तू विकण्यासाठी आपल्याला त्या वस्तू स्वतः जवळ ठेवण्याची गरज नसते.
Shopify मध्ये देखील तुम्ही असेच करु शकता. तुम्ही ऑनलाईन स्टोअर खोलून इतरांचे प्रॉडक्ट किंवा वस्तु विकून देण्यास मदत करु शकता आणि त्याच्या बदल्यात कमिशन मिळवू शकता.
Shopify वर ऑनलाईन स्टोअर कसे बनवायचे?
आपण शॉपीफाय वर स्टोअर बनवण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. शॉपीफाय वर आपण इतर ई-कॉमर्स साईटचे प्रॉडक्ट विकणार आहोत. हे प्रॉडक्ट Import करण्यासाठी त्यांची माहिती दाखवण्यासाठी काही अँप्स आपण येथे शॉपीफाय वर Install करणार आहोत.
खाली दिलेले अँप्स हे आपल्याला ऑनलाईन स्टोर बनवण्यास त्यामध्ये प्रॉडक्ट लावण्यास मदत करतील.
1. Oberlo –
आपण ज्या ई-कॉमर्स साईट वरील प्रॉडक्ट विकणार आहोत तेथील प्रॉडक्ट आपल्या स्टोअर वर दाखवण्यासाठी ते Import करावे लागतील. हे प्रॉडक्ट Import करण्यासाठी आपल्याला Oberlo हे अँप मदत करेल.
2. AliExpress –
AliExpress वर तुम्हाला लाखो प्रॉडक्ट मिळतील जे तुम्ही तुमच्या स्टोअर वर लावण्यासाठी Import करु शकता.
3. Loox-Photo Reviews –
Amazon किंवा Flipkart सारख्या ई-कॉमर्स साईट वरुन जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा त्या वस्तूचे Review आपल्याला तेथे दिसतात. असे Review आपल्या स्टोअर वरील वस्तूंवर लावण्यासाठी Review Import करावे लागतील. हे Review Import करण्यासाठी Loox-Photo Review हे अँप मदत करेल.
ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला स्टोअर चालू करण्याअगोदर माहित असणे गरजेचे आहे.
Shopify वर स्वतःचे ऑनलाईन स्टोअर(दुकान) चालू करण्या अगोदर आपण शॉपीफायचे १४ दिवसांचे Free Trial घेऊ शकता. ह्या १४ दिवसांमध्ये तुम्ही स्वतःचे स्टोअर व्यवस्थित पणे सेटअप करु शकता.
ई-मेल ऍड्रेसच्या मदतीने आपण १४ दिवसांचे Free Trial सुरु करु शकता. जेव्हा आपण फ्री Trial सुरु कराल तेव्हा शॉपीफाय आपणास स्टोअरचे नाव टाकण्यास सांगेल.
सुरुवातीला तुमच्या स्टोअरचे नाव डिफॉल्ट URL राहील (उदा., storename.myshopify.com). तुम्ही हे नाव नंतर बदलू शकता. पण त्यासाठी तुम्हाला Custom domain खरेदी करावे लागेल (उदा., yourstorename.com). त्यामुळे स्टोअरचे नाव ठरवताना चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नाव नंतर बदलू शकता.
शॉपीफाय वर स्टोअर बनवून त्यामध्ये प्रॉडक्ट/वस्तू कशा add करायच्या हे आपण खालील स्टेपद्वारे पाहूया.
स्टेप १ : तुमचे अकाउंट Create झाल्यानंतर तुमच्या समोर Dashboard ओपन होईल.
स्टेप २ : आता तुम्हाला काही अँप्स इन्स्टॉल करायचे आहेत. जसे कि Oberlo, AliExpress, Loox-Photo Review या अँप विषयी माहिती आपण वर पाहिलेली आहे.
अँप्सच्या Option वर क्लिक करुन हे तीन अँप इन्स्टॉल करुन घ्या.
स्टेप ३ : या नंतर तुम्हाला AliExpress च्या साईट वर जाऊन हवे असलेले प्रॉडक्ट Import करावे लागतील.
स्टेप ४ : जे प्रॉडक्ट तुम्ही Import केले आहेत त्याचे Review आता Import करावे लागतील. यासाठी आपण Loox- Photo Review अँपची मदत घेणार आहोत.
स्टेप ५ : आता तुम्ही तुमच्या वस्तू ऑनलाईन विकण्यासाठी तयार आहात.
अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे ऑनलाईन स्टोअर तयार करु शकता.
हे पहा – या व्यवसायात सरकार देते २५ टक्के अनुदान, महिन्याला होईल २ लाख कमाई
Shopify द्वारे पैसे कसे कमवायचे?
1. Shopify Affiliate Program
आपण शॉपीफायचा Affiliate Program जॉईन करुन पैसे कमवू शकतो. यामध्ये आपल्याला शॉपीफायची Affiliate लिंक share करायची आहे.
जर तुमच्या Affiliate लिंकद्वारे नवीन व्यक्ती शॉपीफाय वर आल्यास तुम्ही पैसे कमवू शकता.
2. Shopify वर स्टोअर चालू करुन कमवू शकता
तुम्ही जे प्रॉडक्ट विकाल त्यावर तुम्हाला चांगले कमीशन मिळेल. जेवढे जास्त ग्राहक तुमच्या स्टोअर वरुन वस्तू विकत घेतील तेवढी जास्त तुमची कमाई होईल.
तुमच्या स्टोअर वर लोक खरेदी करण्यासाठी यावेत यासाठी तुम्हाला प्रॉडक्टची मार्केटिंग करावी लागेल. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा आधार घेऊ शकता. तसेच तुमच्या स्टोअर वेबसाईटचे SEO(Search Engine Optimization) देखील करु शकता.
जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर मेहनत देखील तेवढीच करावी लागेल. नुसते ऑनलाईन स्टोअर खोलून तुमची कमाई होणार नाही. वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक देखील शोधावे लागतील.
व्यवसायासाठी Shopify वापरण्याचे फायदे काय आहेत?
व्यवसायासाठी शॉपीफाय वापरण्याचे बरेच फायदे आहेत. हे फायदे तुम्ही कोणता व्यवसाय करत आहात यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला येथे शॉपीफायचे काही प्रमुख फायदे सांगतो.
1. Easy Setup
काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन आपण शॉपीफाय वर आपले ऑनलाईन स्टोअर तयार करु शकतो. ऑनलाईन स्टोअर बनवणे हे अगदी सोपे असल्यामुळे कोणी हि हे करु शकते. तसेच वस्तू विकण्यासाठी त्या वस्तू तुमच्या जवळ असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही इतरांच्या वस्तू स्वतःच्या स्टोअर वर विकू शकता.
2. Scalability
तुम्ही शॉपीफाय वरील विविध Business plan निवडून स्वतःचा व्यवसाय वाढवू शकता. वेगवेगळ्या प्लॅनमध्ये तुम्हाला विविध Features(सुविधा) मिळतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्लॅन select करुन व्यवसाय वाढवू शकता.
आज विविध मोठे व्यवसाय स्वतःचे स्टोअर बनवण्यासाठी किंवा ई-कॉमर्स वेबसाईट बनवण्यासाठी Shopify चा वापर करत आहेत.
3. Maintenance Free
शॉपीफाय हि Cloud Service असल्यामुळे याचा maintenance खर्च फार कमी आहे. तसेच तुमची वेबसाईट down झाल्यास याचा Uptime हा ९९.९९% आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास शॉपीफाय वर स्टोअर किंवा ई-कॉमर्स वेबसाईट बनवल्यास तुम्हाला वेगवान स्पीड मिळते.
हे काही प्रमुख फायदे आहेत Shopify वर ऑनलाईन स्टोअर खोलण्याचे जे तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत गरजेचे आहेत.
हे पहा – ही क्रीम बनवून होईल भरपूर कमाई, गावात किंवा शहरात राहून सुरु करा हा व्यवसाय
Shopify वर व्यवसाय चालू करण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी
शॉपीफाय वर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणार असाल त्या अगोदर खालील काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
1. Business idea
शॉपीफाय वर कोणत्या प्रकारच्या वस्तू विकाव्यात हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही इतर ई-कॉमर्स साईट बघून कल्पना घेऊ शकता. तसेच स्वतःची नवीन बिझनेस आयडिया तयार करु शकता.
2. Business plan
तुम्ही तुमच्या स्टोअर वर कोणत्या वस्तू विकणार आहात. त्या वस्तू विकण्यासाठी मार्केटिंग कशा प्रकारे करणार आहात. जो प्रॉडक्ट विकणार आहात तोच प्रॉडक्ट विकणारे मार्केटमध्ये तुमचे Competitor कोण आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असायला हवी.
3. Name
शॉपीफाय वर स्टोअर चालू केल्यानंतर तुम्हाला डिफॉल्ट URL मिळते. जसे कि storename.myshopify.com. तुम्हाला स्वतःच्या स्टोअरला नाव देण्यासाठी डोमेन name खरेदी करावे लागेल.
चांगले डोमेन नाव निवडण्यासाठी तुम्ही Lean Domain Search या वेबसाईटची मदत घेऊ शकता. तसेच तुम्ही निवडलेले डोमेन नाव किती सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी तुम्ही Namechk या वेबसाईट वर जाऊ शकता.
4. मार्केटिंग
तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये किती ही चांगल्या वस्तू लावल्या पण जर ते खरेदी करण्यासाठी लोक आलेच नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. लोक तुमच्या स्टोअर वर यावेत यासाठी तुम्हाला मार्केटिंग करावीच लागेल.
मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची किंवा SEO(search engine optimization) ची मदत घेऊ शकता.
Shopify च्या मदतीने आपण ऑनलाईन स्टोअर(दुकान) कसे खोलू शकतो हे पाहिले. तसेच स्टोअर खोलून पैसे कसे कमवायचे हे देखील पाहिले. आता तुम्हाला वरील माहिती वाचल्यानंतर स्वतःचे स्टोअर खोलण्यासाठी कोणतीही अडचण येईल असे मला वाटत नाही.
तरी देखील वरील माहिती विषयी काही समस्या असल्यास तुम्ही आम्हाला कंमेंटमध्ये विचारु शकता. आम्ही तुमची समस्या नक्की दूर करु.