७ सुरक्षा अँप जे मुलींच्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे

Women Security app

आपल्या देशात ज्या प्रमाणे पुरुष मंडळी कंपनीमध्ये जॉब करतात त्याच प्रमाणे स्त्रियांचे देखील जॉब करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज स्त्रिया स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे खर्च सांभाळत आहे. हि आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 
आज शहरांमध्ये जॉब करताना बऱ्याचशा कंपनीमध्ये रात्री उशीरा पर्यंत जॉब करावी लागते. काही ऑफिस वर्क करण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत थांबावे लागते. यामुळे रात्री घरी जाण्यासाठी उशीर होतो. अशा वेळेस स्त्रियांच्या मनामध्ये घरी एकटे जाण्याची भीती निर्माण होते. 
आज गुन्हेगारी वाढत चालली आहे. अशा वेळेस आपल्या सोबत काही चुकीचे झाले तर अशी काळजी उशीरा पर्यंत जॉब करणाऱ्या स्त्रियांच्या मनामध्ये असते. 
हीच काळजी आज मी तुमची दूर करणार आहे. मी तुम्हाला आज काही असे अँप्स सांगणार आहे जे तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. हे विविध प्रकारचे अँप्स तुमच्यासाठी विविध प्रकारची सुरक्षा प्रदान करण्याचे काम करतील. 
आता आपण हे सुरक्षा अँप कोणते आहेत व त्यांचे काम काय आहे हे समजून घेऊया. 

१. Life 360

Life 360 ह्या अँपच्या मदतीने आपण त्या व्यक्तीं सोबत कायम जोडले जाऊ शकतो ज्या व्यक्ती आपल्या संपर्क यादीत आहे. ह्या अँपमध्ये आपण Circle नावाने एक ग्रुप बनवू शकतो ज्यामध्ये आपली Real time लोकेशन ग्रुप मधील इतर व्यक्तींना दिसते. 
ज्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी जातो किंवा जेथे जायचे आहे तेथे न जाता दुसरीकडे जातो तेव्हा हे अँप आपल्या ग्रुप मधील लोकांना Alert मेसेज पाठवते. त्यामुळे आपल्याला स्वतःहून एखादा मेसेज पाठवण्याची गरज पडत नाही.
या अँपमध्ये Driver Care Support नावाची एक सुविधा आहे. ज्याच्या मदतीने आपण Live असलेल्या व्यक्तीसोबत बोलू शकतो. या अँपमध्ये काही सुविधा चालू करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. त्यामुळे अगोदर ठरवा कोणती सुविधा तुमच्यासाठी गरजेची आहे आणि मग ती खरेदी करा. 

२. Red Panic Button 

आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो जेथे आपण अगोदर कधी गेलो नाही त्या वेळेस आपण सावध राहणे गरजेचे आहे. 
Red panic button ह्या अँपमध्ये एक विजेट आहे जे आपल्या आवडत्या व्यक्तींना सांगते कि आपण कोठे आहोत. जेणे करुन ते आपल्याला शोधू शकतील. ह्या अँपचा वापर आपण व्यक्तिगत सुरक्षेसाठी तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी करु शकतो. 

३. Safety app for silent beacon 

हे एक उत्तम फ्री अँप आहे जे तुमचे Real time GPS लोकेशन सांगते. तुम्ही कोठे आहात हे सोप्या पद्धतीने तुम्ही इतरांना सांगू शकता. संकटाच्या वेळेस तातडीने तुम्ही कोठे आहात हे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना सांगू शकता. 
ह्या अँपची विशेषता म्हणजे हे अँप वापरण्यास सोपे आहे. यामुळे संकटाच्या वेळेस एखादी action घेण्यासाठी फार फायदेशीर सिद्ध होते. 

४. SOS Alert 

मला वाटते हे अँप प्रत्येकाच्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे. हे अँप सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले आहे. 
SOS Alert हे अँप आपल्याला व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे, मेसेज किंवा ई-मेलद्वारे इतर व्यक्तींना सूचित करण्यासाठी मदत करते. फोन हलवल्यानंतर आपण जो मेसेज रेकॉर्ड केला आहे तो इतर व्यक्तींना जातो. 
ज्यावेळी आपण संकटात असू त्या वेळेस आपल्याला फोनमधील अँप उघडून मेसेज टाईप करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त फोन हलवायचा (Shake करायचा) आहे आणि तुम्ही रेकॉर्ड केलेला मेसेज हा इतर व्यक्तींना जाईल. 
संकटाच्या वेळेस अशी चांगली सुविधा हे अँप आपल्याला देत असल्याने आपण हे अँप नक्की इन्स्टॉल केले पाहिजे. 

५. Bsafe 

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अँप खूप फायदेशीर आहे. यामध्ये आपण SOS बटन वर क्लिक केल्यानंतर व्हॉइस रेकॉर्ड करुन किंवा मेसेज टाईप करुन Emergency मेसेज पाठवू शकतो. 
ह्या अँपची सर्वात लोकप्रिय सुविधा म्हणजे यामध्ये तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करु शकता. तुम्ही जर अशा ठिकाणा वरुन जात असाल जेथे तुम्ही कधी गेला नसाल किंवा धोकादायक मार्गावरुन जात असाल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे इतरांसोबत जोडले जाऊ शकता. 
यामुळे तुम्हाला एकटे असण्याची भीती वाटणार नाही. रात्रीच्या वेळेस एकटे असताना हे अँप तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे. 

६. Shake2safety 

ह्या अँपच्या मदतीने तुम्ही फोन हलवून किंवा ४ वेळेस पॉवर बटन दाबून आपल्या लोकांना टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. 
तुमच्या फोनमध्ये इंटरनेट बंद असले तरी सुद्धा हे काम करते. रात्रीच्या वेळेस एकटे घरी जाताना हे अँप देखील फार फायदेशीर आहे. 

७. Ola / UBER 

हे कोणतेही सुरक्षा अँप नाही आहे पण बऱ्याचदा रात्री उशिरा घरी जाण्यासाठी रिक्षा मिळणे कठीण असते. अशा वेळेस घरी पटकन जाण्यासाठी तुम्ही ola किंवा uber कॅब सर्व्हीसची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्ही पटकन घरी जाल त्यासोबत तुमची भीती देखील गायब होईल. 
तुमच्यासाठी वरील पैकी जे अँप तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तुम्ही इन्स्टॉल करु शकता. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या मैत्रिणी सोबत देखील share करु शकता. 
आम्ही आपल्यासाठी अशीच उपयुक्त माहिती नेहमी आणत असतो हि माहिती तुमच्या पर्यंत पोहोचावी यासाठी बेल icon वर क्लिक करुन नोटिफिकेशन चालू करा. ह्या ब्लॉग विषयी तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये सांगू शकता. 

Leave a Comment