आज सर्व जण मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर करतात. काही जणांनी तर इंटरनेट वापरण्यासाठी नवीन फोन घेतले आहेत. काही लोक मोबाईल डेटा वापरुन तर काही लोक वायफाय वापरुन इंटरनेटचा वापर करत असतात.
इंटरनेटच्या मदतीने आपण व्हाट्सअँप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईट्सचा तसेच एखादी माहिती मिळवायची असल्यास इंटरनेटचा वापर केला जातो. व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युबचा वापर केला जातो. पण जेव्हा आपण इंटरनेट वापरत नसतो तेव्हा मोबाईल डेटा बंद करुन ठेवतो.
मोबाईल डेटा कायम चालू ठेवण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
मी आज तुम्हाला मोबाईल डेटा कायम चालू ठेवण्याचे फायदे काय आहेत या विषयी माहिती सांगणार आहे. मोबाईल डेटा कायम चालू ठेवण्याचे फायदे जर तुमच्यासाठी उपयोगी असतील तर तुम्ही कायम डेटा चालू ठेऊ शकता.
मोबाईल डेटा कायम चालू ठेवण्याचे फायदे काय आहेत हे आपण आता पाहूया.
मोबाईल डेटा कायम चालू ठेवण्याचे फायदे
१. फोन लोकेशन ऑन राहते
जर तुमचे नेट चालू असेल तर तुमचा फोन कोठेही हरवला तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण नेट चालू असल्यामुळे तुमच्या फोनचे लोकेशन चालू राहते. यामुळे जर तुमचा फोन हरवला तर तुम्ही तो सहज शोधू शकता.
या सोबतच तुम्ही गूगलवर “track my phone” सर्च करुन स्वतःचा फोन शोधू शकता.
२. अपडेटेड माहिती मिळते
मोबाईल डेटा कायम चालू राहिल्यामुळे तुम्हाला विविध माहितीशी निगडित Notification येत राहतात. व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम वर ज्यांच्याशी तुम्ही कनेक्ट आहात त्यांनी जर काही पोस्ट केले तर तुम्हाला लगेच मेसेज मिळतो.
या सोबतच तुम्हाला विविध बातम्यांविषयी अपडेटेड माहिती मिळते. मोबाईल डेटा चालू ठेवण्याचा हा देखील एक मोठा फायदा आहे.
३. वेब कॉलिंग
बऱ्याचदा आपण अशा ठिकाणी जातो जेथे फोनचे नेटवर्क नसते. अशा वेळेस आपण कुणालाही कॉल करु शकत नाही. पण जर तुमचे नेट चालू असेल तर अशा वेळेस तुम्ही इतरांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे कॉल करु शकता.
जर तुम्ही कुणाचे वायफाय वापरत असाल तरीसुद्धा तुम्ही Wifi Calling च्या मदतीने एखाद्या व्यक्तीला कॉल करु शकता. सामान्य कॉल करण्याच्या पद्धतीद्वारे हे करणे शक्य नसते.
४. True Caller सुरु राहते
आपल्याला दिवसभरात खूप कॉल येत असतात. त्यातील काही कॉल आपल्या ओळखीचे असतात तर काही Unknown कॉल असतात. काही जणांना प्रश्न पडतो असे Unknown कॉल उचलावे कि नाही.
पण जर तुमच्या फोनमध्ये True Caller अँप असेल आणि तुमचे नेट चालू असेल तर कोणताही Unknown कॉल आला तरी True caller तुम्हाला तो नंबर कुणाचा आहे हे सांगेल. यामुळे तुम्हाला कळेल कोणता कॉल उचलायचा आणि कोणता नाही.
तसेच Spam कॉल पासून सुद्धा तुम्ही सावध रहाल.
मोबाईल डेटा कायम चालू ठेवण्याचे तोटे
ज्या प्रकारे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात त्याच प्रकारे त्याचे तोटे देखील असतात. मोबाईल डेटा नेहमी चालू ठेवण्याचा एक तोटा देखील आहे तो म्हणजे Battery low होणे.
जेव्हा आपण मोबाईल डेटा वापरत असतो तेव्हा फोन चांगले नेटवर्क मिळण्यासाठी signal boost करतो व हे सिग्नल boost करण्यासाठी बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे बॅटरी पटकन संपते.
त्यामुळे बरेच जण नेट वापरत नसताना मोबाईल डेटा ऑफ करुन ठेवतात.
जर तुम्हाला कायम अपडेटेड माहिती, मेसेज हवे असतील तर तुम्ही मोबाईल डेटा सुरु ठेऊ शकता. पण जर तुम्हाला थोड्या वेळासाठीच नेट वापरायचे असेल तर तुम्ही मोबाईल डेटा ऑफ करुन ठेवला तरी चालेल.
निष्कर्ष –
मी तुम्हाला आज सांगितलेली माहिती कशी वाटली. तसेच तुम्हाला वरील माहितीशी निगडित काही समस्या असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता.