आज आपल्या मधील बरेच जण इंटरनेट जरी वापरत असले तरी बहुतेक जणांना IP Address meaning in marathi आज देखील माहित नाही.
IP Address या नावा वरुनच कळते कि हा एक प्रकारचा Address/पत्ता आहे. IP Address च्या मदतीने आपल्याला इतर डिव्हाईस सोबत जोडण्यासाठी तसेच संपर्क करण्यासाठी मदत होते.
आपण वापरत असलेल्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये जो IP Address दिलेला असतो त्याचा काय वापर आहे. इंटरनेटच्या जाळ्यात IP Addressचे काय महत्व आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
आईपी ऍड्रेस (IP Address meaning in marathi) विषयी सगळ्यांना माहित असणे गरजेचे आहे असे नाही. पण एक टेक लव्हर म्हणून तुम्ही या विषयी माहिती घेऊ शकता.
IP म्हणजे काय?।What is mean by IP in Marathi?
IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. IP Address ला Internet Protocol Address असे म्हणतात. IP Address ला काही जण IP नंबर या नावाने देखील ओळखतात.
IP Address काय आहे?
IP Address मध्ये विविध प्रकारचे नंबर असतात. जे एका डिव्हाईसला दुसऱ्या डिव्हाईसशी जोडण्यासाठी मदत करतात तसेच संपर्क करण्यासाठी देखील हे फार उपयुक्त आहे.
IP Address मध्ये विशिष्ट प्रकारचे नंबर असतात जे त्या डिव्हाईसला शोधण्यासाठी मदत करतात.
आपला फोन हरवल्यास IP ऍड्रेसच्या मदतीने आपल्याला तो सहज शोधता येतो.
IP Address का वापरला जातो ?
आपल्याकडे असणाऱ्या डिव्हाईसचा IP Address हा त्या डिव्हाईसचा मूळ पत्ता असतो. इंटरनेटचा वापर करणारे अनेक लोक आहेत त्यामधील तुमचा फोन किंवा डिव्हाईस ओळखण्यासाठी IP Address ची मदत होते.
ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन एखादी वस्तू ऑर्डर करता त्या वेळेस ती वस्तू तुमच्या पर्यंत येण्यासाठी तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता टाकता. इंटरनेटचा वापर करताना तुमचा ऑनलाईन पत्ता म्हणजेच IP Address असतो.
तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना जो मेसेज पाठवता किंवा मिळवता हे सगळे आईपी ऍड्रेसच्या मदतीने शक्य होते. तुम्ही इंटरनेट वर ज्या वेबसाईट वर जाता किंवा युट्युबचा वापर करता या प्रत्येकाचा एक ठराविक आईपी ऍड्रेस असतो.
आईपी ऍड्रेस शिवाय आपल्या फोन किंवा लॅपटॉपला आपण इंटरनेट वर काय शोधत आहे व का शोधत आहे हे समजणार नाही. त्यामुळे आईपी ऍड्रेस असणे फार गरजेचे आहे.
IP Address चे प्रकार
इंटरनेट वर विविध कामासाठी वेगवेगळे प्रकारचे आईपी ऍड्रेस वापरले जाते. आईपी ऍड्रेसचे प्रामख्याने खालील चार प्रकार पडतात.
- Private IP Address
- Public IP Address
- Static IP Address
- Dynamic IP Address
हे आईपी ऍड्रेस का आणि केव्हा वापरले जातात या विषयी सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.
Private IP Address
Private IP Address चा उपयोग आपल्या Private नेटवर्कशी Communicate करण्यासाठी केला जातो. आपल्या घरात असणारी विविध उपकरणे म्हणजेच स्मार्ट टीव्ही, होम थिएटर, लॅपटॉप यांच्याशी संवाद (Communicate) करण्यासाठी या आईपी ऍड्रेसचा वापर केला जातो.
प्रायव्हेट आईपी ऍड्रेस तुम्हाला तुमच्या डिव्हाईसच्या सेटिंगमध्ये मिळेल.
Public IP Address
Public IP Address चा उपयोग इंटरनेटचा वापर करण्यासाठी होतो. इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तसेच माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी या आईपी ऍड्रेसचा उपयोग होतो.
आपण इंटरनेटच्या साहाय्याने ज्या वेबसाईट वर जातो किंवा व्हिडिओ पाहतो तेथे पब्लिक आईपी ऍड्रेसचा उपयोग केला जातो.
Static IP Address
हा अशा प्रकारचा आईपी ऍड्रेस आहे जो कधी हि बदलत नाही. स्टॅटिक आईपी ऍड्रेसचा उपयोग सर्वरसाठी किंवा इतर महत्वाच्या उपकरणांसाठी केला जातो.
Dynamic IP Address
एक असा आईपी ऍड्रेस ज्याची निवड Dynamic host configuration protocol (DHCP) द्वारे केली जाते त्याला Dynamic IP Address म्हणतात.
IP Address Version कोणते आहेत ?
आईपी ऍड्रेसचे सध्या दोन प्रकारचे version आहेत. इंटरनेट वरील सर्व आईपी ऍड्रेस हे या दोन पैकी एका Version चा वापर करत असतात.
- IPV4
- IPV6
IPV4
IPV4 चे पहिले Version १९८३ मध्ये तयार करण्यात आले होते. आज हे Version सर्वात जास्त वापरले जाते. अड्रेसिंग सिस्टिम वापरुन नेटवर्क वरील डिव्हाईस ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो.
IPV4 ला प्राथमिक इंटरनेट प्रोटोकॉल मानले जाते आणि इंटरनेट वरील ९४ टक्के ट्रॅफिक/रहदारी वाहून नेते.
IPV6
IPV6 ला IPng (Internet Protocol Next Generation) असे देखील म्हणतात. IPV6 हा IPV4 चा Successor म्हणून देखील ओळखला जातो.
इंटरनेट इंजिनिअर टास्कफोर्सने १९९४ मध्ये ह्याची सुरुवात केली. अधिक इंटरनेट आईपी ऍड्रेसची गरज पूर्ण करण्यासाठी हे नवीन आईपी Version तयार करण्यात आले. तसेच IPV4 मध्ये असणाऱ्या कमी पूर्ण करण्यासाठी हे नवीन Version तयार करण्यात आले आहे.
आपला IP Address कसा पहायचा ?
तुम्हाला जर तुमचा आईपी address माहित करुन घ्यायचा असेल तर ब्राऊझरमध्ये My IP Address असे सर्च करा.
जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा आईपी ऍड्रेस माहित करुन घ्यायचा असेल तर त्यासाठी Setting > About Device > Status मध्ये गेल्यानंतर मोबाईलचा आईपी ऍड्रेस तुम्हाला दिसेल.
अशा सोप्या स्टेपद्वारे तुम्ही तुमचा इंटरनेट व मोबाईल वरील आईपी ऍड्रेस माहित करुन घेऊ शकता.
IP Address सुरक्षित कसा करायचा ?
आईपी ऍड्रेसच्या मदतीने हॅकर तुमचे डिव्हाईस हॅक करुन सर्व डेटा चोरुन त्याचा गैरवापर करु शकतो. तसेच आईपी ऍड्रेसच्या मदतीने तुम्ही फोनमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी करत आहात हे देखील ते पाहू शकतात.
इंटरनेटचा वापर करताना तुमच्या सोबत कोणता ही गैरप्रकार होऊ नये यासाठी आईपी ऍड्रेस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
आईपी ऍड्रेस सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतींचा वापर करु शकता.
१. VPN चा वापर करा
VPN हे तुमच्या व इंटरनेटच्या मध्यस्थ असते. व्हीपीनं हा एक सर्वर असतो जो तुमचे इंटरनेटशी असलेले कनेक्शन एनक्रिप्ट करतो व आपला आईपी ऍड्रेस लपवतो.
व्हीपीनं तुमची इंटरनेट वरील रहदारी तसेच अँप्समध्ये तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या आहे ते सर्व हॅकर पासून सुरक्षित ठेवते.
VPN तुमचा आईपी ऍड्रेस कसा लपवते ?
जेव्हा तुम्ही व्हीपीनं वापरता तेव्हा तुम्ही इंटरनेट वर किंवा अँप्समध्ये जे काही करता ते सर्व व्हीपीनं सर्वरच्या मार्फत केले जाते. जेव्हा तुम्ही व्हीपीनं चालू करता तेव्हा तुम्हाला एक खोटा आईपी ऍड्रेस दिला जातो. त्यामुळे तुम्ही इंटरनेट वर जे काही करत आहात हे कुणालाच कळत नाही.
तुमचा खरा आईपी ऍड्रेस हा तुमच्या व्यतिरिक्त फक्त व्हीपीनं पुरवणाऱ्या कंपनीलाच माहीत असतो. त्यामुळे हॅकर पासून तुमच्या डेटाचे संरक्षण होण्यासाठी मदत होते.
२. Phishing ई-मेल आणि मेसेज पासून सुरक्षित रहा
फिशिंगच्या मदतीने तुम्हाला बनावटी ई-मेल किंवा मेसेज पाठवले जातात जे एकदम खरे वाटतात. अशा खोट्या ई-मेल व मेसेज पाठवण्याचा उद्देश तुमचा आईपी ऍड्रेस माहित करुन घेणे असतो.
Phishing Attack पासून वाचण्यासाठी तुम्हाला फिशिंग विषयी माहित असणे गरजेचे आहे.
फिशिंग Attack पासून सुरक्षित कसे रहायचे ?
फिशिंग अटॅक पासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
- अनोळखी वेबसाईट वर ई-मेल आयडी व पासवर्ड टाकू नका
- स्पॅम मेल किंवा मेसेज ओपन करु नका तसेच त्यामधील लिंक वर क्लिक करु नका
- अकाऊंटमध्ये लॉगिन करताना URL कडे लक्ष द्या
- वेबसाईटच्या URL मध्ये https आहे का नाही हे पहा
वरील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही फिशिंग अटॅक पासून वाचू शकता तसेच तुमचा आईपी ऍड्रेस देखील सुरक्षित राहू शकतो.
३. सुरक्षित अँप्सचा वापर करा
फोन मधील सुविधा वाढवण्यासाठी बऱ्याचदा आपण Third party वेबसाईट वरुन विविध अँप्स डाउनलोड करतो. पण हे अँप्स जास्त सुरक्षित नसतात.
Third पार्टी अँप्सच्या मदतीने आपला आईपी ऍड्रेस माहित करुन घेणे हॅकरसाठी फार सोपे असते. त्यामुळे शक्यतो थर्ड पार्टी वेबसाईट वरुन अँप्स डाउनलोड करु नका.
अँप्स डाउनलोड करण्यासाठी Play Store चा वापर करा. प्ले स्टोअर वरील अँप हे जास्त सुरक्षित असतात.
निष्कर्ष :
तुम्हाला जर तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर आईपी ऍड्रेस सुरक्षित ठेवणे फार गरजेचे आहे. इंटरनेट वर तुम्ही काय करत आहात हे सगळ्यांपासून लपवून ठेवण्यासाठी आईपी ऍड्रेस लपवणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.
मी तुम्हाला वरील माहितीमध्ये आईपी ऍड्रेस IP Address meaning in marathi विषयी संपूर्ण माहिती सांगितली आहे. तसेच आईपी ऍड्रेस कसा सुरक्षित करायचा या विषयी देखील सांगितले आहे.
मी तुम्हाला दिलेली माहिती आवडली असल्यास कृपया मला कंमेंटमध्ये कळवा.
ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.
जेणे करुन मी जेव्हा नवीन माहिती पब्लिश करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.