हि सोपी ट्रिक वापरुन इंस्टाग्राम वर Followers आणि Likes वाढवा

instagram-var-followers-kase-vadhvayche

आज इंस्टाग्राम फेसबुक पेक्षा देखील सर्वात मोठे सोशल मीडिया माध्यम बनले आहे. जगभरातले सर्व सेलिब्रिटी आज इंस्टाग्राम वर आहेत. त्यामुळे एकमेकांमध्ये Followers आणि Likes वाढवण्याची जणू स्पर्धाच चालू झाली आहे.

प्रत्येक जण आपल्या मित्रांपेक्षा किंवा मैत्रिणीपेक्षा स्वतःचे Follower कसे वाढतील. माझ्या फोटो वर जास्त Likes कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. 
पण Followers आणि Likes वाढवण्याच्या नादात ते काही सामान्य चुका करतात. 
 • Image/Photo ची Quality खराब करणे
 • जास्त Hashtag वापरणे 
 • Caption चा योग्य वापर न करणे
 • Bio बरोबर न लिहणे 
 • रेगुलर पोस्टिंग न करणे 
या सारख्या किरकोळ चुका ते करतात. त्यामुळे किती हि प्रयत्न केले तरी सुद्धा त्यांचे Followers किंवा Likes वाढत नाही.
मी आज तुम्हाला येथे तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर Followers आणि Likes कसे वाढवायचे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. या माहितीचा वापर करुन तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटची रिच व Followers आणि Likes वाढवू शकता. 
चला तर पाहूया इंस्टाग्राम वर Followers आणि Likes वाढवण्याचे सीक्रेट.

इंस्टाग्राम Bio नीट लिहा 

इंस्टाग्राम Bio मध्ये तुमच्या विषयी बरेच काही माहीती होते. लोक तुमच्या इंस्टाग्राम Bio ला मोठ्या प्रमाणात Visit करतात. त्यामुळे आपले इंस्टाग्राम bio बरोबर दिसणे गरजेचे आहे. 
इंस्टाग्राम Bio चांगल्या प्रकारे लिहण्यासाठी तुम्ही खालील ट्रिक वापरु शकता.
 • तुमच्या विषयी माहिती लिहा – तुम्ही Student आहात कि जॉब करत आहे तसेच तुमच्या Education background विषयी देखील लिहू शकता.
 • तुमची आवड सांगा – तुमची आवड Followers ला तुम्हाला समजण्यास मदत करते. तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात त्या विषयी थोडक्यात तुम्ही येथे सांगू शकता. (उदा., पुस्तक वाचणे, मनोरंजन, प्रवास..)
 • Contact Information द्या – तुमच्या Followers ना किंवा इतर व्यक्तींना तुमच्याशी संपर्क करायचा असल्यास ते कसे करणार. त्यासाठी तुम्ही ई-मेल ID किंवा मोबाईल नंबर देऊ शकता.
 • Call to action द्या – जर तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा तुम्ही Influencer असाल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक bio मध्ये देऊ शकता. यामुळे लोकांना तुमच्या विषयी किंवा तुमच्या कामाविषयी अधिक माहिती मिळेल. 

High Quality फोटोचा वापर करा 

इंस्टाग्राम वर दररोज मिलियनमध्ये फोटो पोस्ट केले जातात. अशा वेळेस जेव्हा तुम्ही तुमचे फोटो पोस्ट करता तेव्हा तुम्ही इतरांसोबत स्पर्धा करत असता. अशा स्पर्धेत जर तुमचा फोटो हा ब्लर दिसत असेल किंवा त्याची Quality चांगली नसेल. अशा वेळेस लोक तुमचे फोटो Like करणे दूर तो फोटो पाहणार देखील नाही. 
जर लोक तुमचे फोटो पाहून थांबत नसतील त्यावर लाईक किंवा कंमेंट करत नसतील तर इंस्टाग्रामचे अल्गोरिथम तुमचे फोटो किंवा Images जास्त लोकांना दाखवणार नाही. त्यामुळे High quality फोटो वापरणे गरजेचे आहे. 
आजच्या स्मार्ट फोनमध्ये आपल्याला ४८ ते ६४ मेगा पिक्सेलचे कॅमेरा मिळतात. त्यामुळे फोटो काढण्यासाठी आपल्याकडे DSLR कॅमेरा असण्याची गरज नाही. स्मार्ट फोनद्वारे देखील आपण छान फोटो काढू शकतो. 
स्मार्ट फोनद्वारे फोटो काढताना काही महत्वाच्या गोष्टी 
 1. नेहमी HDR मोडमध्ये फोटो काढा.
 2. फोटो काढताना फोन स्टेबल ठेवा.
 3. कॅमेरामध्ये AI(Artificial Intelligence) असल्यास त्याचा वापर करा.(AI मुळे colors चांगले येतात)
 4. योग्य तेथे Potrait मोडचा वापर करा. 

योग्य Hashtag वापरा 

बरेच जण सर्वात मोठी चूक येथेच करतात. ते आपल्या फोटोवर नको असलेले तसेच जास्त प्रमाणात हॅशटॅग वापरतात. 
हॅशटॅग हे फोटो कशाशी संभंधित आहे हे दर्शवते. त्यामुळे आपण एखाद्या फोटो वर हॅशटॅग लावताना त्या फोटो किंवा Image शी निगडित हॅशटॅग लावणे गरजेचे आहे. चांगले हॅशटॅग शोधण्यासाठी तुम्ही हॅशटॅग generator अँपचा किंवा वेबसाईटचा वापर करु शकता. 
इंस्टाग्राम आपल्याला एका फोटो वर ३० हॅशटॅग वापरण्याची परवानगी देतो. पण आपल्याला कधी सुद्धा एवढे हॅशटॅग वापरायचे नाही. आपण एका फोटो वर ११ किंवा मग त्यापेक्षा कमी हॅशटॅग वापरलेले चांगले राहील. 

Reels बनवा 

इंस्टाग्राम वर रील्स बनवून तुम्ही स्वतःचे Followers झटपट वाढवू शकता. आज लोक शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी जास्त उत्सुक असतात. तुम्ही त्यांच्या या उत्सुकतेचा फायदा स्वतःचे Followers वाढवण्यासाठी करुन घेऊ शकता. 
तुम्ही हव्या त्या टॉपिक वर रील्स बनवू शकता. इंस्टाग्राम आपल्याला १५ सेकंदाची रील्स बनवण्यासाठी परवानगी देते. तुम्ही १५ सेकंदामध्ये काय चांगले बनवू शकता ते पहा. इंस्टाग्राम वर खालील Categorie चे रील्स जास्त प्रसिद्ध होतात. 
 1. Comedy reels
 2. Motivational reels
 3. Informative reels
 4. Beauty reels
 5. Fitness reels
 6. Tips & Trick reels

Caption चा योग्य वापर करा 

तुमच्या फोटो विषयी माहिती किंवा तो फोटो काय सांगतो हे तुमच्या Caption द्वारे कळते. Caption हा देखील तुमचा फोटोला व्यक्त करण्याचा एक चांगला भाग आहे.
तुम्हाला Caption च्या सुरुवातीच्या दोन तीन line मध्ये असे काही तरी लिहायचे आहे, जेणे करुन लोक तुमचे संपूर्ण Caption वाचतील. कारण इंस्टाग्राम Caption च्या केवळ सुरुवातीच्या दोन-तीन line च दाखवत असतो. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला अगोदर सांगायची आहे. Caption वापरुन झाल्यानंतर मग हॅशटॅग वापरा. 
इंस्टाग्राम आपल्याला Caption मध्ये २२०० character वापरण्याची परवानगी देते. एवढ्या शब्दांमध्ये आपण सहज एखादी गोष्ट समजून देऊ शकतो. पण तुम्हाला केवळ १३० ते १५० character मधेच Caption पूर्ण करायचा आहे. 
तसेच Caption वाचताना लोक कंटाळू नये म्हणून तुम्ही Caption मध्ये Emoji चा देखील वापर करु शकता. 

Related लोकांना टॅग करा 

जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम वर एखाद्या व्यक्तीला टॅग करत असता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या कामाचे Credit देत असता. असे करणे चांगली गोष्ट आहे. तसेच तुम्ही तुमच्या Followers ना टॅग केलेल्या व्यक्तीचे फोटो पाहण्यास तसेच त्याला Follow करण्यास सांगत असता. 
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला टॅग करता तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला स्वतःच्या पोस्टमध्ये mention करण्याची शक्यता असते असे केल्याने त्यांचे Followers तुमचे Followers देखील बनू शकतात. 
तुम्ही इतरांना फोटोद्वारे किंवा कंमेंटमध्ये replay देताना देखील टॅगचा वापर करु शकता. 

Followers सोबत बोला 

तुमचे Followers जेव्हा तुमच्या फोटो वर किंवा रील्स वर कंमेंट करतील तेव्हा त्यांना Replay देत चला. एखाद्या Follower ने Useful comment केल्यास किंवा माहिती दिल्यास ती तुम्ही story ला ठेऊन त्या विषयी आपले मत व्यक्त करु शकता.
जर तुम्ही Followers ना फ्री मध्ये तुमच्या कडून काही देऊ शकले जे त्यांच्या फायद्याचे आहे तर खूप चांगले होईल. यामुळे तुमचे Followers इतरांना देखील तुम्हाला फॉलो करण्यासाठी Recommend करतील. अशा विविध ट्रिक वापरुन तुम्ही त्यांच्या सोबत जास्त जवळ राहू शकता. 
Followers ला तुम्ही फ्री मध्ये एखादी फ्री ईबुक किंवा त्यांना आवश्यक असलेली महत्वाची माहिती फ्री मध्ये सांगू शकता. यासाठी तुम्ही इंस्टाग्राम वर Live येऊन तुमच्या Followers च्या प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी जाणून घेऊ शकता. 

योग्य वेळेला पोस्ट करा 

तुम्ही चांगले फोटो किंवा रील्स त्यावेळी अपलोड करत असाल जेव्हा लोक ऑनलाईन नसतात तर तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. स्वतःचे Followers आणि Likes वाढवण्यासाठी लोक कोणत्या वेळेस जास्त ऑनलाईन असतात हे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे. 
आपण विविध वारानुसार विविध वेळेस पोस्ट केले पाहिजे. 
 • सोमवार – सकाळी ११ ते दुपारी २
 • मंगळवार – सकाळी १० ते दुपारी ३
 • बुधवार – सकाळी ७ ते दुपारी ४
 • गुरुवार – सकाळी १० ते दुपारी २
 • शुक्रवार – सकाळी ९ ते दुपारी २
 • शनिवार – सकाळी ९ ते दुपारी ११
 • रविवार – सकाळी ८ ते दुपारी २
तुम्ही पोस्ट करण्यासाठी वरील टाईम टेबलं फॉलो करु शकता. योग्य वेळेस पोस्ट केल्याने तुमच्या कन्टेन्ट वर Likes मिळण्यास तसेच तुमचे Followers वाढण्यासाठी मदत होईल. 

निष्कर्ष –

वरील माहितीच्या आधारे आपण आपले Followers आणि Likes वाढवू शकतो. तसेच तुमची एक मोठी Community बनण्यास देखील मदत होईल. 
इंस्टाग्राम वर Followers आणि Likes वाढवण्याच्या ह्या ट्रिकचा वापर करुन तुम्ही तुमच्या मित्रांपेक्षा किंवा मैत्रिणींपेक्षा जास्त Followers वाढवू शकता. 

1 thought on “हि सोपी ट्रिक वापरुन इंस्टाग्राम वर Followers आणि Likes वाढवा”

Leave a Comment