Captcha भरण्याचे काम करुन महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमवा

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now
how-to-make-money-by-solving-captcha-in-marathi

Captcha भरुन पैसे कमवणे हा ऑनलाईन पैसे कमवण्याचा सर्वात सोपा व चांगला मार्ग आहे. ऑनलाईन काम करुन पैसे कमवण्याचे अनेक पर्याय आहेत त्यातील हा एक पर्याय ज्या विषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे.

आपण सर्व जण इंटरनेटचा वापर करता अशा वेळेस आपण कधी का होईना कॅपचा भरला असेल. तुम्ही ज्या प्रकारे इतर ठिकाणी कॅपचा भरता तसेच तुम्हाला इथे देखील करायचे आहे.
हे काम मी वरती सांगितल्या प्रमाणे फार सोपे आहे. तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा महिला असाल दररोज ३ ते ४ तास काम करुन तुम्ही येथून १०-१५ हजार सहज कमवू शकता.
तुम्हाला जर Captcha म्हणजे काय माहीत नसेल तर मी थोडक्यात सांगतो.
कॅपचा हे एक असे टूल आहे जे इंटरनेट वापरणारा माणूस आहे कि बॉट हे समजण्यास मदत करते.
तुम्हाला जर कॅपचा कोड का वापरला जातो किंवा त्या विषयी अधिक माहिती हवी असल्यास वरती निळ्या रंगात दिसणाऱ्या Captcha शब्दावर क्लिक करुन माहिती घेऊ शकता.

Captcha भरुन पैसे कसे कमवायचे ?

कॅपचाद्वारे तुम्ही महिन्याच्या शेवटी चांगले पैसे कमवू शकता. जे विद्यार्थी आहेत ते आपला थोडा फार खर्च हे काम करुन भागवू शकतात. तसेच महिलांसाठी देखील घरबसल्या पैसे कमवण्याची हि एक चांगली संधी आहे.
तुम्हाला विविध शब्द वाकड्या-तिकड्या स्वरुपात दिले जातील किंवा मग चित्र (फोटो) दिले जातील ते तुम्हाला Select करुन Submit करायचे आहेत.
दिवसाचे २ ते ४ तास काम करुन आपण येथून १०-१५ हजार कमवू शकतो किंवा या पेक्षा थोडे जास्त देखील कमवू शकतो. पण हे काम करण्यासाठी आपण किती वेळ व पटकन काम करतो हे देखील गरजेचे आहे.
कॅपचा भरुन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला फक्त Sign up करायचे आहे. या नंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल जेथे तुम्ही कॅपचा भरण्याचे काम सुरु करु शकता.
तुम्हाला फोटो मधील अक्षरे ओळखुन टाईप करायची आहेत. मग सबमिट करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला कॅपचा सोडवत जायचे आहे.
कॅपचा काम देणाऱ्या सर्व वेबसाईट वर तुम्ही फ्री मध्ये Sign up करुन काम सुरु करु शकता. जर तुम्हाला एखादी वेबसाईट Sign up साठी पैसे मागत असेल तर तुम्ही कॅपचा कामासाठी दुसरी वेबसाईट पहा.
मी तुम्हाला कॅपचा काम पुरवणाऱ्या विविध वेबसाईट विषयी माहिती सांगणार आहे. तुम्ही हवे असल्यास दोन किंवा तीन वेबसाईट वर देखील काम करु शकता.

Captcha काम देणाऱ्या वेबसाईट कोणत्या आहेत ?

मी तुम्हाला येथे काही वेबसाईटची नावे सांगतो ज्या प्रामख्याने कॅपचा काम देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे वेबसाईटचे नाव तुम्ही गुगल वर टाकल्यानंतर तुमच्या समोर ती वेबसाईट येईल.

Kolotibablo

Kolotibablo हे आंतरराष्ट्रीय कॅपचा एन्ट्री काम पुरवणाऱ्यां पैकी एक आहे. येथे तुम्हाला १००० कॅपचा व्यवस्थित पणे भरल्यास ०.३५ ते १ डॉलर इतके पैसे मिळतात. इथे बरेच जण महिन्याचे १०० ते २०० डॉलर कमवत आहे.
Kolotibablo खूप स्ट्रिक्ट (कडक) आहेत. तुम्ही जर वारंवार चुका करत राहिलात तर ते तुमचे अकाऊंट बंद देखील करु शकतील. हे तुम्हाला Payza किंवा Webmoney द्वारे पैसे देतात.

MegaTypers

MegaTypers हि जगातील कॅपचा काम देणारी चांगली वेबसाईट आहे. येथे तुम्ही फ्री मध्ये जॉईन करु शकता.
ज्या लोकांना कॅपचा काम करण्याचा अनुभव आहे ते लोक १०० ते २५० डॉलर (६००० ते १५००० रु) महिन्याला कमवत आहे. ह्या कामात नवीन असणाऱ्या व्यक्तींना १००० कॅपचा भरण्याचे ०.४५ डॉलर मिळतात. तर अनुभव असणाऱ्या व्यक्तींना १००० कॅपचा भरण्याचे १.५ डॉलर मिळतात.
MegaTypers तुम्हाला डेबिट कार्ड, चेक, Paypal, Webmoney, Perfect money, Payza आणि western union इत्यादींद्वारे Payment करतात.
MegaTypers सोबत जॉईन होण्यासाठी येथे invitation कोडची गरज पडते. Invitation कोडसाठी तुम्ही गुगल वर सर्च करु शकता.

Protypers

Protypers हे हुबेहूब MegaTypers प्रमाणेच आहे. MegaTypers विषयी जी माहिती इथे सांगितली तीच इथे देखील लागू होते.
Protypers च्या मदतीने तुम्ही ०.४५ ते १.५ डॉलर १००० कॅपचा भरल्यानंतर कमवू शकता. तुम्ही तुमचे Payment हे Paypal, Payza, western union द्वारे स्वीकारु शकता.

FastTypers

हि एक अशी वेबसाईट आहे जी त्यांच्या कामगारांच्या फायद्याचा विचार करते. इथे तुम्हाला १००० कॅपचा भरण्याचे १.५ डॉलर मिळतात. कॅपचा भरण्याचे rate रात्रीच्या वेळेस जास्त असतात. खास करुन रात्री १२ ते ५ वाजेपर्यंत

2Captcha

2Captcha मध्ये आपल्याला पैसे कमवण्याचे विविध मार्ग मिळतात. इथे तुम्हाला १००० कॅपचा भरल्यानंतर १ डॉलर मिळतात पण त्या सोबत जर तुम्ही पूर्ण झालेले कॅपचा सोडवले तर बोनस देखील मिळतो. तसेच तुम्ही इतरांना Refer करुन देखील पैसे कमवू शकता.
तुम्ही तुमचे Payment Payza च्या माध्यमातून स्वीकारु शकता. ह्या वेबसाईटची खास गोष्ट म्हणजे तुम्ही येथून विविध मार्गाने पैसे कमवू शकता.

PixProfit

अजून एक चांगली साईट जी तुम्हाला १००० कॅपचा भरण्याचे चांगले पैसे देते.
PixProfit वेबसाईट वर रजिस्ट्रेशन सध्या बंद आहे. तुम्हाला नियमितपणे अधून मधून वेबसाईटला Visit द्यावी लागेल. तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन पुन्हा कधी चालू होईल या विषयी माहिती मिळेल.

Captcha काम सुरु करण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी

१. कॅपचा काम करुन तुम्ही जास्त प्रमाणात पैसे नाही कमवू शकत. हि एक पार्ट टाईम जॉब आहे. येथून तुम्ही  जास्तीत जास्त ६००० ते २०,००० रुपये महिना कमवू शकता जर तुम्ही दररोज ४ तास काम केले तर.

२. तुम्हाला Paypal किंवा Payza वर अकाऊंट बनवावे लागेल. जेणे करुन तुम्ही Payment स्वीकारु शकाल.

३. तुम्ही सगळ्या प्रकारच्या कॅपचा काम देणाऱ्या वेबसाईट Try करुन बघा. कोणती वेबसाईट तुम्हाला वेळेवर Payment देत आहे. हे सगळे पाहिल्या नंतर तुम्हाला जी वेबसाईट ठीक वाटेल त्यावर काम करा.
Captcha काम करुन पैसे कसे कमवायचे (how to make money by solving captcha in marathi) तसेच हे काम देणाऱ्या वेबसाईट विषयी मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्हाला जी वेबसाईट ठीक वाटेल तेथे तुम्ही काम करु शकता.
ऑनलाईन पैसे कमवण्याचे इतर मार्ग देखील उपलब्ध आहेत. जेथून तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता.
ऑनलाईन पैसे कमवण्याचे विविध मार्ग कोणते आहेत या विषयी मी नवनवीन माहिती येथे पोस्ट करत असतो. मी पोस्ट केलेली नवीन माहिती तुम्हाला कळण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.
जेणे करुन मी नवीन माहिती पोस्ट केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
मी पैसे कमवण्याशी निगडित दिलेली माहिती आवडली असल्यास कृपया मला कंमेंटमध्ये कळवा.

5 thoughts on “Captcha भरण्याचे काम करुन महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमवा”

Leave a Comment