देशात डिजिटल चलन(Currency) असावे याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक Voucher वर आधारित डिजिटल पेमेंट पद्धत e-RUPI सादर केली. आपण येथे पाहूया नक्की हे e-RUPI आहे तरी काय
e-RUPI काय आहे?
e-RUPI हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम आहे जे लाभार्थींच्या फोनमध्ये एसएमएस-स्ट्रिंग किंवा QR कोडच्या स्वरुपात येईल.
हि सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणद्वारे विकसित करण्यात आले आहे. e-RUPI हि एक विशिष्ट पेमेंट पद्धत असेल.
e-RUPI कसे कार्य करते?
e-RUPI हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम आहे. सुरुवातीला हे प्रीपेड गिफ्ट voucher सारखे असेल जे कोणत्याही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल अँप किंवा इंटरनेट बँकिंग शिवाय रिडिम केले जाऊ शकते. e-RUPI हे लाभार्थीना कोणत्याही Physical इंटरफेस शिवाय डिजिटल सेवांच्या प्रायोजकांशी जोडेल.
काही संस्थांना किंवा सरकारतर्फे निधी लाभार्त्याना द्यायचा असतो अशा वेळेस e-RUPI चा वापर करुन SMS किंवा QR कोडद्वारे निधी पाठवण्यात येईल. यामुळे निधी किंवा अनुदान देताना वरुन खाली सामान्य जनतेपर्यंत येताना मध्ये जी गळती होत होती तिला आळा बसेल. तसेच सर्व सामान्य जनतेला याचा फायदा होईल.
थोडक्यात सांगायचे झाल्यास पूर्वीच्या वेळेस जसे आपण रिचार्ज मारायला रिचार्ज कार्ड स्क्रॅच करुन बॅलन्स टाकत होतो त्या प्रमाणेच e-RUPI च्या Voucher मध्ये सरकारी निधी येईल. आपल्याला फोनद्वारे SMS किंवा QR कोडद्वारे निधी आपल्या बँक अकाऊंटमध्ये येईल.
e-RUPI कसे जारी केले जातील?
हि प्रणाली UPI प्लॅटफॉर्म वर NPCI ने विकसित केली आहे. तसेच हे Voucher जारी करण्याचे काम करतील अशा बँकांचा यामध्ये समावेश होतो. कॉर्पोरेट किंवा सरकारी agency ला हे मिळवण्यासाठी भागीदार बँकांशी संपर्क साधावा लागेल ज्या खाजगी किंवा सरकारी दोन्ही असू शकतात.
तसेच आपल्याला माहिती द्यावी लागेल ती कोणासाठी व कोणत्या उद्देशाने घेतली जात आहे.
e-RUPI कुठे वापरता येईल?
सरकारच्या मते e-RUPI कल्याणकारी सेवा लीक प्रूफची पडताळणी करेल. आई, बाळ कल्याण योजना, क्षयरोग निर्मूलन कार्यकम आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि खत अनुदानांतर्गत सुविधा आणि औषधें उपलब्ध करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
e-RUPI मध्ये सहभागी असणाऱ्या बँका
e-RUPI मध्ये पुढील सहभागी बँक आहे.
Axis Bank, Bank of Baroda, HDFC Bank, IDFC Bank, Kotak bank, Punjab national bank, state bank of India, Union Bank of India, Canara Bank, Indusind Bank, Indian Bank
वरील बँक ह्या e-RUPI मध्ये सहभागी आहेत.
तुम्हाला e-RUPI विषयी काही अडचण असल्यास किंवा कोणती माहिती कळली नसल्यास मला कंमेंटमध्ये विचारु शकता. e-RUPI सारखे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.