आज स्मार्ट फोनमध्ये खूप वेगाने बदल होऊ लागले आहेत. प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या फोनला अधिक चांगले व आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे. त्यामध्ये विविध सुविधा ऍड करत आहे.
परंतु याचा फायदा जास्त करुन तरुण पिढीला होत आहे. तरुण पिढीच्या व्यक्ती फोनमधील बदल व वाढलेल्या सुविधा सहज समजून घेतात. पण वयस्कर व्यक्तींसाठी ह्या सर्व गोष्टी समजून घेणे अवघड झाले आहे.
पूर्वीच्या वेळी जे फोन उपलब्ध होते त्याचा वापर हा कॉल करण्यासाठी किंवा कॉल उचलण्यासाठी केला जायचा. पण आता सर्व काम हे फोनद्वारे ऑनलाईन होत आहे. आज स्मार्टफोनचा वापर फक्त कॉल करण्यासाठी नाही तर खूप कामांसाठी केला जातो.
- लाईट बिल भरणे
- फोनला रिचार्ज मारणे
- मीटिंग करणे
- टॅक्सी बुक करणे
या सारखी बरीच कामे आता ऑनलाईन होऊ लागली आहेत.
हे सर्व वयस्कर व्यक्तींसाठी समजणे किंवा करणे अवघड आहे. त्यामुळे अँप डेव्हलपरने काही असे अँप्स तयार केले आहेत जे वयस्कर व्यक्तींसाठी फायद्याचे असतील. हे अँप्स त्यांना समजण्यासाठी तसेच वापरण्यासाठी अगदी सोयीचे आहे.
मी आज तुम्हाला काही असे अँप्स सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींच्या फोनमध्ये इन्स्टॉल करु शकता. त्यांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी, मनोरंजनासाठी किंवा दैनंदिन जीवनातील कामे सोपे करुन देण्यासाठी हे अँप्स फायदेशीर ठरतील.
चला तर पाहूया हे अँप कोणते आहेत.
१. Medisafe
बऱ्याच वृद्ध व्यक्तींना काही तरी आजार असतो व हा आजार दूर करण्यासाठी त्यांना औषधे घ्यावी लागतात. हि औषधे वेळेवर घेणे गरजेचे असते. पण वृद्ध व्यक्ती औषधे वेळेवर घेत नाहीत. हि औषधे वेळेवर घेण्यासाठी तुम्हाला Medisafe हे अँप मदत करेल.
ह्या अँपमध्ये तुम्ही एकदा तुमच्या औषधाचे नाव व ते कोणत्या वेळेस घ्यायचे आहे हे टाकल्यावर तुम्हाला हे अँप औषधे घेण्यासाठी आठवण करुन देईल. तसेच तुमच्याकडे किती औषधे किंवा टॅब्लेट्स आहेत हे टाकल्यावर ते औषधे संपत आल्यावर तुम्हाला सांगेल कि तुमची औषधे संपत आली आहेत.
वयस्कर व्यक्तींना त्यांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी हे अँप फार फायदेशीर आहे.
२. Google Map
वयस्कर व्यक्ती बाहेर फिरत असताना किंवा एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर ते रस्ता विसरतात. हि घटना आपण सगळ्यांनी अनुभवली असेल. अशा वेळेस व्यक्ती फार घाबरुन जाते. इतरांना रस्ता विचारण्यास सुरुवात करते. अशा स्थितीत लोक मदत करतात पण काही जण तुम्हाला चुकीचा रस्ता देखील सांगू शकतात.
अशा वेळेसाठी तुम्ही गूगल मॅप अधिक चांगल्या प्रकारे वापरु शकता. तुम्ही कुठे आहात हे सांगून तुम्हाला जिथे देखील जायचे आहे तेथे जाण्यासाठी हे अँप तुम्हाला रस्ता दाखवेल. ह्या अँपच्या मदतीने तुम्ही गाडी कुठे लावली आहे हे देखील लक्षात ठेऊ शकता.
३. Magnifying Glass + Flashlight
६० ते ६५ वय असलेल्या व्यक्तींना लहान अक्षरे दिसत नाहीत. हॉटेल मधील मेनू कार्ड वाचण्यासाठी किंवा एखाद्या पॅकिंग वरील लेबल वाचण्यासाठी त्यांना त्रास होतो. अशा वेळेसाठी अँप फार फायदेशीर आहे.
Magnifying Glass हे अँप फोनचा कॅमेरा वापरुन लहान अक्षरे तुम्हाला मोठी करुन दाखवेल जेणें करुन तुम्ही सहज एखादी गोष्ट वाचू शकता. ह्या अँपमध्ये Flashlight सुद्धा मिळते. जेणे करुन तुम्ही अधिक स्पष्टपणे एखादे शब्द पाहू किंवा वाचू शकता.
४. Monefy- Budget Manager and Expense Tracker app
ह्या अँपचा वापर वयस्कर व्यक्तींना स्वतःचे खर्च व उत्पन्न मॅनेज करण्यासाठी होईल. तसेच सेवा निवृत्तीसाठी जर तुम्ही पैसे साठवत असाल तर सेवा निवृत्ती नंतर तुम्हाला किती पैसे हवे आहेत व ते मिळण्यासाठी तुम्हाला किती Saving करणे गरजेचे आहे हि सर्व माहिती तुम्हाला हे अँप सांगेल.
ह्या अँपमध्ये तुमचे खर्च, उत्पन्न व सेविंग या विषयी तुम्हाला चार्ट दाखवेल जेणे करुन वृद्ध व्यक्तींना समजण्यास सोपे जाईल.
५. Audible
वृद्ध व्यक्तींना लहान अक्षरे दिसण्याची कमतरता असल्याने त्यांना पुस्तके वाचण्यास खूप समस्या येतात. जर कोणत्याही वृद्ध व्यक्तीस पुस्तके वाचण्याची आवड असल्यास त्यांच्यासाठी Audible हे अँप फायदेशीर आहे.
ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे पुस्तके मिळतील. आपण आपल्या आवडीनुसार एखाद्या टॉपिक वरील पुस्तक ऑडिओमध्ये ऐकू शकतो. जर तुम्हाला ऑडिओ बुक ऐकायचे असतील तर त्यासाठी play store वर खूप सारे अँप तुम्हाला फ्री मध्ये मिळतील.
६. LastPass
आज इंटरनेट वर काही करायचे असल्यास आपल्याला सुरुवातीला पासवर्ड द्यावा लागतो. जेणे करुन आपले अकाऊंट हॅक होणार नाही. वेगवेगळ्या वेबसाईट वर लॉग इन करण्यासाठी आपल्याला वेगळा पासवर्ड टाकावा लागतो.
आपण कोणत्या वेबसाईट किंवा अँपला कोणता पासवर्ड टाकला आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हे अँप आपणास मदत करेल. तुम्ही जो नवीन पासवर्ड तयार कराल तो ह्या अँपमध्ये save होईल. तुम्हाला फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ह्या अँपचा.
७. HealthifyMe
तुम्हाला दिवसभरात किती खायचे आहे तो Diet plan तसेच किती कॅलरी तुम्हाला दिवसभरात घ्यायच्या आहेत हे सर्व तुम्ही ह्या अँपद्वारे ट्रॅक करु शकता.
वयस्कर व्यक्तींसाठी हे अँप फार फायदेशीर आहे. त्यांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम करण्यासाठी हे अँप चांगले आहे.
८. OLA/UBER
आपण जर स्वतःची गाडी चालवत नसाल आणि आपल्याला बाहेर जायचे असल्यास OLA किंवा UBER वर गाडी बुक करणे अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला शहरात कुठेही फिरायचे असल्यास किंवा शहरा बाहेर जायचे असल्यास हि सेवा आपल्यासाठी फायदेशीर आहे.
येथे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करु शकता. तसेच कोठून हि तुम्ही गाडी बुक करु शकता. यामुळे तुमचा टॅक्सी किंवा रिक्षा शोधण्यासाठीचा वेळ वाचेल.
९. Spotify
संगीत आपल्याला आराम करण्यास, पूर्वीच्या गोष्टी आठवण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. Spotify अँपच्या मदतीने आपण आवडीचे संगीत एकूण त्याला रेटिंग देऊ शकतो.
आज वेळ पॉडकास्टची आहे. आपण विविध विषयावरील पॉडकास्ट देखील ह्या अँपच्या साहाय्याने ऐकू शकतो.
तुमचे आवडते पॉडकास्ट तुम्ही save देखील करु शकता. पॉडकास्ट ऐकण्यासाठी स्पोटिफाय एक नंबर अँप आहे.
हे सर्व अँप तुम्हाला play store वर तसेच apple फोनसाठी फ्री मध्ये मिळतील.
हे अँप तुम्ही तुमच्या बाबांच्या किंवा आजोबांच्या फोनमध्ये नक्की इन्स्टॉल करा. हे अँप त्यांच्या दररोजच्या जीवनात फार उपयुक्त ठरतील.
आजची माहिती तुम्हाला कशी वाटली. छान वाटल्यास हि तुमच्या मित्रांसोबत share करा.
Related