आपल्या पैकी किती जण आहेत ज्यांना खरोखर माहीत आहे कि सिबिल स्कोर काय आहे (cibil score meaning in marathi).
ठराविक जण असतील ज्यांना सिबिल स्कोर विषयी माहित असेल. बहुतांशी लोकांना अजून सिबिल स्कोर असतो काय? याचा उपयोग कोठे केला जातो हे माहीत नाही.
ज्या व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतात किंवा बँकेमध्ये लोन मागायला जातात त्यांना काही प्रमाणात सिबिल स्कोर विषयी माहित असेल.
क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अनुसार भारतामध्ये २००० साली सिबिल स्कोर सुरु करण्यात आले. सिबिल स्कोर हा कोणत्याही बँकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. तसेच सामान्य जनतेसाठी देखील हे गरजेचे आहे.
तुम्हाला देखील कधी ना कधी भविष्यात लोनची किंवा क्रेडिट कार्डची गरज पडू शकते. त्यामुळे आताच ह्या पोस्टमध्ये सिबिल स्कोर विषयी संपूर्ण माहिती घ्या. जेणे करुन तुम्हाला दुसरीकडे कोठे ही सिबिल स्कोर विषयी माहिती घेण्याची गरज पडणार नाही.
CIBIL स्कोर म्हणजे काय। CIBIL score meaning in Marathi
सिबिल स्कोर हा एक ३ डिजिट नंबर असतो जो आपली क्रेडिट हिस्टरी दर्शवित असतो. सिबिल स्कोर हा आपल्या क्रेडिट रिपोर्टच्या आधारावर मोजला जातो. सिबिल स्कोर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो.
जेवढा जास्त आपला क्रेडिट स्कोर असतो तेवढी चांगली आपली क्रेडिट हिस्टरी असते. सिबिल स्कोर एक प्रकारे आपली लोन परत करण्याची योग्यता दर्शवित असतो.
सिबिल स्कोरमुळे बँकेला कळते कि आपण जे लोन मागत आहोत ते परत करण्याची आपली योग्यता आहे कि नाही. बँक लोन देण्या अगोदर आपला सिबिल स्कोर बघते आणि मग आपल्या सिबिल स्कोरच्या आधारावर लोन द्यायचे कि नाही हे ठरवते.
CIBILचा फुल फॉर्म काय आहे। CIBIL full form in marathi
तुम्हाला सिबिल स्कोर म्हणजे काय हे तर कळले पण सिबिलचा फुल फॉर्म काय आहे माहीत आहे का?
सिबिलचा फुल फॉर्म Credit Information Bureau of India Limited हा आहे.
CIBIL स्कोर कसा चेक करायचा ?
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. तुम्हाला Free CIBIL Score चेक करायचा असे तर www.cibil.com/freecibilscore या वेबसाईट वर जावे लागेल.
2. त्या नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला साधारण माहिती म्हणजेच नाव, पत्ता, फोन नंबर, आयडी प्रूफ या सारखी माहिती भरायची आहे. जी माहिती भराल ती योग्य भरा अन्यथा तुमचा सिबिल स्कोर दिसणार नाही.
3. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. हे प्रश्न तुमच्या लोन विषयी किंवा क्रेडिट कार्डशी रिलेटेड असू शकतात. मग तुमचा सिबिल सिबिल स्कोर मोजला जाईल आणि त्याची रिपोर्ट तयार केली जाईल.
4. तुम्ही सर्व माहिती नीट भरल्यास तुम्हाला सिबिल स्कोर व सिबिल रिपोर्ट मिळेल.
सिबिल स्कोर मिळाला म्हणजे झाले असे नाही. तुम्हाला तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येणारे Up आणि Down पाहावे लागतात. कारण क्रेडिट एजेन्सी, बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक महिन्याला रिपोर्ट Renew करत असतात. म्हणून सिबिल स्कोर कायम चेक करणे गरजेचे आहे.
सिबिलची वेबसाईट आपल्याला केवळ एकदाच फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करण्याची परवानगी देते. सिबिल स्कोर विषयी नेहमी रिपोर्ट पाहायचा असल्यास तुम्हाला याचे Paid Subscription घ्यावे लागेल.
CIBIL स्कोर किती असला पाहिजे ?
आपण वरील माहितीमध्ये पाहिले कि सिबिल स्कोर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. जेवढा जास्त आपला सिबिल स्कोर असतो तेवढी जास्त शक्यता असते कि आपल्याला बँके कडून लोन मिळेल.
३०० च्या खाली
जर तुमचा सिबिल स्कोर हा ३०० पेक्षा कमी असेल तर मग तुम्हाला लोन मिळणार नाही. अशा व्यक्ती बँकेसाठी खूप मोठी रिस्क असते. ते तुम्हाला पात्र नाही समजत लोन देण्यासाठी.
३०० आणि ४५० दरम्यान
अगोदरच्या स्कोरच्या तुलनेत हा स्कोर ठीक आहे पण चांगला नाही. जर तुमचा स्कोर ३०० ते ४५० च्या दरम्यान असेल तर तो सुधारायला हवा. तुमची EMI वेळेत देत चला जेणे करुन सिबिल स्कोर सुधारेल.
४५० आणि ६०० दरम्यान
हा एक सर्वसामान्य स्कोर मानला जातो. हा स्कोर जास्त चांगला पण नाही आणि वाईट पण नाही. ह्या स्कोरमध्ये तुम्हाला काही बँक लोन पण देऊ शकतात. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळाले तर त्याची लिमिट फार कमी असेल.
६०० आणि ७५० दरम्यान –
हा स्कोर खूप चांगला आहे. ह्या स्कोरद्वारे तुम्हाला जवळ-जवळ सर्व बँक कर्ज देतील आणि क्रेडिट कार्ड देखील देतील. पण जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज हवे असेल तर ते मिळेलच असे नाही.
७५० आणि ९०० दरम्यान
जर तुमचा क्रेडिट स्कोर ह्या दरम्यान येत असेल याचा अर्थ तुम्ही तुमचा Financial ट्रॅक रेकॉर्ड चांगल्या प्रकारे maintain केला आहे. अशा वेळेस तुम्हाला कोणती हि बँक मोठ्या प्रमाणात लोन द्यायला तयार होते.
तुम्हाला क्रेडिट कार्डची जास्त लिमिट देखील मिळेल या सोबत चांगले कॅशबॅक आणि ऑफर्स देखील मिळतील.
CIBIL स्कोर कोणत्या घटकांवर अवलंबून आहे ?
सिबिल स्कोर मोजताना आपली क्रेडिट हिस्टरी पाहिली जाते. सिबिल ब्युरो सगळी माहिती गोळा करुन एक रिपोर्ट तयार करते. हे सगळं ते आपला CIBIL Transunion स्कोर मोजण्यासाठी करतात.
सिबिल स्कोर प्रामुख्याने खालील घटकांवर अवलंबून असतो.
1. Repayment history
आपण घेतलेले लोन किती वेळेत परत केले आहे. क्रेडिट कार्डचे बिल तसेच EMI आपण वेळेत भरत आहोत का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.
2. High Credit Utilization
High credit Utilization म्हणजे तुम्हाला जास्त लोन घेण्याची सवय आहे का ?
तुम्ही जर मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करत असाल किंवा जास्त लोन घेत असाल तर तुमचा सिबिल स्कोर कमी होईल. म्हणून तुम्ही मध्यम प्रमाणात लोन घेतले पाहिजे.
3. Multiple Enquiries
ज्या वेळी आपण एकाच वेळेस अनेक प्रकारचे लोन घेण्याचा प्रयत्न करतो त्याला Multiple Enquiries म्हणतात. जर आपण एकाच वेळी अनेक लोन घेतले तर आपल्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो. त्यामुळे जेवद्याची गरज आहे तेवढेच लोन घ्या.
4. Credit Mix
जर तुम्ही विविध प्रकारचे लोन घेत असाल जसे कि कार लोन, होम लोन, वैयक्तिक लोन तर आपला सिबिल स्कोर चांगला आहे असे समजले जाते. क्रेडिट मिक्सचा अर्थ हाच आहे.
CIBIL स्कोर कसा वाढवायचा ?
आपण वर पाहिले कि कोणते घटक आहेत ज्यावर आपला सिबिल स्कोर अवलंबून असतो. हेच घटक आपला सिबिल स्कोर कमी होण्याचे कारण देखील असतात.
आता आपण पाहूया सिबिल स्कोर वाढवण्यासाठी किंवा तो maintain करण्यासाठी काय करायला हवे.
1. वेळेत लोन आणि क्रेडिट कार्डचे बिल भरणे
EMI तसेच क्रेडिट कार्डचे बिल आपण वेळेत भरले पाहिजे. आपली परिस्थिती चांगली झाल्यास सगळे लोन फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
बऱ्याचदा EMI किंवा लोन भरणे आपल्या लक्षात राहत नाही. अशा वेळेस आपण Automatic Payment Mode चा वापर करु शकता.
2. Credit Mix / Duration
आपण कधी हि कमी वेळेत जास्त लोनसाठी Apply नाही केलं पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण ३ ते ४ महिन्यात दोन तीन जागी लोनसाठी Apply नाही केलं पाहिजे. यामुळे आपल्या सिबिल स्कोरवर negative परिणाम होतो.
3. क्रेडिट कार्डचा अति वापर करु नका
बऱ्याच जणांना क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरण्याची सवय असते. क्रेडिट कार्डच्या मदतीने ते मोठ्या प्रमाणात खर्च करायला सुरुवात करतात.
आपल्या क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या ३० टक्केच रक्कम आपण वापरली पाहिजे. जर तुमची क्रेडिट कार्डची लिमिट १,००,००० असेल तर तुम्ही जास्तीत जास्त ३०,००० रुपये वापरले पाहिजे. त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही वापरले नाही पाहिजेत.
जर तुमची सॅलरी ५०,००० असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड मधील जास्तीत जास्त १५,००० रुपयेच वापरले पाहिजे. या सोबतच तुमची सगळी EMI मिळून हि ४० टक्यांपेक्षा कमी असली पाहिजे. जर तुम्ही अशा प्रकारे खर्च नियंत्रित केले तर तुमचा सिबिल स्कोर वाढण्यास मदत होईल.
4. क्रेडिट कार्ड व्यवस्थित वापरा
काही जण खूप सारे क्रेडिट कार्ड घेतात आणि एका क्रेडिट कार्डचा खर्च दुसऱ्या क्रेडिट कार्डने आणि दुसऱ्याचा खर्च तिसऱ्या क्रेडिट कार्डने भरतात. अशा वेळेस हे सर्व खर्च मॅनेज करणे अवघड होते.
आपण १ किंवा २ क्रेडिट कार्ड पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड नाही घेतले पाहिजेत. या सोबतच क्रेडिट कार्डचे बिल आपण वेळेत भरले पाहिजे.
हे वाचा – Driving License साठी ऑनलाईन Apply कसे करायचे ?
आज तुम्ही काय शिकलात ?
मी तुम्हाला आज सिबिल स्कोर विषयी संपूर्ण माहिती (CIBIL score meaning in marathi) सांगितली. तरी देखील जर तुम्हाला सिबिल स्कोरच्या माहिती विषयी काही अडचण असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता.
जर तुम्हाला ह्या ब्लॉग वरील माहिती वाचण्यासाठी आवडत असेल तर डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करा आणि नोटिफिकेशन Allow करा. जेणे करुन मी जेव्हा नवीन माहिती पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.