TRP Full Form काय आहे ? TRP कसा चेक केला जातो आणि कोणत्याही चॅनेलचा टीआरपी का काढला जातो. टीआरपी काढण्याची नेमकी गरज का पडते या सगळ्या विषयी आज आपण येथे माहिती पाहणार आहोत.
जर तुम्हाला टीआरपी विषयी काही माहित नसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. तुम्हाला येथे टीआरपी विषयी सर्व माहिती मिळेल जेणे करुन टीआरपी विषयी तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न राहणार नाही.
तुम्हाला माहित आहे का आपल्या देशात सध्या ८५० टीव्ही चॅनेल आहेत. दरवर्षी या चॅनेलच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे. इतके जास्त चॅनेल उपलब्ध असल्यामुळे आपण सर्व जण हवे ते Movie, Serial टीव्ही वर बघत असतो. जसे की क्रिकेट, चला हवा येऊ द्या किंवा या सारखे आणखी काही तरी पाहत असतो.
आता आपण टीव्ही वर ज्या मालिका, चित्रपट पाहतो तसेच कोणत्या चॅनेल वर पाहतो त्या सर्वांची Popularity (प्रसिद्धी) चेक करण्यासाठी TRP चा वापर केला जातो. टीआरपी मुळे लोक कोणता Show किंवा चॅनेल बघणे पसंत करतात हे कळते.
टीव्ही वर मालिका तसेच Comedy show चा टीआरपी जास्त असतो. कारण ह्या गोष्टी लोक मोठ्या प्रमाणात बघतात. उदाहरण सांगायचे झाले तर झी मराठी वर ” चला हवा येऊ द्या ” चा टीआरपी सर्वात जास्त आहे कारण हा Comedy show आहे.
टीआरपी विषयी तसेच हा कसा चेक केला जातो या विषयी संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया.
TRP Full Form काय आहे।TRP Full Form in marathi
TRP चा फुल फॉर्म आहे Television Rating Point. हे एक असे tool आहे ज्याद्वारे कोणता चॅनेल किंवा show सगळ्यात जास्त पाहिला जातो तसेच किती वेळ पाहिला जातो हे समजते. जर तुम्हाला कोणत्याही चॅनेलची किंवा show ची प्रसिद्धी चेक करायची असेल तर त्या चॅनेलचा टीआरपी बघून सगळे काही कळते.
लॉकडाऊन मध्ये दूरदर्शन चॅनेल वरील श्री कृष्ण मालिकेची रेटिंग सर्वात जास्त होती. या मालिकेला ५.० ची रेटिंग देण्यात आली होती. तर Star plus वरील महाभारत ३.६ रेटिंग सोबत दुसऱ्या नंबर वर आहे.
TRP Full Form in media
TRP म्हणजे Television Rating Point. मीडियामध्ये टीआरपीचा विचार करताना कोणत्या चॅनेलचा टीआरपी जास्त आहे. आपल्या वस्तू किंवा सेवा या विषयी मार्केटिंग करण्यासाठी कोणता चॅनेल चांगला ठरेल या सर्व गोष्टींचा यामध्ये विचार केला जातो.
मीडिया व्यवसायात टीआरपी फार महत्वाची भूमिका पार पाडत असते.
TRP का काढला जातो ?
टीआरपी काढण्याचे मुख्य कारण हे एखाद्या चॅनेल किंवा show ची प्रसिद्धी चेक करणे असते.
तसेच खूप Advertiser (जाहिरातदार) आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी कोणता चॅनेल चांगला आहे व सगळ्यात जास्त कोणता चॅनेल पाहिला जातो हे शोधत असतात. अशा वेळी Advertiser टीआरपीची मदत घेत असतात.
जास्त टीआरपी कोणत्या चॅनेलचा आहे हे पाहून ते आपली जाहिरात त्या चॅनेल वर दाखवत असतात.
TRP कसा चेक करतात ?
मालिका आणि चॅनेलचा टीआरपी चेक करण्यासाठी People meter ची मदत घेतली जाते. हे people मीटर काही ठिकाणी बसवण्यात आले आहेत जे Frequency द्वारे माहित करुन घेतात की कोणता चॅनेल किंवा शो जास्त पाहिला जात आहे. तसेच जाहिरात किती वेळ पाहिली जात आहे.
People meter च्या मदतीने Television सर्व माहिती Monitoring Team (Indian Television Audience Measurement) पर्यंत पोहोचवते.
Monitoring Team (Indian Television Audience Measurement) मिळालेली माहिती पाहून ठरवते कोणत्या चॅनेलचा टीआरपी किती आहे.
People meter विविध माहिती पुरवत असते. जसे की गावामधून किंवा शहरामधून किती लोक बघत आहे. गावामध्ये कोणते चॅनेल पाहिले जातात व शहरामध्ये कोणते चॅनेल पाहिले जातात.
कोणत्या प्रकारची जाहिरात सगळ्यात जास्त पाहिली जाते ही सगळी माहिती People meter पुरविते.चॅनेलची टीआरपी किंवा प्रसिद्धी चेक करण्यासाठी Barcindia चा वापर केला जातो.
TRP कसा मोजला जातो ?
INTAM इंडिया भारतातील एक मात्र कंपनी आहे जी टीआरपी मोजण्याचे काम करते. ही कंपनी टीआरपी मोजण्यासाठी खालील दोन पद्धतींचा वापर करते.
- Frequency Monitoring Method
- Picture Matching Method
1. Frequency Monitoring Method
या पद्धतीमध्ये टीआरपी मोजण्यासाठी टेलिव्हिजन सोबत एक डिव्हाईस जोडले जाते ज्याला People Meter असे म्हणतात. ज्या विषयी आपण अगोदरच वर माहिती पाहिली आहे. हा मीटर ठराविक वेळेला लोक कोणता चॅनेल किती वेळ बघत आहे ही माहिती रेकॉर्ड करते.
ही माहिती रेकॉर्ड करण्याचे काम ३० दिवस चालते. त्यानंतर मिळालेली माहिती पाहून त्याचे Analysis करुन चॅनेलचा टीआरपी किती आहे हे ठरवले जाते.
2. Picture Matching Method
इथे Frequency च्या ऐवजी People meter सतत एक छोटा भाग रेकॉर्ड करत असतो. ज्यामध्ये चॅनेलची सर्व माहिती असते. त्यानंतर सर्व माहिती गोळा करुन Analysis केले जाते. या प्रक्रियेमध्ये कळते कोणता चॅनेल जास्त पाहिला जातो.
TRP चा चॅनेल वर काय परिणाम होतो ?
आता पर्यंत आपण TRP Full Form (TRP Full Form in marathi) काय आहे आणि तो कसा चेक करतात या विषयी सविस्तर माहिती पाहिली. पण ह्याचा चॅनेल वर काय परिणाम होतो हे पाहूया.
टीआरपी मुळे आपल्याला कोणता चॅनेल जास्त किंवा कमी पाहिला जातो हे कळते. तर मग निश्चितच याचा परिणाम चॅनेल वर होत असणार. टीआरपी कमी-जास्त असण्याचा परिणाम चॅनेलच्या Income वर होतो.
कोणताही चॅनेल कमाई करतो त्यांच्या Advertiser (जाहिरातदार) कडून परंतु हे advertiser चॅनेलच्या टीआरपी नुसार जाहिरातीचे पैसे चॅनेलला देत असतात. जर चॅनेलचा टीआरपी जास्त असेल तर जास्त पैसे मिळतात व कमी टीआरपी असेल तर कमी पैसे मिळतात.
टीआरपी हा केवळ चॅनेलचा नाही तर त्या चॅनेल वरील एखाद्या ठराविक मालिकेचा देखील पाहिला जातो. आणि त्या नुसार चॅनेलची कमाई होत असते.
थोडक्यात सांगायचे झाले तर जास्त टीआरपी असणे हे कोणत्याही चॅनेलसाठी चांगलेच आहे. यामुळे चॅनेलच्या कमाईमध्ये वाढ होते.
लॉकडाऊनमध्ये लोक घरी बसून कंटाळले होते त्यामुळे दूरदर्शन वर रामायण ही मालिका पुन्हा सुरु करण्यात आली होती. रामायण या मालिकेची टीआरपी आता पर्यंतच्या दुसऱ्या मालिकांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त आहे.
ही माहिती प्रसार भारतीचे CEO शशि शेखर यांनी एका ट्विटद्वारे दिली.
ते म्हणाले ” मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका रामायण २०१५ पासून ते आतापर्यंत सर्वात जास्त टीआरपी असणारा हिंदी मनोरंजक show बनला आहे.”
TRP मुळे चॅनेल पैसे कसे कमवतात ?
आपण वर पाहिले की जास्त टीआरपी असल्यामुळे चॅनेलला Advertiser कडून जास्त पैसे मिळतात.आता आपण पाहूया चॅनेलचे कमाई करण्याचे मार्ग कोणते आहेत.
एक चॅनेल अनेक मार्गांनी पैसे कमवत असतो. त्यातील पैसे कमवण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जाहिरात.
कोणत्याही चॅनेलची ९० टक्के Income येथून होते. चॅनेल वरील मालिका किंवा show च्या मध्ये जाहिरात दाखवून हे चॅनेल मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असतात. तसेच चॅनेलचा टीआरपी जर जास्त असेल तर जास्त पैसे देखील मिळतात.
हे वाचा – E-Shram Card फ्री ऑनलाईन कसे काढायचे ?
आज तुम्ही काय शिकलात ?
मित्रांनो, आज आपण येथे TRP Full Form काय आहे (TRP Full Form in marathi) तसेच तो कसा चेक केला जातो व मोजला जातो हे पाहिले. तसेच टीआरपी विषयी इतर माहिती देखील आपण वर पाहिली. टीआरपी विषयी वर सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारु शकता.
ह्या ब्लॉग वर अशीच उपयुक्त माहिती पोस्ट होत असते. या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.