आज सोशल मीडिया माध्यमांमध्ये इंस्टाग्राम फार प्रचलित आहे. सर्व जण आज फेसबुक, व्हाट्सअँप पेक्षा इंस्टाग्राम वर जास्त व्यस्त आहेत. पण इंस्टाग्राम विषयी संपूर्ण माहिती (Instagram information in marathi) कुणालाच माहित नाही.
इंस्टाग्राम म्हटले कि आपल्याला आठवते सुंदर-सुंदर अभिनेत्रींचे फोटो, व्हिडिओ या सगळ्यासाठी इंस्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंस्टाग्राम वर जास्त करुन तरुण मंडळी आहेत. हि तरुण मंडळी इंस्टाग्रामचा वापर फोटो अपलोड करण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी करते.
आपल्या देशात इंस्टाग्राम वापरकर्ते खूप आहेत पण हे कसे तयार झाले तसेच या विषयी सखोल माहिती फार कमी लोकांना आहे. जर तुम्हाला इंस्टाग्राम विषयी माहिती मिळाली तर याचा वापर तुम्ही स्वतःसाठी करु शकता.
आज मी तुम्हाला इंस्टाग्राम विषयी काही महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे. जी माहिती एक इंस्टाग्राम वापरकर्ता म्हणून तुम्हाला असली पाहिजे. चला तर सुरुवात करुया.
इंस्टाग्राम काय आहे।Instagram information in marathi
इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया अँप आहे ज्याच्या मदतीने आपण फोटो, रील्स एकमेकांसोबत शेअर करु शकतो.
इंस्टाग्रामची सुरुवात २०१० साली Kevin Systrom आणि Mike Krieger या दोघांनी केली होती. ह्या अँपची संपूर्ण Desgin तसेच लोगो बनवण्यापासून त्याचा कलर ठरवण्याचे सगळे काम ह्या दोघांनी केले होते.
हे अँप सुरुवातीपासूनच फार प्रसिद्ध राहिल्यामुळे पुढे जाऊन फेसबुकने इंस्टाग्राम खरेदी केले.
इंस्टाग्रामचा मुख्य उद्देश लोकांना फोटो काढण्यासाठी व आपल्या अकाऊंटमध्ये पोस्ट करावे यासाठी उत्सुक करण्याचा होता.
जेव्हा आपण फोटो किंवा रील्स पोस्ट करतो तेव्हा आपल्याला जे लोक फॉलो करतात त्यांना नोटिफिकेशन जाते. त्या नोटिफिकेशनच्या मदतीने ते आपले फोटो किंवा रील्सला लाईक किंवा कंमेंट करु शकतात.
इंस्टाग्राम अकाऊंट कसे बनवायचे ?
तुम्हाला पहिल्यांदा इंस्टाग्रामच्या लॉगिन पेज वर जावे लागेल तेथे तुम्हाला ई-मेल आयडी, तुमचे नाव, युझर नेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. नंतर Sign up बटन वर क्लिक करा तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट तयार होईल.
मोबाईल मध्ये इंस्टाग्राम वापरण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअर वरुन इंस्टाग्राम अँप डाउनलोड करु शकता. अकाऊंट बनवल्यानंतर तुम्ही लॉगिन आयडी व पासवर्ड सेव्ह करु शकता. जेणे करुन तुम्हाला सारखा आयडी व पासवर्ड टाकण्याची गरज पडणार नाही.
इंस्टाग्राम वर Follower आणि Like कसे वाढवायचे ?
इंस्टाग्राम खूप प्रसिद्ध होत चालल्यामुळे येथे एकमेकांमध्ये फॉलोवर किंवा लाईक वाढवण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. प्रत्येक जण इंस्टाग्राम वर फॉलोवर आणि लाईक वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला येथे काही टिप्स सांगणार आहे ज्या टिप्सच्या मदतीने तुम्ही फॉलोवर आणि लाईक वाढवू शकतो.
1. आकर्षित फोटो टाकणे
आपण जे फोटो इंस्टाग्राम वर टाकणार आहोत त्याची Quality चांगली असली पाहिजे. म्हणजे फोटो हा जितका ठळक व क्लिअर दिसेल तितके चांगले राहील. तसेच जर तुम्ही स्वतःचे फोटो टाकत असाल तर त्यामध्ये स्वतःची चांगली पोझ द्या.
जर तुमचा कोणता बिझनेस असेल व त्याच्याशी निगडित तुम्ही फोटो टाकत असाल तर तो फोटो attractive बनवा त्यामध्ये योग्य प्रकारच्या कलरचा वापर करा.
2. चांगल्या Stories बनवणे
तुम्ही तुमच्या आवडत्या टॉपिकशी related विविध स्टोरी बनवू शकता. इंस्टाग्राम स्टोरी हा देखील एक चांगला पर्याय आहे फॉलोवर आणि लाईक वाढवण्याचा.
ज्या लोकांना तुमची स्टोरी आवडेल त्या स्टोरीस ते त्यांच्या पोस्ट किंवा स्टोरीस मध्ये शेअर करतील व तेथून त्यांचे फॉलोवर आपले फॉलोवर बनतील.
Stories म्हणजे काय - इंस्टाग्राम मधील स्टोरीस हि अशी सुविधा आहे जिथे आपण खूप सारे फोटो किंवा व्हिडिओ एकत्र पोस्ट करु शकतो. आपण टाकलेली स्टोरीस हि २४ तासांसाठी राहते नंतर ती गायब होते. ज्या प्रमाणे आपण व्हाट्सअँप मध्ये स्टेटस टाकतो त्या प्रमाणे इंस्टाग्राममध्ये स्टोरीस टाकल्या जातात.
3. Follower सोबत बोला
तुम्ही टाकलेल्या फोटो किंवा व्हिडिओ वर खूप साऱ्या कमेंट येत असतील त्या कंमेंटचा replay द्या. कंमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फॉलोवर सोबत बोलू शकता. त्यांची समस्या समजून त्याचे Solution देऊ शकता. हा एक उत्तम मार्ग आहे फॉलोवर किंवा लाईक वाढवण्याचा.
तुम्ही पाहिजे तर लाईव्ह येऊन स्वतःच्या फॉलोवर सोबत समोरासमोर बोलू शकता यामुळे तुम्ही फॉलोवर सोबत अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकता.
4. इंस्टाग्राम पोस्ट योग्य वेळेस Publish करा
इंस्टाग्राम वर जर तुम्हाला योग्य प्रकारे पटकन फॉलोवर वाढवायचे असतील तर योग्य वेळेस पोस्ट पब्लिश करणे गरजेचे आहे. लोक कोणत्या वेळेस जास्त ऑनलाईन असतात. ती वेळ समजून तुम्ही पोस्ट करणे गरजेचे आहे.
ज्यावेळी जास्त लोक ऑनलाईन असतील त्या वेळेस जर तुम्ही पोस्ट केले तर अधिक लोकांना तुमची पोस्ट दिसेल त्यामुळे तुमचे फॉलोवर आणि लाईक वाढवण्यास मदत मिळेल.
इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ?
आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊ नये म्हणून इंस्टाग्राम हॅक कसे केले जाते हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
कोणतेही इंस्टाग्राम अकाउंट आपोआप हॅक होत नाही. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असते. एक हॅकर आपले इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा वापर करु शकतो हे तुम्हाला तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
जेणे करुन तुम्ही स्वतःचे अकाऊंट हॅक होण्यापासून वाचवू शकता. अकाऊंट हॅक करण्यासाठी हॅकर साधारणपणे खालील माध्यमांचा वापर करु शकतात.
1. Phishing
फिशिंग हि हॅक करण्याची अशी पद्धत आहे ज्याच्या मदतीने आपले अकाऊंट हॅक झाले तरी आपल्याला कळणार नाही.
फिशिंगमध्ये हॅकर एक खोटे लॉगिन पेज बनवतो जे हुबेहूब खऱ्या लॉगिन पेज सारखे दिसते. आपण जेव्हा या खोट्या लॉगिन पेजमध्ये आपले ID व पासवर्ड टाकतो तेव्हा तो हॅकर कडे एका फाईलच्या स्वरुपात Save होतो. आणि मग आपल्याला खऱ्या साईट वर Redirect केले जाते.
अशा प्रकारे खोटी वेबसाईट बनवून हॅकर आपली माहिती मिळवतात आणि मग आपले अकाऊंट हॅक करतात. त्यामुळे लॉगिन करताना योग्य त्या साईट वरुनच लॉगिन करा.
2. Keylogger
सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याचा हा दुसरा एक पर्याय आहे.
Keylogger हे असे सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने आपण कीबोर्ड वर जे काही टाईप करतो ते सर्व एका फाईलमध्ये रेकॉर्ड होते. व हि फाईल नंतर केव्हाही वाचली जाऊ शकते.
एखादा युझर जेव्हा ID व पासवर्डद्वारे लॉगिन करतो तेव्हा त्याला माहित नसते कि आपली सर्व वैयक्तिक माहिती दुसरा कोणी पाहत आहे. कॉम्प्युटरसाठी Keylogger तर अँड्रॉईड किंवा iphone साठी ikeymonitor वापरले जाते.
3. फेसबुक अकाऊंट
आपल्यामधील बरेच जणांचे इंस्टाग्राम हे फेसबुक सोबत जोडलेले असेल. जेव्हा आपण इंस्टाग्राम वर नवीन पोस्ट टाकतो तेव्हा ती आपोआप फेसबुक वर शेअर व्हावी हा या मागचा उद्देश असतो.
पण याचा फायदा हॅकरला देखील होतो. जर त्यांना आपला फेसबुक ID व पासवर्ड मिळाला तर ते सहज आपले इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करु शकतात.
4. खोटे इंस्टाग्राम अँप
आज आपल्याला इंटरनेट वर मोठ्या प्रमाणात खोटे अँप पाहायला मिळतील. इंस्टाग्रामचे देखील खूप सारे फेक अँप्स बनलेले आहेत. काही जण हेच फेक अँप install करतात व लॉगिन करतात आणि मग त्यांची सर्व गुप्त माहिती हॅकर पर्यंत जाते.
त्यामुळे कोणतेही सोशल मीडिया अँप install करताना किंवा इंस्टाग्राम अँप install करताना आपल्याला खरे अँप कोणते आहे व ते कसे दिसते हे माहित असणे गरजेचे आहे.
कधी ही एखादे अँप install करताना Play Store चा वापर करा. म्हणजे खोटे अँप पासून तुम्ही सुरक्षित रहाल.
इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यासाठी हे काही प्रभावी माध्यम आहेत ज्याद्वारे ते आपले अकाउंट हॅक करु शकतात.
आज तुम्ही काय शिकलात ?
आज आपण या ठिकाणी इंस्टाग्राम विषयी बरीच माहिती (Instagram information in marathi) पाहिली जी खूप साऱ्या लोकांना माहित नसते. आज आपण इंस्टाग्राम काय आहे, त्यावर फॉलोवर कसे वाढवायचे आणि आपले अकाउंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे या विषयी माहिती पाहिली.
मी अशीच Interesting माहिती ह्या ब्लॉगवर पब्लिश करत असतो. जर तुम्हाला interesting माहिती वाचण्यासाठी आवडत असेल तर डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन मेसेज Allow करा. जेणे करुन मी जेव्हा नवीन माहिती पोस्ट करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल.