मायक्रोसॉफ्टने सध्या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमची घोषणा केली आहे. जे Windows ११ ह्या नावाने ओळखले जाते. Windows ११ हा Windows १० चा Succesor आहे.
Windows ११ मध्ये बरेच नवीन Features देण्यात आले आहेत. हे सर्व Features Users ना लक्षात ठेऊन तयार केले आहेत. यामधील काही Features खालील प्रमाणे आहेत.
- Android अँप्स आता आपण Windows ११ मध्ये वापरु शकतो.
- Multitasking चांगल्या प्रकारे करण्यासाठी Desgined व Optimization यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
- Widget चे icons बदलून त्याला नवीन look दिला आहे.
- windows ११ च्या look मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. येथे नवीन Fresh लुक देण्यात आला आहे.
असे काही बदल केल्यामुळे Windows १० वापरकर्ते आता Windows ११ वर शिफ्ट होण्यासाठी उत्सुक आहेत.
Windows ११ PC मध्ये install करण्यासाठी काही System Requirement आहेत. हे Requirement काय आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे चेक करु शकता कि तुमच्या PC किंवा लॅपटॉपमध्ये Windows ११ चालेल कि नाही या विषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे.(Windows 11 information in marathi)
Windows ११ System Requirement काय आहेत?
Windows ११ install करण्यासाठी तुमच्या PC मध्ये काही System Requirement असणे आवश्यक आहे. हे Requirement खालील प्रमाणे आहेत.
Processor – तुमच्या PC मध्ये १ GHz व त्यापेक्षा फास्ट २ व त्यापेक्षा जास्त cores असलेला आणि ६४ बिट प्रोसेसर असला पाहिजे.
Ram – ४ जीबी किंवा त्यापेक्षा जास्त
Display – PC चा डिस्प्ले 720p ला सपोर्ट करणारा असला पाहिजे.
Graphics Card – DirectX 12 compatible graphics card असले पाहिजे.
ह्या काही System Requirement आहेत ज्या तुमच्या PC किंवा लॅपटॉपमध्ये असल्या पाहिजेत.
तुमच्या PC मध्ये Windows ११ चालेल कि नाही अशा प्रकारे चेक करा।Windows 11 information in marathi
Windows ११ च्या ज्या System Requirement आहेत त्या आपल्या PC मध्ये आहेत का नाही हे वापरकर्त्यांना सोप्या पद्धतीने चेक करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने प्रोग्रॅम Released केला आहे जो PC Health Check या नावाने ओळखला जातो.
हा प्रोग्रॅम PC मध्ये Run केल्यानंतर तुम्हाला कळेल कि तुमच्या PC मध्ये Windows ११ चालेल कि नाही.
तुमच्या सोयीसाठी हा प्रोग्रॅम कसा Run करायचा हे मी तुम्हाला खाली Step by step सांगतो.
स्टेप १ : तुम्हाला पहिल्यांदा PC Health Check हे अँप Install करायचे आहे.
Install करायची लिंक – PC Health Check
स्टेप २ : PC Health Check हे Install झाल्यानंतर त्यावर click करा. प्रोग्रॅम फाईल आपोआप Run होईल.
स्टेप ३ : PC Health Check App प्रोग्रॅम Run झाल्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे Introducing windows ११ चा Section ओपन होईल. तिथे Check now बटण वर क्लिक करा.
स्टेप ४ : जर तुमचा PC Windows ११ च्या System Requirement साठी सक्षम असेल तर तुमच्या समोर “This PC can run windows 11” असा Message येईल. याचाच अर्थ असा आहे कि तुम्ही Upgrade करु शकता Windows ११ मध्ये जेव्हा ते Available असेल.
जर तुमचा PC काही कारणामुळे Windows ११ ला Support करत नसेल तर तुमच्या समोर “This PC can’t run windows 11” असा Message येईल.
आता तुम्ही PC Health Check App बंद करु शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या PC मध्ये Windows ११ चालेल कि नाही हे check करु शकता.